Site icon InMarathi

सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य: घेतला वसा दुर्ग संवर्धन चळवळीचा

sahyadri-durg-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

गडकिल्ले संवर्धन कार्यासाठी महाराष्ट्रात अग्रेसर असणारी संस्था सह्याद्री प्रतिष्ठानची स्थापना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री श्रमिक गोजमगुंडे यांनी २००७ मध्ये केली. सह्याद्री प्रतिष्ठान गडकिल्ले संवर्धन सोबत सामाजिक कार्य हि गेल्या दहा वर्षा पासून मोठ्या प्रमाणात करत आहे.

याच सर्व कार्याचा थोडक्यात आढावा:

शिवरथ यात्रा :

सह्याद्री प्रतिष्ठान आयोजित महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील पहिली मानाची पालखीयात्रा म्हणजे “शिवरथ यात्रा”. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा प्रचार आणि प्रसार घराघरात व्हावा यासाठी दरवर्षी ३ ते ७ फेब्रुवारीला,

“शिव जन्मस्थान किल्ले शिवनेरी ते समाधी स्थळ दुर्ग दुर्गेश्वर किल्ले रायगड”

शिवरथ यात्रा असा ५ दिवसांचा भव्य पालखी सोहळयाचे आयोजन केले जाते. या यात्रेदरम्यान यात मोठ्या संखेने शिवप्रेमींचा सहभाग असतो.

 

गावोगावी पालखीचा मुक्काम असतो. मुक्कामादरम्यान व प्रवासात शाळा, महाविद्यालये, गावातील मंदिरे अश्या ठिकाणी शिवकाळीन युद्ध केलेचे प्रात्याक्षिके, इतिहासावर इतिहास संशोधकांची व्याख्याने, पोवाडे होतात व सामाजिक संदेशही दिले जातात.

५ व्या दिवशी सकाळी पालखी किल्ले रायगडावर पोहचते व महाराजांच्या मूर्तीला अभिषेक होतो आणि उपस्थित मान्यवरांच्या भाषणाने यात्रेचा समारोप होतो. तसेच शिवरथ यात्रावर आधारित “शिवरथ” या माहिती पटाची निर्मिती केली जाते.

महाराष्ट्रभर या सोहळ्याचा प्रसार होण्यासाठी व्हिडिओ सीडीचे मोफत वितरण केले जाते. या वर्षी शिवरथ यात्रेस ७ वर्ष पूर्ण झाली आहेत.

दुर्ग दिन :

सह्याद्री प्रतिष्ठान आयोजित दरवर्षी १ मे या महराष्ट्रदिनासोबत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील गडकिल्ल्यांवर दुर्ग दिन साजरा केला जातो.

 

 

दुर्गदिनानिमित्त सदस्य किल्यावर जाऊन किल्याच्या दरवाजा, तटबंदी व बुरुज यांना फुलांचे तोरण घालून त्या समोर रांगोळी काढून दिवे लावतात आणि दिपोस्तव सोबत गडपूजन करून दुर्ग दिन साजरा करतात. तसेच दसऱ्याच्या दिवशी गडकिल्ल्यांवरील दरवाजे यांना तोरण लावून सिमोल्ल्घन केले जाते.

दुर्गसंवर्धन व दुर्गदर्शन :

संस्थापक अध्यक्ष हे स्वतः भारतातील १२३३ किल्ले फिरलेले आहेत. देशातील सर्वाधिक किल्ले महाराष्ट्र राज्यात आहेत आणि याला जगातील सर्वात मोठा राजा म्हणजे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास या महाराष्ट्राला लाभला आहे. महाराष्ट्रातील जवळपास ४०० गडकिल्ले असून ते जणू ज्वलंत इतिहासाच्या खुणा घेऊन आपली साक्ष देत आजही ताठ मानेने उभे आहेत.

