' वाजपेयी आणि कलाम यांच्या दूरदृष्टीमुळेच भारत “अण्वस्त्रसज्ज” होऊ शकला! – InMarathi

वाजपेयी आणि कलाम यांच्या दूरदृष्टीमुळेच भारत “अण्वस्त्रसज्ज” होऊ शकला!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

अटल बिहारी वाजपेयी राजकीय नेते होते, तसेच ते कवी आणि लेखकही होते. त्यांची रसाळ भाषणे आजही आपण ऐकली की एका वेगळ्याच दुनियेत आपण जातो.

त्यांच्या भाषणात पांडित्य होते, तरी सर्वसामान्य माणसालाही त्यांची वाणी सहज अवगत होऊ शकेल अशी किमया त्यांच्याकडे होती.

अटलजींनी राजकीय फड गाजवला. त्याच बरोबर त्यांनी लोकांच्या मनात मानाचे स्थान निर्माण केले. ते शब्दांचे प्रभू होते, शब्दांचे दास नव्हते. म्हणूनच त्यांच्या ओघवत्या शब्दातील काव्य वाचून आपण हरवून जातो.

राजकीय नेता होण्यासाठी अंगात कठोरता असावी लागते. पण अटल बिहारी वाजपेयी हे मृदू मनाचे होते, असे त्यांच्या कविता वाचल्यावर आपल्याला जाणवते.

 

Atal-Bihari-Vajpayee-inmarathi
responsiblecorporate.com

 

कठोरपणे राजकारणही करायचं आणि तितक्याच मृदूपणे काव्य रचायचे. सर्वच राजकीय नेत्यांना ही कीमया साधता येत नाही.

अटल बिहारी वाजपेयी अनेक कारणांमुळे आपल्या लक्षात राहतील.

पण ११ मे १९९८ ला पोखरण येथे केलेली अणू चाचणी आपण कधीच विसरु शकत नाही. या अणू चाचणीत माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचाही मोलाचा वाटा होता.

हा दिवस भारतीय इतिहासातील एक अभिमानाचा क्षण आहे.

दिनांक १० मार्च १९९८ ला लोकसभेत विजय मिळवून भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेत आले. घौरी क्षेपणास्त्राची चाचणी पाकिस्तानने यशस्वीरित्या घेतल्यानंतर भारताची अणुचाचणी करण्याचा निर्धार केला.

पंतप्रधानपदाची शपथ घेण्याच्या एक दिवस अगोदर म्हणज्र १८ मार्च १९९८ ला वाजपेयी यांनी घोषित केले की देशाच्या सुरक्षेसंदर्भात कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही.

देशाच्या सुरक्षेच्या व सार्वभौमत्वासाठी आण्विक चाचण्यांसह सर्व पर्याय खुले असतील.

आण्विक चाचणी प्रकल्पाचे प्रमुख डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम (त्यावेळचे डी. आर. डी. ओ. चे संचालक) यांच्या व भारतीय अणुऊर्जा आयोगाचे चेअरमन डॉ. राजगोपाल चिदंबरम्‌ यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली,

अनिल काकोडकर, सतिंदर कुमार सिक्का, एम. एस. राजकुमार, डी. डी. सुद, के. एस. गुप्ता, जी. गोविंदराज, के. संथानम्‌ आदी वैज्ञानिकांनी चाचणीची तयारी सुरू केली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

या चाचणीचे नाव ’ऑपरेशन शक्ती’ असे ठेवण्यात आले.

 

pokhran11-inmarathi
defenceupdate.in

 

अटल बिहारी वाजपेयी यांना १९९६ ला अणू चाचणी करायची होती. माजी पंतप्रधान नरसिंहराव यांनी वाजपेयींना चाचणीबद्दल सांगितले होते.

पण त्यावेळी वाजपेयींचे सरकार १३ दिवस सुद्धा टिकू शकले नाही आणि त्यांना हा निर्णय रद्द करावा लागला.

मुळात १९९५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांनी चाचणीची सर्व तयारी करुन ठेवली होती. परंतु तांत्रिक कारणांमुळे त्यांना परिक्षण करता आले नाही.

अमेरिकी उपग्रहांना पोखरणमधील चाचणीबद्दल माहित झाले होते. यामुळे त्यांना ही चाचणी करता आली नाही. पुढे वाजपेयींनी निश्चय केला की ही चाचणी करायचीच.

पण त्यांचे सरकार स्थिर नव्हते असे लक्षात आल्यावर त्यांनी हा निर्णय बदलला.

१९९८ ला जेव्हा स्थिर सरकार आले तेव्हा वाजपेयींनी अणू चाचणी करण्याची भीष्म प्रतिज्ञाच घेतली. अमेरिकेच्या उपग्रहांची नजर चुकवून ही चाचणी करायची होती.

केवळ अटल बिहारी वाजपेयी, अब्दुल कलाम आणि काही मोजक्या लोकांनाच या चाचणीची माहिती होती.

वाजपेयींना ही चाचणी लवकरात लवकर करायची होती.

चीनकडे अण्वस्त्र आहे, पाकनेही घोरी मिसाइलची चाचणी केली होती. त्याशिवाय ’गज़नवी मिसाइल’वर सुद्धा पाकचे काम सुरु होते.

अशा परिस्थितीत भारताने ही चाचणी करणे अत्यंत महत्वाचे होते असे वाजपेयींना वाटत होते. त्यात चीन आणि पाकमध्ये मैत्री वाढत होती.

अमेरिका आणि जापान सारखे देश CTBT (Comprehensive Nuclear-Test-Ban Treaty) वर हस्ताक्षर करण्यास दबाव आणत होते.

