अटल बिहारींचा मृत्यू आणि माध्यमांचा निर्लज्जपणा
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
“तो एक माणूस आहे! त्याच्या मृत्यूची घोषणा डॉक्टर्सनी करायची असते! न्यूज चॅनल ने नाही!”
टेलिव्हिजन चॅनल्स ह्या “लेटेस्ट अपडेट्स”च्या पाई किती खालच्या थराला जाऊ शकतात ह्याला सीमा नाही. दरवेळी एक नीच पातळी गाठतात, आम्हाला ती नीचतम वाटते. पण काहीच दिवसांत नवा तळ शोधतात.
आज जे काही घडतंय ते असंच. लाज वाटायला लावणारं.
हेच बेगडी सत्य दाखवणारी, न्यूज रूम ही टीव्ही सिरीज, मला स्वतःला मीडियातील एक अत्यंत छोट्या स्तरावरचा माणूस म्हणून फार फार आवडते.
एका ACN नावाच्या चॅनेलमधील सच्च्या पत्रकार लोकांच्या रोजच्या जीवनाची कहाणी आहे ही. सतत रिव्हिजन करत असतो मी ह्या सिरीजची, आपल्या जबाबदारीचं भान रहावं म्हणून.
त्यात एक प्रसंग आहे.
एका “काँग्रेस वूमन” (म्हणजे तिकडची लोकनिर्वाचित संसद प्रतिनिधी) वर कुणीतरी गोळी झाडून हल्ला करतो.
ही घटना घडते आणि लगेच सर्व वाहिन्यांचे प्रतिनिधी इस्पितळात धाव घेतात, तिथून लाईव्ह वार्तांकन करत असतात. प्रत्येक चॅनल “सबसे तेज” स्पर्धेत उतरतं. आणि त्यातच…
ती काँग्रेस वूमन मृत पावल्याची बातमी एका चॅनलवर दिली जाते.
काही क्षणातच दुसऱ्या चॅनलवरपण बातमी झळकते.
पण acn वाले ही बातमी देत नाही. कारण – घटनेचं कॉन्फर्मेशन मिळालेलं नसतं. हॉस्पिटलमधून कुणीही ह्या बातमीला दुजोरा देत नाही. खात्रीशीर माहितीशिवाय “मृत” घोषित करण्यास acn तयार नसतं.
काही मिनिटांत चॅनलचा व्हाईस प्रेसिडेंट धाड धाड पावलं आपटत स्टुडिओ मध्ये येतो. मोठ्याने विचारतो –
Why hasn’t he called it yet?!!! त्याने (म्हणजे टीव्हीवर दिसणाऱ्या न्यूज अँकरने) अजूनही मृत्यूची बातमी का दिली नाही?
तो पुढे जे म्हणतो – ते ऐकून माझा नेहेमी संताप होतो –
“दर सेकंदाला लोक चॅनल बदलत आहेत. लेटेस्ट बातम्या बघत आहेत. दर सेकंद, जो तू मृत्यूची घोषणा करण्यास दडवत आहेस, आपण लाखो दर्शक आणि लाखो रूपये गमावतोय.”
आणि ह्यात, चॅनेलचा प्रोड्युसर – जो न्यूज अँकरला सूचना, नवनवीन अपडेट्स देत असतो – तो पुढे येऊन म्हणतो –
It’s a person! A doctor pronounces her dead! Not the news…!
ती एक माणूस आहे! तिच्या मृत्यूची घोषणा डॉक्टर्सनी करायची असते! न्यूज चॅनल ने नाही!
कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की हेच वाक्य आम्हाला आमच्या न्यूज चॅनेल्सना सांगावं लागेल.
बेशरम. निर्लज्ज.
लाज वाटते ह्या “पिलर ऑफ डेमोक्रसीची”.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.