आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
१६ डिसेंबर १९७१ म्हणजे भारत-पाक युद्ध, ९३,००० पाकिस्तानी सैनिकांची भारतीय सेनेसमोर शरणागती, बांग्लदेशची निर्मीती, अविस्मरणीय असा ‘ विजय दिन’.
भारतीय सेना, नौसेना, वायुसेनेच्या इतिहासात भारत-पाक युद्धात हा आपला सर्वात मोठा लक्षणीय व निर्णायक विजय होता.
पश्चिमी पाकिस्तान सरकार पूर्व पाकिस्तानच्या बंगाली जनतेवर सुरुवातीपासूनच अन्याय करीत होते. शेख मुजीबूर रहमानच्या पक्षाला बहुमत मिळाले, तेव्हा तेथे मुजीबूर यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन व्हावयास हवे होते. पण तसे न करता मुजीबूर रहमान यांना अटक केली व त्यांना पश्चिम पाकिस्तानच्या कारागृहात डांबून ठेवले.
संभाव्य बंडाळी वर आळा घालण्यासाठी जनरल याहयॉ खान यांनी पश्चिमी पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात सैन्य पूर्व पाकिस्तानात धाडले, या सैन्याने पूर्व पाकिस्तानात बंगाली नागरिकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरु केले.
याला पाकिस्तानी सैन्याने ‘ऑपरेशन सर्च लाइट’चे नाव दिले होते.
रोज शेकडो लोकांची हत्या केली जात होती. बांग्लादेश सरकारने जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार, त्या काळात ३० लाखांपेक्षा अधिक निष्पाप बंगाली नागरिकांना पाकिस्तानच्या सैन्याने ठार केले. दोन लाखांपेक्षा अधिक महिलांचा बलात्कार केला. एवढेच नाही तर लाखो मुलांचाही बळी घेतला.
==
हे ही वाचा : ‘तो’ नसता तर कारगिल युद्धाचा निकालच वेगळा लागला असता..
==
या क्रुर कृत्याचे वृत्त १३ जून १९७१ ला ब्रिटेन मधिल ‘द संडे टाईम्स’ या वृत्तपत्राने प्रकाशित केले. त्या नंतर जगासमोर पाकिस्तानचा खरा चेहरा आला.
या अत्याचारांना कंटाळून मोठ्या संख्येने पूर्व पाकिस्तानातील बंगाली शरणार्थी चहूबाजूने भारतात प्रवेश करु लागले. या शरणार्थींना आसरा देण्याचे काम आपल्या देशाने केले. परंतु, त्यामुळे आपल्या देशावर आर्थिक ताण पडू लागला. त्यामुळे भारताच्या अर्थ व्यवस्थेवर ३०० कोटी रुपये अतिरिक्त बोजा पडला.
साधारण मार्च १९७१ पासून दोन्ही देशांमधील ताण वाढू लागला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य निष्कर्ष काढला व भारतीय सैन्यदलास युद्ध अपरिहार्य असल्याचे स्पष्ट संकेत दिले.
लष्करप्रमुख जनरल माणेकशॉ यांनी युद्धसज्जतेसाठी कमीतकमी सहा महिन्यांचा अवधी मागितला, जो अगदी योग्य होता.
युद्धसज्जतेच्या वेळी युद्धाची तत्वे लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या युद्धतत्वावर भारतीय सशस्त्र दलांनी युद्धाची जबरदस्त तयारी केली. इंदिराजींनी म्हटले,
“हा आता केवळ पाकिस्तानचा अंतर्गत प्रश्न राहिलेला नाही. हा आंतरराष्ट्रीय मुद्दा बनला आहे. मोठ-मोठ्या देशांनी एकत्र येत पाकिस्तानवर दबाव आणायला हवा, असे अवाहन त्यांनी केले.”
मात्र पाकिस्तानने अमेरिका आणि चीनच्या बळावर भारताला युद्धाची धमकी दिली. नोव्हेंबर १९७१ च्या शेवटच्या आठवड्यात पाकिस्तानच्या विमानांनी भारतीय वायू सीमेचे उल्लंघन करणे सुरु केले. १९७१ च्या युद्धांत सैन्याची जमवाजमव अतिशय योजनाबद्ध व कुशलतेने झाली होती.
या युद्धांत आपल्या लष्कर प्रमुखांनी योजना आखली की, पश्चिमी पाकिस्तानात शत्रूला रोखुन ठेवायचे व पूर्व पाकिस्तानात सर्व बाजूने आक्रमण करुन आत शिरुन ढाक्यावर ताबा मिळवायचा.
आपल्यावर जरी युध्द थोपवले गेले तरी आपला पवित्रा हा आक्रमकच असावा लागतो. ४ डिसेंबर १९७१ ते ६ डिसेंबरमध्ये प्रसिद्ध असे “बॅटल ऑफ लोंगेवाला” ज्यात जैसलमेर दिशेने झालेले पाकिस्तानी सैन्याचे आक्रमण भारतीय सैन्याने थोपवले. ८ डिसेंबरच्या “ऑपरेशन पायथॉन” च्या माध्यमातुन भारतीय नौदलाने कराची बंदरावर आक्रमण केले.
नौदलाच्या आक्रमणाला रोखण्यासाठी अमेरिकेने बंगालच्या उपसागरात युएसएस एंटरप्राइझ ही युद्धनौका तैनात केली. यावर जबरदस्त असा उपाय मुत्सद्दी पंतप्रधान इंदिरा गांधींनी आधीच शोधून ठेवला होता.
ऑगस्ट १९७१ मध्ये महासत्ता असलेल्या रशियाशी २० वर्षासाठी मैत्रीचा करार केला. या करारानुसार भारतावर केलेले आक्रमण हे मित्रत्वाच्या नात्याने रशिया वरिल आक्रमण ठरते.
