Site icon InMarathi

एकच रंग प्रत्येकाला वेगवेगळा दिसण्यामागे आहे हे अजब कारण, वाचा!

tamannaah-bhatia-in Red Inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कधी तुम्ही आणि तुमचा मित्र जमिनीवरून आकाशाकडे बघत असतांना, तुमच्या मनात असा विचार येतो का की, त्याला आकाश अगदी तश्याच निळ्या रंगाचं दिसतंय का जसं तुम्हाला दिसतंय?

जेवढा तुम्ही त्याचा जास्त विचार कराल तितकं जास्त तुम्ही त्या कल्पनेत हरवत जाल. आपण बघतो तो रंग आपल्या सोबतच्या व्यक्तीला देखील तसाच भासतो का जसा तो आपल्याला भासतो आहे?

ज्याला तुम्ही निळा म्हणता त्याच्यासाठी तो पिवळा तर नसणार ना? जर तुम्हाला तुमच्या मित्राच्या शरीरात प्रवेश मिळाला तर कदाचित तुम्हाला ते शक्य देखील होईल की, तुम्ही त्याला कोणता रंग दिसतोय हे जाणून घेऊ शकाल, पण ते शक्य नाही.

याला कलर थियरी म्हणतात.

अनेक लोक काही प्रमाणात रंग आंधळे असतात. जवळ जवळ १२ पैकी एक पुरुष आणि २०० पैकी एक महिला ही रंग आंधळी असतात. त्यांच्यापैकी बरेच लोक तुमच्या अवती-भवती फिरत असतात. कुठलीच लिंक नसते की, त्यांना एक विशिष्ट रंग कोणता हे कळेल. हे तुम्हाला तो पर्यंत कळणार नाही जो पर्यंत कोणी तुम्हाला ग्रे रंगाची वस्तू द्यायला सांगितली आणि तुम्ही दुसऱ्या भलत्याच रंगाची वस्तू त्याचा हाती ठेवाल.

जरी तुम्हाला कळलं की, तुम्हाला एक विशिष्ट रंग वेगळा दिसतो. तरी तुम्हाला तो खरा रंग कसा आहे हे कधीच कळू शकणार नाही. हे सर्व सजगतेच्या कल्पनेतून येत असतं जे दोन व्यक्तीमध्ये शेयर केलं जाऊ शकत नाही. अगदी तुम्ही दोन्ही रंग आंधळे नसलात तरी!

 

curiosity.com

 

प्रश्न हा नाही की, जैविक जनुकीय बदलांमुळे आलेल्या रंग आंधळेपणामुळे त्यांचा दोन रंग बघण्याचा पद्धतीत बदल होतो का? खरा प्रश्न आहे की, जर दोन नॉर्मल व्यक्तींना एखादा रंग सारखाच भासतो का?

जर कोणाला तो नारंगी भासत असेल तर तो शेजरच्याला अगदी तसाच नारंगी भासत असेल का? याचे उत्तर सहाजिकच हो असले.

परंतु कोणाच्या मेंदूतील बदलामुळे कोणाला निळा रंग नारंगी भासत असेल तर ते कसं कळणार? तो त्याला नारंगीच वाटणार ना आणि तुम्हाला निळा, अथवा याउलट होणार.

असा कुठलाच मार्ग नाही ज्याद्वारे तुम्ही असं सिद्ध करू शकता की, तुमची दृष्टी स्थिर आणि सर्वसाधारण आहे. परंतु सध्या प्राप्त झालेल्या पुराव्या अनुसार रंग दृष्टी संपूर्णतः वैयक्तिक आहे.

रंग आंधळ्या माणसाप्रमाणे अनेक सस्तन प्राण्यांमध्ये जसे शेकरू, माकडं यांना एक प्रकारच्या कोन पेशी असतात ज्यां निळ्या व हिरव्या रंगाला सेन्सिटिव्ह असतात.

यामुळे माकडं निळा आणि पिवळा रंग करड्या ग्रे रंगाच्या शेतात ही शोधू शकतात. परंतु ते लाल वाल्यांना हिरव्या पासून वेगळं करू शकत नाही.

२००९ साली रंग आंधळे पणावर अभ्यास केला. त्यांना जनुकीय बदल केलेल्या व्हायरसची लागण करण्यात आली. यामुळे एक विचित्र परिणाम नोंदवण्यात आला.

ह्या व्हायरसमुळे हिरवा रंग सेन्स मज्जातंतू पेशीं परावर्तित झाल्या व लाल रंग सेन्स करणाऱ्या पेशीं तयार झाल्या, ही अश्याप्रकारची पेशी होती, जी त्या माकडाच्या प्रजातीत नव्हती त्यामुळे ह्या माकडाना ह्या पेशींची सवय नव्हती.

 

khanacademy.org

 

परंतु आश्चर्यकारकरित्या माकडांनी ते जनुकीय बदल स्वीकारले आणि ते लाल-हिरवा रंग ओळखण्यात कुठलिच चूक करत नव्हते जणू त्यांना कोणी रंगामधील भेद स्पष्ट करून दिलेला असावा. हे विस्मयकारक होतं.

उदाहरण द्यायचं झालं तर, तुम्ही एक संपूर्णतः ब्लॅक अँड व्हाइट सिनेमाला संपूर्णतः कलरमध्ये रूपांतरित करून एका टीव्हीवर बघत आहात. अर्थात त्या माकडांमध्ये जनुकीय बदल झाले असले, तरी ते त्या परिस्थितीशी एकरूप झालेत.

त्यांना तो रंग अगदी तसाच दिसत नव्हता तरी त्यांनी त्या विशिष्ट रंगाच्या वस्तुंना बरोबर ओळखले.

यावर रंग विज्ञान तज्ञ जोसेफ कॅरोल यांनी दिलेल्या माहिती नुसार, आपल्या डोळ्यांना ज्या वेव्हलेंथचा प्रकाश सेन्स करता येतो, ती वेव्हलेंथ ब्लु रंगाच्या वेव्हलेंथ इतकी असते.

त्यामुळे जरी जनुकीय बदल केले तरी आलेली वेव्हलेंथ सेन्सिटाईज करून मेंदू आपल्या परीने पर्सेप्शन देऊन एक विशिष्ट रंग हा असाच असतो हे स्वतः जवळच्या आधीच्या साठवलेल्या माहिती वरून इंटरप्रिट करतो. त्यामुळे जनुकीय बदल केले तरी व्यक्ती एक विशिष्ट रंग ओळखु शकतो.

 

vox.com

 

आता खरी गंमत आहे. ह्याच मनुष्याचा तीन वेगवेगळ्या कलर डिटेकटिंग पेशींशी साधर्म्य आहे.

याचा अर्थ जेव्हा मेंदूने एखाद्या गोष्टीचा रंग असा असतो, ह्याची माहिती साठवली का मग आपल्यात जनुकीय बदल केले तरी ती वस्तू आपल्याला तशीच भासेल.

खऱ्या अर्थाने तिला रंग नसेल अथवा ब्लॅक ऍण्ड व्हाइट स्वरूपात ती असेल परंतु आपल्याला ती वस्तू आपल्याला मेंदूने तिला जसं नोट केलं आहे तश्याच स्वरूपात दिसेल. याचा अर्थ असा लोकांना एकसारखे रंग दिसत नाहीत. कदाचित जो तुमच्यासाठी निळा आहे तो लोकांसाठी हिरवा असेल. आहे का नाही गंमत?

आपल्याकडे म्हण आहे “दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं”, ह्या बाबतींत ही म्हण तंतोतंत लागू पडते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version