' “मी आज राजीव गांधींमुळे जिवंत आहे” : अटल बिहारींचा हा गौप्यस्फोट आजही अज्ञात आहे – InMarathi

“मी आज राजीव गांधींमुळे जिवंत आहे” : अटल बिहारींचा हा गौप्यस्फोट आजही अज्ञात आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

राजकारण हे भल्याभल्यांना जमत नाही आणि काही जण राजकारणाला पुरून उरतात.. काही राजकारणी वेगवेगळ्या पक्षातील असले तर एकमेकांचे कट्टर वैचारिक शत्रू असतात.. त्यातून ते परस्पर विरोधी पक्षातील असतील म्हणजे एक पक्ष सत्तारूढ आणि दुसरा त्यांचा विरोधी पक्ष तर त्यांचे एकमेकांशी संबंध फार काही दृढ नसतात.

पण तरीही वैचारिक शत्रुत्व कितीही असलं तरी मैत्री संबंध जपणारे राजकारणी खूप आहेत.

उदाहरणादाखल बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार किंवा गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख..

भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले अटल बिहारी वाजपेयी आणि काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेल्या गांधी घराण्यातील तेव्हाचे पंतप्रधान असलेले राजीव गांधी ह्यांच्यातदेखील राजकारणातल्या विरोधापलीकडे, पक्षभेदापलीकडे एक नातं होतं.

 

atal-rajeev-inmarathi
dnaindia.com

भले संसदेत उभे राहून एकमेकांसमोर आपापली गाऱ्हाणी ते मांडत असतील; भले कित्येक मुद्द्यांवर त्यांचे आणि त्यांच्या पक्षांचे एकमत होत नसेल पण आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर त्यांच्यात एक छानसे नाते होते.

राजीव गांधी माझ्या कनिष्ठ बंधूप्रमाणे होते आणि आम्ही राजकारणा बाहेर एकमेकांशी तसेच वागत आलोय असे मत अटलबिहारीनी कायम मांडलंय.

राजीव गांधींच्या अनपेक्षित दुःखद मृत्यू नंतर अटलबिहारींनी आपल्या भावना व्यक्त करताना असा एक गौप्यस्फोट केला होता जो कोणालाच लक्षात नाहीये. किंवा कोणाला माहीतही नाहीये.

अटलबिहारींनी असे म्हटले होते की,

“राजीव गांधी हे जरी विरोधी पक्षातील असले तरी माझ्या जिवंत असण्याच्या मागे त्यांची मदत आहे. त्यांनीच मदत केली म्हणून आज मी तुमच्या समोर जिवंत उभा आहे..!”

असे उद्गार त्यांनी काढले हे त्यांच्या वरील ‘उल्लेख एन. पी.’ ह्या लेखकाने एका पुस्तकात नमूद केले आहेत.

हे वाचून तुम्हा आम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. काँग्रेस आणि भाजपचे आत्ताचे भयंकर शत्रुत्व बघून तर ह्यावर विश्वासही बसणार नाही. पण ह्यातील शब्द न् शब्द खरा आहे.

 

nationaljanmat.com

तसं पाहायला गेलं तर भारताच्या राजकारणात मुस्लिम लीग आणि काँग्रेस एवढेच पक्ष होते. नंतर मुस्लिम लीग पाकिस्तानात गेली.

आणि काँग्रेस भारताची सर्वेसर्वा बनली. त्यातून मतभेदाने फुटून बाहेर आलेले राजकारणी हे इतर काही पक्ष बनवून काँग्रेसच्या विरोधात उभे राहिले. भाजपा पण असाच नंतर उदयास आलेला पक्ष आहे. ज्याच्या प्रमुख नेते पदी अटलबिहारींसारखे नेते होते.

एकीकडे इंदिरा गांधींच्या मृत्यूमुळे सहानुभूती लाभलेले काँग्रेसचे सरकार विना शर्थ विना तसदीने सत्तेची मलई चाखत होते तर दुसरीकडे भाजपा अस्तित्वाची लढाई लढत होते.

पण असं काय कारण असेल ज्यामुळे अटलजी आपला जीव वाचवला म्हणून राजीव गांधींबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करतात?

