आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
===
अटल बिहारी वाजपेयी हे भारतातील सर्वात श्रेष्ठ पंतप्रधान होते हा मुद्दा जरी वादाचा असला तरी अटल बिहारी वाजपेयी जी भारताच्या आजवर झालेल्या सर्वश्रेष्ठ पंतप्रधानांपैकी एक होते. जेव्हा भविष्यात भारताला घडवणाऱ्या महान नेत्यांचं नाव घेतलं जाईल, त्यात अटलजींचं नाव नक्कीच असेल यात तिळमात्र शंका नाही.
अटलजी एक भारतरत्न, राजकीय धुरंदर, उत्कृष्ट संसदपटू तर होतेच पण एक प्रतिभाशाली कवी आणि प्रेमळ स्वभाव असलेले दिव्य व्यक्तीमत्व होते. त्यांचा जाण्याने एक न भरून निघणारे नुकसान देशाला झाले आहे.
एक कुशाग्र विद्यार्थी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, एक स्वातंत्र्य सेनानी ते एक अजरामर कारकीर्द असलेले प्रधानमंत्री, अटलजींचा प्रवास हा एक विविध रंगी व दिव्य प्रेरणेने भरलेला आहे. आज अटलजींचा पहिला स्मृतिदिन आहे.
आज आम्ही तुम्हाला अटलजींच्या आयुष्याचे ते सात पैलू सांगणार आहोत ज्या साठी सदैव स्मरणात राहतील.
१) शिक्षणाचा अधिकार
शिक्षणाचा अधिकार जरी काँग्रेसने दिला होता , तरी त्या शिक्षणाच्या अधिकाराचा पाया हा अटल बिहारी वाजपेयींनी रचला होता. अटल बिहारी वाजपेयींनी सर्व शिक्षा अभियानाचे कार्य हाती घेतले होते, ज्याद्वारे ६ ते १४ वयोगटातील मुलांना शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळावा अशी त्यांची भावना त्यामागे होती.
२) भारताला आण्वस्त्र सज्ज बनवले होते
जर भविष्यात अटलजींनी भारताच्या भूमीला काय दिल असा प्रश्न विचारला जाईल तेव्हा सदैव भारताला आण्वस्त्र सज्ज बनवलं हे सांगितलं जाईल.
“आपल्या कडे आता मोठे बॉम्ब बनवायचे सामर्थ्य आहे पण आपले अस्त्र नेहमी प्रतिक्रिया म्हणूनच वापरले जातील” – अटल बिहारी वाजपेयी
१९९८ साली जेव्हा भारताने एका आठवड्यात ५ अणु चाचण्या घेतल्या होत्या. याचं कारण पाकिस्तानसोबतचे तणाव पूर्ण संबंध होते. अश्यावेळी आण्विक शस्त्राने भारताच्या सामर्थ्यात विलक्षण वाढ केली होती.
तरीही अटलजी कधीच आण्विक शस्त्रांच्या वापरा विरोधात होते कारण त्यांनी हिरोशिमा , नागासाकी येथे आण्विक हल्ल्याने नष्ट झालेल्या जपानला भेट दिली होती व ती क्रूरता बघून त्यांनी हळव्या मनाने कविता देखील लिहली होती.
३) भारतीय टेलिकॉम क्षेत्राची उभारणी
काँग्रेसच्या मतानुसार भारतात टेलिकॉम क्रांती ही राजीव गांधीमुळे आली. राहुल गांधींनी तर इतपत म्हटलं की तुम्हाला मोबाईल फोन मिळाले कारण राजीव गांधींनी तुमचा आवाज ऐकला होता.
राजीव गांधींनी टेलिकॉम क्षेत्राची पायाभरणी केली हे सत्य जरी असलं तरी त्यांचा मृत्यूच्या दहा वर्षानंतर देखील भारताच्या टेलिकॉम क्षेत्रात जास्त प्रगती होऊ शकलेली नव्हती, टेलिकॉम क्षेत्राचा प्रसार हा ०.८ वरून ०.३ टक्के इतकाच होता.
परंतु वाजपेयींनी नवीन टेलिकॉम धोरण आखलं, ज्यामुळे टेलिकॉमचा प्रसार २.८% हुन ७०% पर्यंत पोहचला.
