Site icon InMarathi

अजातशत्रू वाजपेयींच्या मृत्यूवर ह्या विकृतांनी केलेल्या टिपण्या किळसवाण्या आहेत

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपायी यांनी काल दिल्ली येथील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. लोकप्रिय वक्ते, प्रतिभावंत कवी, कर्तव्यदक्ष राज्यकर्ते आणि आणखीही बरेच काही.. अशा चौफेर भूमिका समर्थपणे वठवत असताना भारतीय जनमानसावर कायमची छाप सोडून जाणाऱ्या अटलजींना त्यांच्या समर्थकांसह राजकीय विरोधकांनीही मनापासून श्रद्धांजली वाहिली.

अनंताच्या प्रवासासाठी निघालेल्या या कालजयी नेत्याचे अंत्यसंस्कार पाहताना अनेकांचे डोळे पाणावले.

भारतातील सहिष्णू राजकीय संस्कृतीचा चेहरा असणारे अटलजी अजातशत्रू होते. राजकीय वैर असलं तरी तेवढ्याच मर्यादेत ठेवून विरोधकाबरोबरही मित्राच्या नात्याने राहू शकत होते.

 

kremlin.ru

कॉंग्रेसच्या दीर्घकालीन कारभारावर ताशेरे ओढणाऱ्या नेत्यांना

“साठ वर्षात आपण काहीच मिळवलं नाही असं म्हणणं म्हणजे देशाच्या पुरुषार्थावर प्रश्नचिन्ह उभे करण्यासारखं आहे.”

असं खडसावून सांगताना त्यांनी पक्षीय राजकारणापेक्षा देश, इथली लोकशाही, इथली संस्कृती सर्वोच्च असल्याची जाणीव करून दिली. एम्स रुग्णालयात ते अत्यवस्थ असताना अख्खा देश त्यांच्यासाठी प्रार्थना करत होता. मंदिरापासून मशिदीपर्यंत लोक प्रार्थना करताना दिसून आले.

पक्ष, धर्म यांच्या पलीकडे जाऊन लोकांच्या मनात असं स्थान मिळवणारा नेता विरळाच. अटलजींना हे साधता आलं हे त्याचं कर्तृत्व होतं.

असं असली तरी अटलजींच्या विचारधारांना विरोध असणार्या अनेकांनी समाजमाध्यमात त्यांच्याविषयी गेल्या दोन तीन दिवसात जी गरळ ओकली ती पाहून कुणाही सामान्य माणसाला चीड येईल.

माणूस गेल्यानंतर वैर संपते ही आपली संस्कृती आहे. पण विरोधकांच्या नावाने “तुम्ही असहिष्णू आहात” म्हणून बोंब मारणाऱ्या कित्येकांनी त्यांची असहिष्णुता अटलजींच्या दुर्दैवी मृत्युनंतर समोर आणत बुरख्यामागे लपलेला त्यांचा खरा चेहरा दाखवलाच.

स्वतःला पत्रकार म्हणवून घेणाऱ्या लोकांनी त्यांच्या विचारांचं घडवलेलं ओंगळवाण दर्शन भारताने पाहिलं.

“द वायर” या वेब पोर्टलने वाजपेयींच्या मृत्युनंतर केलेली बातमी पहा. स्वघोषित लिबरल लोकांनी डोक्यावर घेतलेल्या या वेब पोर्टलने बातमीच्या मथळ्यातच त्यांची हीन विचारसारणी दाखवून दिली आहे.

 

thewire.com

 

इतिहास आणि सामाजिक विषयांवर ज्यांचे लिखाण मोठ्या प्रमाणावर अभ्यासले जाते त्या रामचंद्र गुहा यांनी लिहिलेल्या लेखाचा हा मथळा पहा. अटलजींच्या मृत्युसमयी देखील त्यांच्या आडून त्यांच्या विचारसरणीवर टीका करण्याची संधी गुहा यांनी सोडली नाही.

 

scroll.in

“असहिष्णू लोकांच्यातला कवी” मथळ्याखाली स्क्रोल या वेबपोर्टलणे त्यांचा हा लेख प्रकाशित केला आहे.

हे झालं वेब पोर्टलच्या बाबतीत, मुक्त-विचारवंत म्हणवणाऱ्या अनेकांनी तर आपल्या मनातील कलुषित विचार व्यक्त करण्यासाठी वैयक्तिक सोशल मिडिया स्पेसचा पुरेपूर वापर केला.

पूर्वाश्रमीचे आयबीएन लोकमत, न्यूज १८ लोकमत, मी मराठी इत्यादी वाहिन्यांचे धडाडीचे पत्रकार आणि सध्या कुठेच न दिसणारे निखील वागळे यांनीही अटल बिहारी यांच्याबद्दल बोलताना नेहमीप्रमाणे मोदीविरोधाची संधी साधली.