याच किल्याचे संवर्धन करून त्यांचा इतिहास जपला पाहिजे याच उदेशाने संस्थेने “घेतला वसा दुर्ग संवर्धनाचा” हे ब्रीद वाक्य घेऊन दुर्ग संवर्धन कार्यास श्रीगणेशा केला.

 

आज दुर्ग संवर्धन ही काळाची गरज आहे. दुर्ग संवर्धन मोहिमा सोबत दुर्ग दर्शन मोहिमा हि महाराष्ट्रातील तरुणानी करायला पाहिजे आणि गड किल्याना भेटी द्यायला हवे.

दुर्गदर्शन

सह्यद्री प्रतिष्ठानने आजवर १५७७ किल्यांवर दुर्ग दर्शन मोहिमा केल्या. या मोहिमे दरम्यान महाराष्ट्रातील किल्याचा इतिहास संकलन, किल्यावरील दुर्ग आवशेष पाहणी व नोंद, गडावर जाणाऱ्या वाटा, स्थानिकांशी दुर्ग संवर्धन विषयावर बैठक, किल्ल्यावर कोणकोणत्या स्वरूपाचे प्राथमिक काम दुर्ग संवर्धन मोहिमेत करता येईल याचा आराखडा तयार करून प्रतिष्ठानचे सदस्य अभ्यास करत असतात.

दुर्ग दर्शन मोहिमे दरम्यान प्रसिद्ध इतिहास अभ्यासकांकडून किल्ल्याच्या इतिहासाला उजाळा देण्यात येतो. आनंदाची गोष्ट म्हणजे आज मोठ्या संखेने तरुण पिढी दुर्ग दर्शन मोहिमेत सहभागी होत आहे

दुर्गसंवर्धन

आज महराष्ट्रात अनेक संस्था दुर्ग संवर्धन कार्य करत आहेत, ही आनंदाची बातमी आहे. सह्याद्री प्रतिष्ठानने आजवर अंदाजे ६०० हून अधिक दुर्गसंवर्धन मोहिमा म्ह्राष्टारातील विविध किल्यांवर राबवल्या असून या मोहिमेदरम्यान खालील कामे केली जातात.

१. किल्ल्यावरीलवाटा :

किल्यावर जाणाऱ्या वाटा दुरुस्त करने, किल्यावरील अवघड व अरुंद वाटेवर संरक्षण दृष्टीने रेलिंग व लोखंडी शिडी बसविणे, दर वर्षी पावसाळ्या नंतर मातीने निसरड्या झालेल्या वाटेवर खाच काढून ते चालण्या योग्य बनवणे, वनदुर्ग व प्रचंड जंगल असलेल्या गिरी दुर्गावर जागोजागी दिशा दर्शक लावणे व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने किल्याची वाट दाखवण्यासाठी गावातील बेरोजगार तरुणांना वाटाड्या म्हणून प्रशिक्षण देणे हे महत्वाचे आहे.

 

 

वनर्गादुकडे भ्रमंती करताना अनेकदा वाटा चुकणे व जंगली हिंसक प्राण्याचा आघात होणे असे प्रकार असतात व यामुळे दुर्ग प्रेमींच्या जीवाला धोका निर्माण होतो. तसेच हे वेळेवर वाटा दुरुस्ती करून हे आघात किंवा अपघात टाळता येतात.

२. किल्ल्याला कचरामुक्त करणे :

सध्या जरी किल्यावर हौशी पर्यटकांची संख्या वाढली असली तरी किल्ले कचरा मुक्त होत नाही हे दुर्दैव्य आहे. याचे कारण की आज असेच काही पर्यटक किल्यांवर पिकनिक, मज्जा, मस्ती या साठी काही मोजक्या किल्यांवर गर्दी करतात पण या मौज मस्तीच्या नादात ते किल्यावर कचरा करू नये या पाटी कडे दुर्लक्ष करतात.

सह्याद्री प्रतिष्ठान हे दुर्ग संवर्धन करत असताना हे काम प्राथमिक स्वरुपात करत असते. अनेक किल्यांवर प्रतिष्ठान मार्फत कचरा कुंडे बसवण्यात आले आहेत.

