Site icon InMarathi

इंग्लिश खाडीवर दोनदा “विजय” मिळवणारी भारतीय महिला आपल्याला “लढणं” म्हणजे काय शिकवते

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

एखाद्या जिल्ह्यामधील आमदारकी, सरकारी गाडी आणि ऐशोआराम पाहून कोणालाही वाटेल की, अशा व्यक्तीला अजून काय पाहिजे? पण काही माणसे असतात जी आयुष्याच्या अवघड परिक्षा देऊन, खूप मेहनतीने सन्मान मिळवून मग त्यांच्या वाट्याला आलेले यशाची चव चाखत असतात.

काही जणांना लहानपण पासून काहीतरी जगावेगळे करण्याची जिद्द असते. अशीच जिद्द उराशी बाळगून पोहण्याचे धडे वयाच्या ९व्या वर्षापासून घेणाऱ्या ‘बुला चौधरी’ नावाच्या महिलेला आज ह्या लेखाद्वारे भेटू..

स्त्रियांना फार कोणती क्षेत्रे करियरसाठी उपलब्ध नसताना बुला चौधरीने असामान्य कौशल्य दाखवून जलपरीचा किताब ही मिळवला आहे.

 

mondaymorning.nitrkl.ac.in

कोण आहे बुला?

वेस्ट बंगाल मधील कम्युनिस्ट पार्टीच्या आमदार अशी बुला चौधरींची ओळख आहे. त्यांनी काही काळ आमदार आणि पार्टीच्या नेत्या म्हणूण काम केले आहे. पण त्याहूनही खूप मोठ्यामोठ्या पुरस्कारांनी आणि पदव्यांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

ह्या उंचीवर पोचायला त्यांनी वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षीच सुरुवात केली. पोहायला शिकवणे हे पूर्वी लहान लहान मुलांना वडीलधाऱ्यां कडून मिळणाऱ्या धड्यांपैकी एक असायचे..!!

आत्ता सारखे हाय फाय कोच, प्रशिक्षक वगैरे नसताना ‘पाण्यात बुडी मारली की पोहायला येते’ ह्याच समजुतीखाली सगळे पोहायला शिकत. बुला नेही तेव्हा पासूनच आपल्या करियरच्या दृष्टीने पाहिले पाऊल टाकले.

स्विमिंगवर पूर्ण लक्ष केंद्रित करून तिने अपार मेहनतीने ६ सुवर्ण पदके एका पाठोपाठ एक मिळवली. पहिला देशस्तरीय पुरस्काराच्या मानकरीही त्या ९व्या वर्षी झाल्या.

 

youtube.com

पट्टीची पोहणारी असलेली बुला आपल्या क्षेत्रात उत्तोरोत्तर मोठी प्रगती करत गेली. तिला ज्युनियर लेव्हल आणि नंतर सिनियर लेव्हलचे पोहण्यातील अनेक पुरस्कार मिळत गेले. ती इतक्यावरच थांबली नाही. तिने मोठ्या माध्यमातून पोहण्याचे निश्चित केले. १९८९ साली तिने इंग्लिश खाडी पोहून विक्रम नोंदवला.

तिने ८१ किमी चे अंतर कापले. १९९६ साली तिने मुरशीदाबाद येथील लॉंग डिस्टन्स स्विमिंग चॅम्पियनशीप जिंकली.

ह्या विक्रमानंतर तिला पुन्हा एकदा इंग्लिश खाडी पोहण्याची संधी मिळाली आणि तिने त्याचं सोनं केलं. १९९९ मध्ये म्हणजे १० वर्षांनी तिने दुसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहण्याचा बहुमान मिळवला.

पोहण्याच्या शर्यतीत अशी असंख्य बक्षिसे बुला नी मिळवली. पण ह्यावरच समाधान मानेल ती बुला नव्हती. तिचे ध्येय वेगळे होते.

गमतीने माणसे एकमेकांना असे म्हणतात की, ‘तुझ्या साठी मी सात समुद्र पार करीन..!!’ पण खरे तर असे कोणी करत नसते. किंवा फार तर विमानातून पार करत असावेत.

पण स्विमिंगमध्ये मोठे उद्दिष्ट गाठायच्या ध्येयाने भारलेल्या बुला ने खरोखरीच हा हा म्हणता सात समुद्र पोहून पार केले. सात समुद्रांबरोबर पाच खंडातील इतर समुद्र देखील तिने पोहून संपवले आहेत.

तिने जिब्राल्टर ची सामुद्रधुनी, कूक ची सामुद्रधुनी, टोरोनियस गल्फ, टायरीनियन समुद्र आणि कॅलिफोर्निया समुद्राची कॅटालीयन खाडी पार केली. अशा प्रकारचे धाडस दाखवायला तिला जणू लहानपणीच बाळकडू मिळालं होतं.

 

dailyhunt.in

इतक्या मोठ्या मोठ्या विक्रमांना तिने फक्त २४ वर्षांच्या आपल्या कठोर मेहनतीने कवेत घेतले होते. असे सात समुद्र आणि पाच खंडातील खाड्या पार करणारी ही जगातील एकमेव महिला आहे.

ह्या नंतरही वयाच्या ३४ व्या वर्षी तिने श्रीलंकेच्या तालाईमन्नार पासून तामिळनाडूच्या घनुकोष्टी पर्यंतची ‘पाल्क ची सामुद्रधुनी’ १३ तास आणि ५४ मिनिटात पोहून पूर्ण केली.

ह्यावेळी समुद्राची आणि वातावरणाची साथ तिला लाभली नव्हती. समुद्र खवळलेला होता आणि वाराही सुसाट धावत होता. पाऊसाचाही सामना तिला करावा लागला. पण अशातही आपली जिद्द न सोडता तिने इतके मोठे अंतर पोहून पार केले.

बुला चौधरींना मिळालेले पुरस्कार आणि पदव्या :

इतक्या उंचीवर पोहोचलेल्या बुला चौधरी ह्यांना हे यश सहज प्राप्त झालेले नाही. पुरुषी वर्चस्व असलेल्या क्षेत्रात त्यांना परिस्थिशी खूप झगडावे लागले होते. त्यांच्या यशामागे त्यांचे अथक परिश्रम आहेत.

पण त्यांच्या ह्या यशामुळे इतर स्त्रीयांना मात्र कवाडे खुली झाली आहेत. ध्येयासाठी कसे प्रयत्न करावे हे इतर स्त्रिया त्यांच्या कडून शिकू शकतात.

बुला चौधरींनी अनेकांना निराश सोडून आत्मविश्वासाने पुढे जाण्याची बळ दिले आहे. त्यांना स्वतःचे पोहण्याची कला शिकवण्याचे प्रशिक्षण केंद ही उभारायचे आहे. त्यांच्या ह्या यशामुळे एक गोष्ट आपल्याला नक्कीच कळते की जे सहज शक्य आहे ते करण्यापेक्षा जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवले म्हणजे आयुष्यात खूप काही करून गेल्याचे समाधान आपण मिळवू शकतो.

ध्येयवेड्या बुला चौधरींकडून सतत सकारात्मक राहून, प्रामाणिक प्रयत्न करून यश मिळवण्याचे गमक आपणही नक्की साधू शकतो..!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version