Site icon InMarathi

चप्पल काढून तिरंग्याला सलाम करणाऱ्या, मराठी देशभक्ताची कथा!

santosh laxman im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या आपल्या राष्ट्रध्वजाला मान देणे, किंवा राष्ट्रगीत चालू असताना उभे राहिले पाहिजे या अशा काही गोष्टींवरून संसदेत तसेच लोकांमध्ये सुद्धा बरेच वाद होत आहेत, खरतर ह्या गोष्टी वाद निर्माण करण्यासारख्या नाहीच आहेत!

या देशाचा एक जवाबदार नागरीक या नात्याने आपल्या राष्ट्रध्वजाचा किंवा राष्ट्रगीताचा मान राखणं ही आपली नैतिक जवाबदारिच आहे!

आणि त्यासाठी काय तुम्ही उच्च शिक्षित किंवा फार मोठे तज्ञ हवेत अशातला ही भाग नाही, खूप सोपी आणि संधी गोष्ट आहे ही, पण काही जास्त शिकलेल्या लोकांनी यांचा बाऊ करून टाकला आहे!

 

 

२ वर्षांपूर्वी १५ ऑगस्ट म्हणजेच आपल्या ७२ व्या स्वातंत्र्यदिनी एक फोटो सोशल मिडीयावर खूप व्हायरल झाला. ह्यामध्ये एका पार्कमध्ये काही लोक आपल्या तिरंग्याला सलामी देत आहेत. त्यासोबतच आणखी एक माणूस त्या झेंड्याला सलामी देताना दिसून आला. हा फोटो ह्याच माणसामुळे चर्चेचा विषय ठरला.

हा माणूस त्या झेंड्यापासून थोडा दूर उभा होता, ते ह्यासाठी कारण त्याचे कपडे तेवढे स्वच्छ नव्हते, त्याने त्याच्या खांद्यावर असलेली झोळी काढली नाही पण पायातली चप्पल मात्र काढून ठेवली. आणि ह्यानेच सर्वांच लक्ष वेधून घेतलं.

ह्या फोटोवर अनेकांनी अनेक तर्क वितर्क लावले, काहींनी असं म्हटलं की,

“ह्या माणसाच्या मनात आपल्या तिरंग्याबाबत किती सन्मान किती आदर आहे. तर काहींनी असं म्हंटल की, जवळ जाऊन त्याला सलामी देण्याचीही मुभा नाही. कारण त्यासाठी तो स्टेटस हवा. म्हणजे त्याला किती अवघड वाटलं असेल त्या झेंड्याजवळ जायला.”

जी ह्या फोटोत प्रकर्षाने जाणवत आहे.

 

 

मग ह्यावर सोशल मिडीयावर लोकांनी आपल्या वेगवेगळ्या भावना प्रदर्शित करायला सुरवात केली. एकाने अगदी भावूक होऊन लिहिले की,

“भिक मागणाऱ्या ह्या व्यक्तीने चप्पल काढून झेंड्याला सलामी दिली ह्याने त्या सर्वांना धडा मिळाला असेलं ज्यांना ह्या देशात राहायला भीती वाटते किंवा जे ह्या देशाने त्यांना काय दिले ह्यावर चर्चा करत असतात… स्वतंत्रता दिनाची ह्याहून जास्त चांगली फोटो राहूच शकत नाही.”

फेसबुकवर काही लोकांनी ह्या व्यक्तीला पागल, रीयल हीरो ऑफ इंडिया तसेच हॅशटॅग सुदामा सारखे विशेषणं लावले. काहींनी असं देखील लिहिलं की, हा फोटो त्यांच्या गावातील आहे. काही क्रिएटिव्ह लोकांनी तर असा दावा केला की, त्यांनी हा फोटो काढला आहे.

 

 

पण ह्या फोटोचे नेमके सत्य काय आहे हे आज आपण जाणून घेणारं आहोत…

ह्याची पडताळणी साम टीव्ही न्यूज ने केली. त्यांनी ह्या फोटोमधील त्या सलामी देणाऱ्या व्यक्तीलाच शोधून काढलं आणि त्याची मुलाखत देखील घेतली. तसेच ज्याने हा फोटो टिपला त्याची देखील मुलाखत घेतली.

 

 

आता बघूया त्यादिवशी नेमकं काय घडलं…

१५ ऑगस्ट २०१८ ला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात अनिल घाडगे नावाच्या एका व्यक्तीला कराड ह्या ठिकाणी काही काम होते, पण ते कोरेगाव येथे होते. त्यामुळे ते कोरेगावं रेल्वे स्थानकावर पोहोचले, तेव्हा तेथे झेंडा वंदन होत होते. स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी आणि रिक्षेवाले गार्डन परिसरात जमले होते. झेंडावंदन झाले आणि मग सर्वांनी त्या झेंड्याला सलामी दिली.

एक व्यक्ती हे सर्व दूर उभं राहून बघत होता. तो एखाद्या मानसिक रोग्याप्रमाणे दिसत होता. त्यावेळी त्याने देखील पायातील चप्पल काढत तिरंग्याला सलामी दिली.

साम टीव्हीच्या अनिल ह्यांनी सांगितले की, हे दृश्य बघून त्यांना गहिवरून आले आणि त्यांनी खिश्यातून फोन काढला आणि हे सुंदर चित्र आपल्या फोनच्या कॅमेऱ्यात कैद केलं. त्यानंतर हे छायचित्र त्यांनी फेसबुकवर टाकलं.

 

 

त्यानंतर जे काही घडलं ते तर आपल्या सर्वांनाच माहित आहे.

ह्या फोटोमधील त्या सलामी देणाऱ्याव्यक्तीचे नाव संतोष लक्ष्मण आहे. संतोष हे साताराच्या कराड येथील आहेत. ते बुरुड गल्लीत राहतात आणि ते एक मानसिक रोगी आहेत. हा फोटो व्हायरल झाल्यानतर रत्नागिरी जिल्ह्यातील एक सामाजिक संस्था संतोष ह्यांच्या उपचारासाठी समोर आली आहे.

एक घटना जी त्या दिवशी कदाचित भारताच्या इतरही भागांत घडली असावी पण ती फक्त अनिल ह्यांना महत्वाची वाटली आणि त्यांनी ती आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. ज्यामुळे आज संतोष हे भलेही मानसिक रोगाने त्रस्त असले तरी त्याच्या मनातील देशप्रेमाची भावना अजूनही आहे.

 

अनिल सांगतात की,

“ह्या फोटोच्या माध्यमातून असे कळून येते की, मानसिक रोग असतानाही संतोष ह्यांच्यात देशाप्रती किती आदर आहे. तसेच त्यांच्यात एवढी बुद्धी असताना देखील आज ते अश्या परिस्थितीत आहेत.”

ह्याबाबत साम टीव्हीने एक व्हिडीओ देखील जारी केला आहे ज्यामध्ये त्याच रेल्वे स्थानकाच्या एका बेंचवर अनिल आणि संतोष बसलेले आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version