तसेच मोहिमे दरम्यान दारूच्या बाटल्या,प्लास्टिकच्या बाटल्या, वेफर बिस्कीट पुडे यांचे रापल,असा कचरा गोळा कारण त्याची गडाच्या पायथ्याशी विल्हेवाट लावण्यात येतो.

३. किल्ल्यावरील टाके स्वच्छता :

किल्यावरील टाके स्वच्छता हे संवर्धन मोहिमेतील सर्वात काळजीपूर्वक व अभ्यासपूर्वक करण्याचे काम आहे. एखादा किल्यावर दुर्ग संवर्धन मोहीम घेण्यापूर्वी किल्ला केंद्र पुरातत्व राज्य पुरातत्व व वन विभाग अंतर्गत आहे याची पडताळणी करून संबंधित परवानगी घेणे बंधकारक आहे.

तसेच गडावरील पाण्याच्या टाक्याची गाळ काढण्या पूर्वी आर्केओलॉजी तज्ञ मार्गदर्शकाकडून माहिती घेणे गरजेचे आहे. किल्ल्यांचा गाळ काढताना तो चालून काढावा.

त्यात शक्यतो भांड्यांचे तुकडे, विटा, शस्त्र दारुगोळा किंवा इतर वस्तू सापडण्याची शक्यता असते त्या वस्तूवरून त्या किल्याचा काळ व त्याचा इतिहास संशोधनास मदत होते. प्रतिष्ठान कडून टाक्या स्वच्छता केल्या जातात जेणे करून पर्यटकांना पाणी पिण्यास मदत होईल

४.दरवाजे, तटबंदी व बुरुज :

आज बऱ्याच किल्याच्या तट बुरुज व तटबंदी ढासळलेली आहे. काहींची तर पूर्णपणे नामशेष झालेलेली आहे. सह्यद्री प्रतिष्ठानने आजवर मोहिमेत अभ्यासपूर्ण यांची निगा राखून डागडुजी केली आहे.

 

 

५. दिशादर्शक, स्थळदर्शक:

नकाशा व किल्याचा माहिती फलक लावणे जेणे करून किल्यावर येणाऱ्या शिवप्रेमींना किल्ल्याचा इतिहास व स्थळांची माहिती होईल.

६. किल्ल्याचे विद्रुपीकरण थांबवणे:

,सध्या काही डोकेफिरू पर्यटक किल्याच्या तटबंदी बुरुज गुहा यांचावर आपली नावे ओईल पेंटने लिहितात आणि बदाम काढून हा किल्ला जणू त्यांची स्वताची मालमत्ता आहे असे दाखवण्याच्या प्रयत्न करतात. ती नावे पुसण्याचे काम प्रतिष्ठानच्या दुर्ग संवर्धन मोहिमेत होत आहे.

७.सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्ग संवर्धन मोहिमेत स्थानिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होत आहे. गड रक्षक नेमणे, वाटाड्या प्रशिक्षण देणे, गावातील अदिवाशी पाड्यात गरजूंना कपडे वाटप व शाळेत वह्या पुस्तके वाटप करणे, स्थानिकांकडून गडावर जाणाऱ्या पर्यटकांची नावे नोंदणी करणे यात स्थानिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होत आहे.

८. वृक्षलागवड :

प्रतिष्ठान कडून पावसाळ्यात किल्याच्या परिसरात पठारावर व डोंगरसोंडेच्या पायवाटावर देशी वृक्ष लागवड करून गावकऱ्यांच्या मदतीने त्याचे संवर्धन केले जात आहें.

 

wildrangers.in

२०१७ मध्ये राज्य पुरातत्व विभग व महाराष्ट्र राज्य वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील विविध किल्यांवर वृक्ष लागवड करण्यात आली.

