Site icon InMarathi

हिंदू युग ‘लक्ष’ वर्षांचे असूनही राम-कृष्ण हजार वर्षांपूर्वीचे? वाचा या प्रश्नाचे उत्तर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

राम हा भारताचा प्राण आहे आणि कृष्ण हा भारताचा आत्मा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरु नये. इतका राम आणि कृष्णाचा प्रभाव भारतीय मनावर झाला आहे. एखादी गोष्ट चांगली नसली तर आपण म्हणतो ‘यात काही राम नाही’.

लहान मूलाला आपण गोपाळकृष्ण म्हणतो. आज कितीतरी वर्षे लोटली असली तरी राम आणि कृष्णाची मंदिरे जागोजागी दिसतात.

राम आणि कृष्णाचे भक्त आजही त्यांच्या भक्तीत तल्लीन होताना दिसतात. आपण नेहमी ऐकत आलो आहोत की महाभारत ५००० वर्षांपूर्वी घडले होते. पण असे सांगण्यात येते की युग हे लाखो वर्षांचे असते.

 

मग कृष्ण आणि राम केवळ ५००० वर्षांपूर्वी होऊन गेले असे जे म्हटले जाते ते असत्य मानायचे का?

महाभारताची कालगणना करताना बर्‍याचदा गडबड होते. अर्जूनाच्या काही वंशजांनी १०० हून अधिक वर्षे राज्य केले आहेत. ‘

याबद्दलचे तपशील व्यवस्थित उपलब्ध नाहीत. भविष्य पुराणात परिक्षित नंतरच्या त्याच्या अनेक पिढ्यांनी ४० ते ५० हजार वर्षे राज्य केल्याचा उल्लेख आढळतो. इतिहासात कोणतेही साम्राज्य सहसा नष्ट होत नाही.

एकतर ते साम्राज्य नष्ट होण्यासाठी कुणातरी ती साम्राज्ये जिंकावी लागतात. ज्याप्रमाणे पुष्यमित्र शुंग याने आपला सम्राट बृहदत्त अतिरिक्त अहिंसेच्या नादी लागून परकीय आक्रमकांना शरण जातोय असे वाटल्यावर त्याने बृहदत्तचा वध केला. त्याप्रमाणे महाभरतकालीन साम्राज्ये नष्ट झाली असणार.

 

 

अजून एक मुद्दा असा की कुरुक्षेत्रातील युद्ध हे शेवटचे अस्त्र युद्ध होते. त्यानंतर कुणा शासकाने अस्त्र वापरल्याचा उल्लेख सापडत नाहीत. आपल्याकडे धनुर्वेद नावाचे शास्त्र सुद्धा उपलब्ध होते.

या शास्त्रात विविध अस्त्रांची माहिती होती. आज अस्त्र विद्या अवगत असणारा एकही योद्धा आपल्याला दिसत नाही.

एवढेच काय तर आद्य शंकाराचार्य यांच्या काळात म्हणजे ख्रिस्त पूर्व ५०० वर्षाआधी सुद्धा ही विद्या भारतीय योद्ध्यांना अवगत नव्हती. जर महाभारत युद्ध केवळ ५००० वर्षांपूर्वी घडले असेल तर अस्त्र विद्या इतक्या लवकर नष्ट झाली नसती.

 

याचाच अर्थ महाभारताचा काळ हजारो वर्षे जुना नसून लाखो वर्षे जुना आहे. एका तर्काच्या आधारवर हे आपण सिद्ध करु शकतो.

महाभारतापासून ध्रुव तार्‍याचे पूर्ववर्ती चक्र बारा वेळा पूर्ण झाले आहे. महाभारत युद्धाचा शेवटचा ध्रुव तारा ५००० वर्षांपूर्वी उत्तर ध्रुव होता. याचा अर्थ असा की महाराभरताचे वय सुमारे १२ × २५८०० + ५००० = ३,१४,६०० वर्ष एवढे आहे. हिच कलीयुगाची सुरुवात होती.

हे गणित जरी समजण्यास थोडे कठीण असले तरी समजून घेणे अनिवार्य आहे. या गणनेनुसार रामाचा काळ हा कलीयुग सुरु होण्यापूर्वी ८,६४,००० वर्षे एवढा आहे. म्हणजेच रामकाल १२,००,००० वर्षे जुना आहे.

यावर आपला विश्वास बसणार नाही की बारा लाख वर्षे जुना असलेला राम आजही आपल्या स्मरणात आहे.

पण महाभारत काळात रामाच्या मंदिराचा उल्लेख सापडत नाही.

 

 

त्याचप्रमाणे कृष्णाला देवत्व कधी प्राप्त झाले हे सुद्धा सांगता येत नाही. ज्या प्रमाणे राम आणि कृष्णाला देवत्व प्राप्त झाले त्या अनुमानाने हा काळ बारा लाख वर्षे जुना असू शकतो.

कारण इतिहासाचे रुपांतर श्रद्धेत झाले आहे. लोकनेता राजा राम आज देव झला आहे आणि महाभारतात सपोर्टिंग रोल ज्याचा आहे तो कृष्ण सुद्धा आज पांडवांपेक्षाही मोठा झाला आणि पुढे तो देव झाला.

आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की आता आपण कलीयुगाच्या ४ थ्या चतुर्थांशमध्ये पोहोचलो आहोत. म्हणजे कलीयुगाच्या ४,३२,००० वर्षांपैकी आता १,१०,००० वर्षे शिल्लक आहेत. कदाचित सुमारे २००० वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांना याबद्द्ल माहित होते.

पण २००० वर्षांपासून परकीय आक्रमक इतके वाढले की सतत या भूमीत युद्ध होत राहिले आणि आपली जुनी संपदा आपण विसरत गेला. किंबहुना ती नष्ट करण्यात आली.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version