 

त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून १६ ओगस्ट या दिवशी केलेल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की

“गुजरात दंगलीच्या वेळी अटलजी व्यथित झालेले होते. तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची इच्छा होती. पण अडवाणी यांनी त्यांची समजूत काढत मोदींना पाठीशी घातले. मोदींची सरकार चालवण्याची पद्धत त्यांना मान्य नव्हती.”

वागळे यांच्या या म्हणण्यात तथ्य आहे की नाही यावर वाद होऊ शकेल. पण अटलजींच्या मृत्युनंतर देश शोकसागरात बुडालेला असताना अशा राजकीय टिप्पण्या सुचण्याला आपल्या मनात विरोधकाबद्दल प्रचंड द्वेष अस्तित्वात असावा लागतो. तो वागळे यांच्या ठायी आहे हेच त्यांच्या या ट्विट मधून दिसून आले.

असेचं आणखी एक उदाहरण मध्ये २००२ मधील दंगलीवर “गुजरात फाइल्स” हे पुस्तक लिहिणाऱ्या लेखिका राणा अय्युब यांची फेसबुक पोस्ट.

 

facebook.com

या त्यांच्या पोस्टमध्ये व्यक्त केलेला आक्षेप नवीन नाही. तो त्यांनी याआधीही बोलून दाखवला आहे. त्या म्हणतात,

“त्यांनी बाबरी मशीद पाडण्याच्या मोहिमेचे नेतृत्व केले.. १९९३ साली झालेल्या मुस्लीमविरोधी दंगलीच्या मागे त्यांचा हात होता. २००२ च्या दंगलीच्या वेळी हजारो मुस्लिमांच्या कत्तली झाल्या तेव्हा ते पंतप्रधानपदावर होते.”

आपले मत जर वाजपेयी यांच्या समर्थकांनी लक्षात घ्यावे हा त्यांच्या पोस्टचा उद्देश असेल तर वाजपेयींच्या मृत्युच्या वेळीच ते करणे योग्य की अयोग्य हे किमान आकलन असलेला कुणीही सांगू शकेल.

पत्रकारितेतील मानदंड ठराविक वर्गात मान्यता मिळवलेल्या या विकृत स्वघोषित विचारवंत स्त्रीचे ट्विट पहा.. त्या म्हणतात,

“अटल बिहारी वाजपेयी मेले. दिल्लीकारांनो. जाम झालेल्या रस्त्यांना सामोरे जाण्यासाठी तयार राहा”

 

twitter.com

द्वेषाची पेरणी करण्यात या बाईंनी कसलीच कमी सोडलेली नाही. ज्या नेत्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी देल्लीच्या रस्त्यावर तब्बल दीड लाखाची गर्दी उसळते, त्याबद्दल आपण कसे बोलावे याचे किमान भान त्यांना नाही.

यावर कडी केली ती म्हणजे “आंबेडकर कारवान” नावाच्या एका ट्विटर अकाउंटने. आंबेडकरांचे नाव घेताना हे पेज चालवणाऱ्या व्यक्तीने विकृतीची सीमा गाठली आहे! जाणवे घातलेल्या डुकराचा फोटो पोस्ट करत तो म्हणतो,

“एका ब्राम्हणाने वाजपेयी नरकात पोहोचल्याची ग्वाही दिली आहे.”

 

परस्पर संवादाची आणि सहिष्णुतेची परंपरा या देशाला शिकवणाऱ्या डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाखाली असा प्रकार होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. हे त्यांचे विचार नक्कीच नाहीत. असूच शकत नाहीत. याला फक्त विकृती म्हणता येईल.

एरवी विरोधकांना “असहिष्णू, हिंसक, आक्रमक” वगैरे म्हणत असणाऱ्या लोकांनी हे सर्व केले आहे.

आपणच आपला दांभिक आणि दुतोंडीपणा  उघडा कसा पडावा हे त्यांच्या या वर्तनावरून कळेल. द्वेष बुद्धीवर इतका हावी झाला आहे की त्यांना हे प्रकार करताना किमान औचित्याचे भान राहिलेले नाहीय.

त्यांच्याबद्दल लोक काय विचार करतील हा एक भाग. पण यापेक्षा महत्वाचा दुसरा भाग म्हणजे भारताच्या सर्वसमावेशक आणि सहिष्णू राजकीय संस्कृतीला काळिमा फासण्याचे अक्षम्य कृत्य यांनी केले आहे.

त्यांची भक्ती करणाऱ्यांना हे लक्षात आलेले असो अथवा नसो. सामान्य माणूस या स्वघोषित विचारवंतांच्या कितपत पाठीशी उभा राहतो हे आपण पहिले आणि  भविष्यात पाहणार आहोत..

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा:facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version