९. तोफा व विरगळ :

किल्यावरील अस्ताव्यस्त पडलेल्या तोफा व्यवस्थित ठेवणे तटा बुरुजांचे कोसलेले चिरे योग्य त्या ठिकाणी ठेवणे, तसेच किल्यावरील दगडी मुर्तीशिल्पे, विरगळी यांचे संवर्धन करणे हे कार्य प्रतिष्ठान करत असते.

१०.अपरिचित किल्ल्यांचा अभ्यास करून त्याचे संवर्धन करून त्याची महाराष्ट्रभर जनजागृती करणे हे काम प्रतिष्ठान सातत्याने करत आहे.

आंदोलन जनहित याचिका :

देशातील एकमेव संस्था जिने गडकिल्ले संवर्धनासाठी श्री श्रमिक गोजमगुंडे यांच्या नेतृवाने ६ वेळा मुंबई मधील आझाद मैदान, शनिवार वाडा, सिंहगड किल्ला व महाराष्ट्र राज्य बालभारती येथे उपोषण, रास्ता रोखो, जेल भरो, चीनी वस्तू वर बहिष्कार टाकणे अशी विविध प्रकारची आंदोलने करून जनसामान्यात दुर्ग संवर्धन चळवळ उभी केली. सह्याद्री प्रतिष्ठानने मुंबई उच्च न्यायालयात दोन वेळा गडकिल्ले संवर्धन करता जनहित याचिका दाखल केली.

आंदोलनाचे यश :

१. सिंहगड किल्याला राज्य शासन कडून पुरातत्व विभागाला दोन लाखाचा निधी उपलब्ध झाला.

२. बालभारतीच्या इयत्त ७ वी च्या पुस्तकात छत्रपती संभाजी महराजांच्या जन्माची नोंद करण्यात आली.

३. केंद्र पुरातत्व विभागाकडून कडून नागलाबंदर किल्ल्याची दखल घेण्यात आली.

४. आणि राज्यातील ४६ किल्ले ऐतिहासिक वास्तू मंदिरे लेणी आणि समाध्या यासाठी ४६ करोड ९० लाख निधी ची तरतूदीस पाठपुरावा केला.

५. सह्याद्री प्रतिष्ठान कडून वेळोवेळी गडकिल्ले संवर्धनासाठी सरकार व संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करून संवर्धनविषयी पाठपुरावा केला जातो.

७.सह्यद्री प्रतिष्ठान कडून किल्ल्यांच्या महितीचे app तयार केले गेले आहे. तसेच प्रतिष्ठानच्या वेब साईट www.sahyadripratishthan.com वर प्रतिष्ठान,ऐतिहासिक स्थळ,ऐतिहासिक व्यक्ती यांच्या विषयी माहिती प्रसारित केली जाते. नवीन इतिहास संशोधक यांच्यासाठी ५०० हून अधिक pdf  स्वरुपात ऐतिहासिक पुस्तक मोफत दिली जातात.

८. फोटो व शस्त्रप्रदर्शने :

सह्याद्री प्रतिष्ठानने महाराष्ट्रात प्रथमच महराष्ट्रातील ३३३ किल्याचे ४५००० फोटो प्रदर्शन भरवले या कार्यक्रमात शिवसेनेचे पक्ष प्रमुख श्री उद्धव ठाकरे उपस्थित होते, तसेच या प्रदर्शनाची लिम्काबुक ऑफ रेकोर्ड मध्ये नोंद झाली. याच सोबत दुर्गमहर्षीश्री प्रमोद मांडे व श्री उद्धव ठाकरे यांच्या फोटोंचेही प्रदर्शन महाराष्ट्रभर भरवण्यात आले.

आज शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रतिष्ठान विविध कार्यक्रमा दरम्यान किल्याच्या माहितीचे फोटो प्रदर्शन भरवले जाते. ऐतिहासिक शस्त्रे, वस्तू , प्रदर्शने भरउन लोकांना मोफत त्याची माहिती पुरवली जाते.