वाजपेयींना माहित होते की अणू चाचणीबद्दल जर अमेरिकेला कळलं असतं तर त्यांनी भारतावर प्रचंड दबाव टाकला असता. म्हणून या संबंधित सर्व इंजिनियर्सना सैन्याचा पोशाख घालण्यास सांगितले गेले.

 

pokran-and-kalam-inmarathi
yiutube.com

 

यामुळे सैन्याची एखादी सामान्य कारवाई सुरु आहे असे वाटेल. कुणालाही संशय येऊ नये म्हणून या संबंधित सर्व वैज्ञानिकांना थेट पोखरणला आणण्यात आले नाही.

तर त्यांना आधी इतर शहरांमध्ये जायला सांगितले व तिथून पोखरणमध्ये आले. याचे कारण अमेरिकी गुप्तचरांना याबाबतीत माहिती मिळू नये असे होते.

हे मिशन भारतीय सेनेच्या ५८ व्या इंजिनियर रेजिमेंट सोपवण्यात आले होते. ही रेजिमेंट अमेरिकी सेटेलाईटला कसाप्रकारे गंडवता येईल याचा विचारा १९९५ पासून करत होते.

चाचणीच्या १० दिवस आधी एयरफोर्सच्या AN-32 विमानाने मुंबईच्या सांताक्रूझ एअरपोर्ट येथून उड्डाण केले. या प्लेनमध्ये लाकडाचे सह क्रेट ठेवले होते. या क्रेटची रक्षा स्टेनगन घेलेले काही कमांडर करत होते.

ही क्रेट ज्यात सफरचंद ठेवतात अशाप्रकारची होती. क्रेटमध्ये धातू आणि एक कवच होते आणि त्यामध्ये स्फोटक कॅटेगरीचे प्लुटोनियमचे गोळे ठेवले होते.

हे गोळे ट्रॉम्बेच्या भाभा अण्वस्त्र ऊर्जा केंद्रात तयार केले होते आणि एका गोळ्याचे वजन ५ ते १० किलो एवढे होते.

प्लेन जोधपूरला उतरले. तिथे क्रेट उतरवून ट्रकमध्ये भरण्यात आले. कुणाला संशय येऊ नये आणि ही एक सर्वसामान्य बाब वाटावी म्हणून यासाठी विशेष सुरक्षा देण्यात आली नव्हती.

हे ट्रक रात्रि पोखरणमध्ये आले, जिथे स्फोटक डेटोनेटर आणि ट्रिगर आधीपासूनच पोहोचले होते. प्लुटेनियमचे गोळे मिळाल्यावर वैज्ञानिकांनी असेंबलिंगचे काम सुरु केले.

अमेरीकेच्या सेटेलाईटला कळू नये म्हणून सर्व काम अंधारात करण्यात आले.

rest-inmarathi

time.com

 

१९८२-८३ मध्ये जेव्हा इंदिरा गांधींनी अणू चाचणीला मान्यता दिली होती तेव्हा पोखरणमध्ये तीन दंडगोलाकार खड्डा खोदून ठेवण्यात आल्या होत्या.

१९९८ मधील चाचणी याच खड्ड्यात करण्यात आली. पण अमेरिकी गुप्तचरांना बगल देण्यासाठी काही वर्षांपासून मुद्दामून विचित्र मार्ग अवलंबण्यात आला.

साईटवर एखादा नवा खड्डा खोदला जायचा आणि कधी जुन्या खड्ड्याची सफाई केली जायची. यामुळे अमेरिकेला अनुमान लावू शकले नाही की अखेर पोखरणमध्ये नक्की काय सुरु आहे?

चाचणीच्या काही तास आधी डॉ. राजगोपाल चिदंबरम्‌ आणि डॉ. कलाम कंट्रोल रुममध्ये बसले होते. रेंजचे हवामान विज्ञानाच्या अधिकार्‍यांनी त्यांना सांगितले की हवेने जोर धरला आहे.

जोपर्यंत हवा थांबत नाही तोपर्यंत मिशन थांबवावे लागणार आहे. कारण ब्लास्ट झाल्यानंतर रेडिएशन पसरली तर आजूबाजूचे गाव नष्ट होतील. दुपारपर्यंत हवा थांबली नाही आणि तापमान ४३ डिग्री झाले.

अखेर दुपारी ३ वाजता हवा थांबली तेव्हा ३.४५ वाजता तीन उपकरणे ब्लास्ट करण्यात आले.

 

bomb-inmarathi
abplive.in

 

पोखरणमध्ये हायड्रॉजन बॉम्ब ब्लास्ट करण्यात एक समस्या होती. ती अशी की तिथून गाव खुप जवळ होते आणि म्हणून वैज्ञानिक केवळ ४५ किलो टन ब्लास्ट करणे गरजेचे होते.

तर वैज्ञानिकांनी आधीच कंप्युटरने अनुमान लावला होता की रेडिओ-ऍक्टिव्हिटीला जमिनीच्या पृष्ठभागात जाण्यापासून कसे रोकता येईल.

स्फोट अगदी व्यवस्थित झाल्यामुळे आणि कोणतेही नुकसान न झाल्यामुळे सर्व सैनिक एकत्र म्हणाले ’भारत माता की जय’ आणि सर्व वैज्ञानिकांनी एकमेकांना मिठी मारुन अभिनंदन केले.

अमेरिकेच्या नाकावर टिच्चून भारताने अणू चाचणी करुन दाखवली.

११ मे १९९८ रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी चाचणी संदर्भात जाहीर घोषणा केली,

आणि ऑपरेशन शक्ती या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या अण्वस्त्र चाचणीला ११ मे २०२० ला २२ वर्षे पूर्ण झाली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?