यावरून कोणी खरी क्रांती आणली हे समजलंच असेल. कोलंबिया विद्यापीठाचे प्रोफेसर अरविंद पगरिया यांनी त्यांचा पुस्तकात भारताच्या टेलिकॉम क्षेत्रातील यशस्वीतेमागे वाजपेयी असल्याचा पुनरोच्चार केला होता.
४) सत्तेत असे पर्यंत भारताचा जीडीपी त्यांनी मजबूत केला
अटलजी सत्तेत असताना, भारताने एक महाभयंकर भूकंपाचा सामना केला, दोन चक्रीवादळ बघितले, ३० वर्षातला सर्वात भीषण दुष्काळ अनुभवला.
गल्फ चे युद्ध आणि तेल समस्येचा २००३ मध्ये सामना केला. एवढं सगळं होऊन सुद्धा भारताचा जीडीपी प्रगतीपथावर ठेवण्यात अटलजींना यश आले होते.
५) अंतरराष्ट्रीय संबंध सुधारले
– अटलजींच्या काळात चीन सोबतचा सीमावाद मिटवण्यासाठी प्रयत्न झाले, व्यापारी संबंध निर्माण केले
– इस्राईल सोबत लष्करी व रचनात्मक संबंध प्रस्थापित केले
– २००८ साली तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर आले. जिमी कार्टर नंतर बऱ्याच वर्षांनी कुठल्या तरी अमेरिकन राष्ट्रध्यक्षाने भारताला भेट दिली होती. शीत युद्धामुळे अमेरिका – भारत नात्यातील दुरावा संपला व व्यापारी संबंध निर्माण झाले.
– वाजपेयी दिल्ली लाहोर बस सेवेचे पहिले प्रवासी होते, ज्या बसने भारत पाकिस्तान मध्ये कनेक्टिव्हिटी निर्माण केली होती.
६) दिल्ली मेट्रोला हिरवा कंदील दिला होता
दिल्ली च्या तत्कालिन काँग्रेसच्या मुख्यमंत्री शिला दीक्षित यांनी कितीही म्हटलं की दिल्लीला काँग्रेसने भारतातील सर्वात चांगली मास ट्रान्सपोर्ट सिस्टम दिली आहे, परंतु सत्य वेगळं आहे दिल्ली मेट्रोच्या मागे सुद्धा अटल बिहारी वाजपेयी आहेत.
त्यांनीच त्या प्रकल्पाला मंजुरी दिली आणि त्यांनीच सर्वप्रथम मेट्रोच्या पहिल्या लाईनच उदघाटन केलं होतं. काश्मिरी गेट ते सीमापूर असा प्रवास त्यांनी केला होता.
७) त्यांनी भारताला सर्वप्रथम चंद्रावर पाठवलं होतं
“आपला देश आज विज्ञानाच्या क्षेत्रात उंच भरारी घेण्यासाठि तयार आहे, मला हे घोषित करताना अत्यानंद होतो आहे की भारत त्याचं स्वता चं पाहिलं अंतराळयान २००८ ला अवकाशात सोडेल, ज्याचं नाव असेल चंद्र्यान -१”
– अटल बिहारी वाजपेयी , १५ ऑगस्ट २००३
अटलजींनी चंद्र्यान – १ च्या प्रोजेक्टला मंजुरी दिली होती. आज आपण जेव्हा इस्रोच्या अप्रतिम कामगिरीला बघतो तेव्हा आपण अटलजींनी त्यावेळी दाखवलेला विश्वास आणि दिलेली प्रेरणा विसरू शकत नाही.
आज अटलजी आपल्यात नाहीत. एक द्रष्टा नेता आपल्यात नाही. ज्याने देशासाठी आयुष्य खर्ची घातलं तो नेता आज आपल्यात नाही.
जवाहरलाल नेहरूंपासून ते आजवर अनेक नेत्यांसोबत जे बहुतेक विरोधी विचारांचे होते, अटलजींनि संबंध जपले. जेव्हा इंदिरा जी देशा साठी एक संघर्ष लढत होत्या तेव्हा विरोधात असून देखील अटलजी खंबीर पणे उभे राहिले होते. त्यामुले विरोधी पक्षात देखील त्यांचे खूप चाहते आहेत.
असा हा सर्वसमावेशक लोकप्रिय नेता आपल्यात नाही याचं दुःख भारतीय जनतेला झालं आहे. परंतु अटल जी देहाने जरी नसले तरी त्यांचा कार्यातून आणि अप्रतिम कवितांमधून सदैव जनतेच्या स्मरणात राहतील.
===
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.