सह्याद्री विशेष

१. १ जानेवारी २०१७:

सह्याद्रीच्या शूर मावळ्यांना धारतीर्थ मोहीम आयोजन करून त्यांच्या समाधी स्थळ व वीर मरण आले अश्या स्थळ व किल्यांवर प्रतिष्ठानच्या सदस्यांनी जाऊन मानवंदना दिली. यात ५० किल्ले ऐतिहासिक स्थळांचा समावेश होता.

२. रायगड किल्याचा निधी

३. सिंहगड किल्याला निधी

४. किल्ले तुंग विशेष दुर्ग संवर्धन मोहीम

५. छत्रपती संभाजी महराजांच्या जन्म तारखेची बालभारती मध्ये नोंद

लिम्का बुक ऑफ रेकोर्ड:

१. ३३३ किल्याचे ४५०००० फोटो याचे लिम्का बुक ऑफ रेकोर्ड गेल्या काही वर्षापासून प्रतिष्ठानच्या नावावरच आहे.

२. मिशन ३०० महराष्ट्रातील ३०० किल्यांवर एकाच दिवशी एकाच वेळी स्वच्छता व भगवा ध्वज फडकवणे हा रीकोर्ड ३० मार्च २०१६ रोजी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद आहे. पुढे याची सविस्तर माहिती देत आहे.

११. सामाजिक कार्य: गडकिल्ले संवर्धन प्रमाणे प्रतिष्ठान सामाजिक कार्यातही अग्रेसर आहे. त्याचाच भाग म्हणून

एक हात मदतीचा या अंतर्गत नाम फाउंडेशन संयुक्त विद्यमानने गरीब शेतकरी व शेतकरी कुटुंबातील कर्त्या पुरुष ज्यांनी आत्महत्या केली अश्या परिवाराला मदत करण्यात येते.

आदिवाशी पाड्यात गरजू विद्यार्थांना कपडे, वह्या वाटप करणे व शाळात गडकोट माहिती विषयी स्लाईड शो दाखवणे.

रक्तदान शिबीर घेणे व गरजू रुग्णांना तत्काळ रक्त पुरवठा करणे

दुष्काळ भागातील स्थलांतरितांना अन्न्चात्रलयाच्या माध्यमातून सलग ४ महिने हजारो लोकांना मोफत जेवण देण्यात आले.

सह्याद्री प्रतिष्ठान विद्यार्थी परिषद अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना इयता दहावी बारावी व स्पर्धा परीक्षा यांचे मार्गदर्शन शिबीर आयोजित करणे.

महाराष्ट्र राज्य पोलिसांच्या कार्याला कृतज्ञाता म्हणून सन्मान सोहळ्याचे आयोजन केले जाते.

शौर्य तुला वंदितो:

सह्याद्री प्रतिष्ठानने आतापर्यत सामाजिक आपुलकी म्हणून प्रतिष्ठानने “शौर्या तुला वंदितो” या माध्यमातून ८ वेळा पुण्यात कार्यक्रम घेऊन कारगिल युद्धात लढलेले निवृत्त जवान, शहीद झालेले जवानांच्या वीर पत्नी यांचा सन्मान करण्यात आला आहे.

या कार्यक्रमातून सीमेवरील शहीद जवान यांचे कुटुंबाला मदत करणे, सीमेवर कारगिल, १६६५, १९७२ व १९९९ या युद्धात शौर्य गाजवणाऱ्या जवानांचा त्यांच्या निवृत्ती नंतरही सन्मान करणे, असे विविध कार्य प्रतिष्ठान सामाजिक बांधिलकी राखून करत आहे.

१२. सह्याद्री पुरस्कार, शिवदुर्ग अस्मिता पुरस्कार, शिवरथ पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार असे पुरस्कार दरवर्षी शिवकार्य, दुर्ग संवर्धन करणार्या संघटना, व्यक्ती व विविध क्षेत्रातील याना देऊन त्यांचा गौरव केला जातो.