या नियमानुसार १३ डिसेंबर रोजी अमेरिकेच्या आगाऊपणाला प्रत्युत्तर देण्यासाठी रशियाने भारताच्या बाजूने युद्धनौकांची मोठी जंत्रीच तैनात केली.
या महासत्तांचा एकमेकांशी सामना झाल्यास महायुध्दाचा धोका होता, त्यामुळे भारतीय सेनेला कमीत कमी वेळेत हे युद्ध स्वतःच्या ताकदीवर संपवायचे होते.
१४ डिसेंबर १९७१ रोजी भारतीय लष्कराला एका गुप्त संदेशाच्या माध्यमातुन समजले की, सकाळी ११ वाजता ढाकाच्या गव्हर्नर हाऊसमध्ये एक महत्वपूर्ण बैठक होणार आहे, यात पाकिस्तान प्रशासनाचे बडे अधिकारी सहभागी होणार आहेत. भारतीय सैन्याने त्याच बैठकिच्यावेळी मिग-२१ विमानांनी बॉम्ब वर्षाव करुन गव्हर्नर हाऊसचे छत उडवले.
==
हे ही वाचा : जगाला एकहाती अणुयुद्धाच्या सर्वनाशापासून वाचवणाऱ्या माणसाची अज्ञात कथा
==
गव्हर्नर मलिक यांनी थरथरत्या हाताने स्वत:चा राजीनामा लिहिला. बांग्लादेश युद्धांत भारताने पाकिस्तानची पुरती नाकेबंदी करुन ठेवली होती.
एकीकडे भारतीय नौदलाला तोंड देण्यासाठी कराचीहून निघालेली पाकिस्तानी पाणबुडी “आयएनएस गाझी” ला भारतीय पाणबुडी “आयएनएस राजपूत” ने विशाखापट्टणम जवळ अचूक टिपले आणि आयएनएस गाझीने आतील सर्व पाकिस्तानी सैनिकांसह बंगालच्या उपसागराचा तळ गाठला.
त्यामुळे पाकिस्तानी नौदलाचा कणाच मोडून पडला आणि दुसरीकडे भारतीय सेना आणि मुक्तिवाहिनी ढाकापर्यंत पोहचली होती. पाकिस्तानी सैन्याची रसद पुरती तुटली होती. पाकिस्तानी सैन्य आता पुरते खचून गेले होते. त्यांच्या आशा मावळत चालल्या होत्या.
पाकिस्तानी जनरल ए.के. नियाझी यांनी १५ डिसेंबर १९७१ रोजी अमेरिकी राजनितीक माध्यमांव्दारे भारतीय फिल्ड मार्शल माणेकशॉ यांनी गोळीबार थांबवण्याचा प्रस्ताव पाठवला.
पण माणेकशॉ यांनी उलट त्यांनाच ‘बिनशर्त शरणागती’चा प्रस्ताव पाठवला.
शरणागती स्विकारल्यास सद्भावना दाखवण्यास संध्याकाळी ५ वाजेपासून एकतर्फी गोळीबार स्थगितीची घोषणा केली व शरणागती ताबडतोब न स्विकारल्यास दुसऱ्या दिवशी १६ डिसेंबर १९७१ च्या सकाळी ९ पासून भारतीय सैन्य अधिक जोमाने युद्ध लढेल, अशी कडक तंबी नियाझी ला दिली.
नियाझींच्या नेतृत्वाखाली बांग्लादेशात लढत असलेल्या पाकिस्तानच्या तब्बल ९३,००० सैनिकांचे भवितव्य नियाझींच्या हातात होते. त्यांच्यापुढे फक्त दोनच पर्याय होते पहिला पर्याय म्हणजे बिनशर्त शरणागती अथवा ९३,००० पाकिस्तानी सैनिकांची भारतीय सैन्याकडून कत्तल.
युद्धात अखेरच्या दिवशी ढाकामध्ये पाकिस्तानी फौजेचे अधिकारी नियाझी यांनी भारतीय सैन्याचे अधिकारी जगजीतसिंग अरोरा यांच्यासमोर ९३,००० सैनिकांसह आसवं ढाळत, रडत-रडत आत्मसमर्पण केले होते.
अरोरा आणि नियाझी एका टेबलसमोर आमने-सामने बसले. दोघांनी आत्मसमर्पणाच्या दस्ताऐवजावर स्वाक्षरी केली. नियाझींनी स्वतःची पदके उतरवली आणि शरणागतीचे प्रतिक म्हणुन त्यांच्याकडील रिव्हाल्वर जनरल जगजीतसिंग अरोरा यांच्याकडे सुपूर्द केले.
युद्धात भारताचे जवळपास ३९०० सैनिक शहिद झाल होतेे, तर ९८५१ जखमी झाले होते.
इंदिरा गांधी संसद भवनातील आपल्या टिव्हीला मुलाखत देत होत्या तेव्हाच माणेकशॉ तिथे दाखल झाले आणि त्यांनी इंदिराजींना बांग्लादेशात मिळालेल्या शानदार विजयाची बातमी दिली. त्यांनी लोकसभेत घोषणा केली की युद्धांत भारताला विजय मिळला आहे. इंदिरा गांधींच्या घोषणेनंतर संपूर्ण सभागृह आनंदीत झाले.
अशा प्रकारे ९३,००० पाकिस्तानी युद्धकैद्यांना इंदिरा गांधीनी बिनशर्त सोडुन दिले!!!
==
हे ही वाचा : भारत विरुद्ध पाक + चीन युद्ध घडल्यास काय होईल? एका अभ्यासकाने मांडलेलं भयावह चित्र
==
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.