तर त्यावेळी अटलजी किडनी दोषामुळे खूप त्रस्त होते. त्यात भयंकर गोष्ट म्हणजे त्यांची एक किडनी कधीच फेल झाली होती आणि उरलेली दुसरी किडनी त्यांना त्रास देत होती.

राजीव गांधींना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांना असे वाटले की जर अटलजी चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या किडनीवर उपचार घेऊ शकले तर नक्कीच बरे होतील.

किडनीचा दोष त्यातून एकाच उरलेल्या किडनीचा म्हणजे तो नक्कीच जीवघेणा ठरतो. भले भले लोक किडनी खराब झाल्याने आपला जीव गमावतात.

 

Atal-Bihar-inmarathi
youtube.com

अशात आपल्या वडील बंधूंप्रमाणे असणारे अटलजी हांच्याबद्दल राजीव गांधींना काळजी वाटणे साहजिकच आहे.

तसे सरळ सरळ सांगून अटलजी जाणार नाहीत आणि इतके दिवस राजकारणातून सुट्टी घेऊन स्वतःवर उपचार करवून ते नक्कीच आराम करणार नाहीत हे माहीत असल्याने राजीव गांधींनी एक वेगळी योजना आखली.

भारतातून UN च्या मिटींगला जाण्यासाठी जे भारतीय राजकारणी आणि इतर लोकांचा चमू बनला होता. त्यात अटलजींची वर्णी लावली. जेणे करून ते अमेरिकेत जातील आणि स्वतःच्या किडणीदोषावर उपचार करून घेतील. ह्या सगळ्यांसाठी त्यांना तिकडे पुरेसा वेळही मिळेल.

आणि हे खरेच घडले. अटलजींचा उपचार योग्य तऱ्हेने झाला आणि ते बऱ्यापैकी त्यातून बाहेर आले.

नंतर पंतप्रधान झाल्यावर अटलजींनी आपली किडनी पूर्ण बरी व्हावी म्हणून पुन्हा एकदा व्यवस्थित उपचार घेतले. किडनी दोषातून जीव न गमावता ते चांगले बरे झाले आणि वयाच्या ९३ व्या वर्षांपर्यंत जगले.

असेही म्हटले जाते की आपल्यावर आयुष्यभराचे उपकार केल्यानंतर अटलजींनी त्याची परतावणी देखील खूप प्रेमाने केली.

त्यांनी राजीव गांधींच्या मृत्यू पश्चात आपली सत्ता आल्यावर त्यांच्या परिवाराला जास्तीचे संरक्षण मिळावे म्हणून सरकारी घर बहाल केले. त्यासोबत राजकारणात नसलेल्या प्रियांका गांधींना देखील एक घर बहाल केले.

 

vajpayee-inmarathi
youtube.com

अटलजींनी राहुल गांधींना त्यांच्या US मध्ये झालेल्या काही त्रासदायक घटनांतून देखील बाहेर काढले. हे जरी खात्रीलायक रित्या कोणाला माहीत नसले तरी काँग्रेसने देखील ह्यां अटलजींकडून मिळालेल्या मदतीला कधी नाकारले नाहीये.

हे सगळे अटलजींनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच केले होते असे काहींचे ठाम मत आहे.

अटलजी राजीव गांधींना खरोखरच लहान भावा प्रमाणे मानायचे आणि राजीव गांधी त्यांना ज्येष्ठ बंधुं प्रमाणे. राजीव गांधींबद्दलचे त्यांचे बोल, त्यांची कृतज्ञता नकळतपणे त्यांच्यातील राजकारणी शत्रुत्वाच्या पलीकडले नाजूक हळुवार भावासारखे संबंध दर्शवते..!!

तसेच आपल्या इतर सहकाऱ्यांचा आपल्यावर रोष ओढवला जाईल ह्याला राजीव गांधी ही डगमगले नाहीत. पण माणुसकी दाखवून त्यांनी विरोधी पक्षातील नेत्याला सन्मानपूर्वक मदत मात्र केली. ज्याचा त्यांनी कधी उल्लेख ही कुठे केला नाही. ही गोष्ट, हे सुकृत्य कायम अज्ञात राहिले.

अशा अज्ञात गोष्टी अजूनही माणुसकीवर विश्वास ठेवण्यास आपल्याला नक्कीच भाग पडतात..!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?