१३. सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्यात सहभागी होण्यासाठी संपर्क : प्रतिष्ठानचे माहिती व संपर्क प्रमुख
श्री राज बलशेटवार (८७८८४२५५२९) व कार्यअध्यक्ष श्री निलेश जेजुरकर (७३८७४९४५००) यांना संपर्क करावे व वेब साईट वर मोफत सदस्य नोंदणी करावी.

मिशन ३०० विषयी थोडक्यात

मिशन ३०० : दि.३० मार्च २०१६ रोजी महाराष्ट्रातील ३०० किल्यांवर स्वच्छता मोहीम व स्वराज पताका लावून स्वराज्य सिद्धी संकल्प केला साजरा. त्याची लिम्का बुक ऑफ रेकोर्ड मध्ये नोंद झाली.

महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या इतिहासात महाराष्ट्रातील किल्ल्यांचे फार महत्व आहे. महाराष्ट्रातील याच गड-किल्यांच्या सहाय्याने छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले.

खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य केले. आपल्या पूर्वजांच्या बलिदानाने आपण स्वतंत्र झालो. त्या समस्त मराठी जनतेचे प्रतिक असलेले हे गड-किल्ले आज दुरावस्थेत आहेत.त्याच गाड्कील्यांना एक मानवंदना म्हणून सह्याद्री प्रतिष्ठाने महाराष्ट्रातील ३०० किल्यावर भगवा ध्वज व स्वच्छता मोहीम राबवली.

 

youtube.com

इ.स.“३० मार्च १६४५ रोजी रायरेश्वरावर छ. शिवाजी महाराजांनी आपल्या रक्ताचा अभिषेक करून आपल्या मावळ्यांसह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि प्रतिकूल परिस्थिती आपल्या स्वप्नातील रयतेचे राज्य स्थापन केले. त्याच शुभ दिवसाचे अवचित्त साधून सह्याद्री प्रतिष्ठान आयोजित ३०० किल्यावर स्वराज्याची पताका व स्वच्छता मोहीम राबवून भारतात पहिल्यांदाच साडेतीनशे चारशे वर्षा नंतर ३०० किल्ल्यावर एकाच दिवशी एकाच वेळी स्वराज्याच्या पताका लावून व स्वघ्छ्ता मोहीम करून एक आगळी वेगळी मानवंदना महाराष्ट्रातील गडकिल्यांना देण्यात आली.

या मोहिमांचे महाराष्ट्रभर नेतृव हे सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री श्रमिक गोजमगुंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. तसेच प्रतिष्ठानचे कार्यकारी अध्यक्ष आ.श्री. संजय केळकर यांनी मोहिमेचे नियोजन केले.

अनेक इतिहास संशोधक व मान्यवरांनी या उपक्रमात सहभाग घेतला. या उपक्रमासाठी सह्याद्री प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी शर्थीचे प्रयत्न करून हा उपक्रम महाराष्ट्रभर यशस्वी केला.

सह्याद्री प्रतिष्ठानचा मूळ उद्देश हा येणाऱ्या पिढीने यातून प्रेरणा घेऊन राष्ट्रकार्यासाठी झटावे. गडकिल्ले हे आपले तीर्थस्थान आहेत यांच्या पराक्रमाची जागर नवीन पिढीला व्हावी व इतिहासाची पाने उलगडून त्यांनी ही या गडकिल्ले संवर्धन प्रवाहात यावे. आज जर नवीन पिढी यात सहभागी झाली तर गडकिल्ले संवर्धनासाठी भविष्यात खूप चांगले दिवस येतील.

आज शेवटची घटका मोजत असलेले गडकिल्ले आपल्या सर्वांच्या मदतीचा टाहो फोडत आहेत. आपण आपल्या मौल्यवान वेळातून त्यांचाकडे लक्ष देनायची गरज आहे.

तरुण मिशन ३०० या उपक्रमा नंतर मोठ्या उस्ताहात गडकिल्ले संवर्धन विषयी जाणून घेऊन या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करत आहे.

तसेच भारतात झालेला हा प्रथमच आगळावेगळा उपक्रम असून याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. या पुढेही नवीन पिढी व महाराष्ट्राच्या जनतेला सोबत घेऊन गाड्किले संवर्धन जनजागृती प्रतिष्ठान करत राहील.

मिशन ३०० लिम्का बुक नोंद झाली त्या उपक्रम याबद्दल थोडक्यात..

मिशन ३०० हा संकल्प सह्याद्री प्रतिष्ठानने केला होता व तो यशस्वी रित्या पूर्ण होऊन महाराष्ट्रातील एकूण ३०० किल्यावर तो राबवण्यात आला.

१. मोहिमे दरम्यान गडावरील बुरुज व तटबंदी वरील अनावश्यक झुडपे, प्लास्टिकच्या बाटल्या, काचेचे तुकडे, इत्यादी कचरा गोळा करून त्याची गडाच्या पायथ्याशी विल्हेवाट लावण्यात आली.

२. ज्या गडावर दुर्ग संवर्धन मोहीम घेतली गेली तेथे स्वच्छतेसाठी साठी लागणारे साहित्य शिवप्रेमींनी सोबत नेले होते उदा. गार्बेज पिशव्या (कचरा गोळा करण्यासाठी), झाडू व इतर साहित्य.

३. गडाच्या तटबंदी, बुरुज किवा दरवाज्यावरील कोणत्याही ऐतिहासिक वास्तूला धक्का न लावता शक्य होईल त्या ठिकाणी भगवा ध्वज लावण्यात आला.

४. एका किल्यावर कमीत कमी २५ ते ३० पदाधिकारी सहभागी होते.

५. मोहिमे दरम्यान गडावर फुलांचे हार व दरवाज्यावर तोरण लावण्यात आले. गडाच्या दरवाज्याची व उंबरठ्याची पूजा करण्यात आली.

 

 

६. मोहिमे दरम्यान मोहिमेतील प्रमुख सदस्याने गडाच्या इतिहासाचे कथन करून त्या गडाच्या इतिहासाला उजाळा देण्यात आला.

७. या मोहिमे महाराष्ट्रभर जणू दुर्ग संवर्धन मोहिमांची लाटच उभी राहिली आहे. जागोजागी महाराष्ट्रातून शिवप्रेमींचा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला व अनेक संस्था, मंडळे, ट्रेकिंग ग्रुप व शाळकरी मुलांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. या सर्वांचे मनपूर्वक आभार व हार्दिक अभिनंदन.

८. मिशन ३०० मध्ये हजारो शिवप्रेमींच्या सहभागाने मोठ्या प्रमाणात गडकिल्ले संवर्धन व संवर्धनाची जनजागृती करण्यात आली. आता गाड्कील्यान्या जनमानसातून दुर्ग संवर्धनाच्या दृष्टीने चांगले दिवस येतील अशी आशा आहे.

९. हे नियोजन महाराष्ट्र राज्य सरकार,महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग,केंद्रीय पुरातत्व विभाग,वन विभाग,जिल्हाधिकारी,व स्थानिक पोलीस स्टेशन यांच्या रीतसर परवानगीने यशस्वी झाले यांनी केलेल्या मोलाच्या सहकार्य व परवानगी दिल्याबद्दल या सावांचे मनपूर्वक आभार

१०. मोहिमेत सहभागी होणाऱ्या सदस्यांना आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी काही दुर्घटना होऊ नये म्हणून संरक्षणसाठी योग्य ती काळजी घेण्यात आली. रोप हार्नेस व अत्यावशक औषध उपचार तसेच स्थानिक हॉस्पिटल यांच्या संपर्कात राहून प्रत्येक सदस्याची काळजी घेण्याकरिता उपायोजना करण्यात आली होती.

–  श्री गणेश दत्ताराम रघुवीर
अध्यक्ष दुर्ग संवर्धन विभाग
सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य
(घेतला वसा दुर्ग संवर्धन चळवळीचा)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version