' हायड्रोजन बॉम्ब आणि ऍटम बॉम्बमध्ये फरक काय? जास्त विनाशकारी कोण? वाचा – InMarathi

हायड्रोजन बॉम्ब आणि ऍटम बॉम्बमध्ये फरक काय? जास्त विनाशकारी कोण? वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कित्येक हजारो वर्षांपासून मानवाने हळू-हळू उत्क्रांती करायला सुरूवात केली. झाड-पाला आणि फळे खाताना त्याने प्राणी मारून त्याचे मांस खायला सुरुवात केली. प्राणी मारायला हत्यारांचा आणि ते शिजवायला आगीचा शोध लावला.

नंतर गटागटाने राहणारे मानव स्वतःच्या आणि स्वतःच्या गटातील लोकांच्या संरक्षणासाठी भांडू लागले, लढू लागले.

हळू-हळू शास्त्रास्त्रांनी सुसज्ज होऊ लागले. भाले, तलवारी, ढाली आल्या. तोफा आणि तोफगोळे आले.

नंतर बंदुका, स्वयंचलित रायफल आणि रणगाडेही आले. देश प्रदेश विभागले गेले आणि गरज पडली ती स्व-संरक्षणाची.

प्रगत देशांनी आपापल्या शास्त्रज्ञांच्या साहाय्याने नवीन नवीन विध्वंसक अस्त्रे बनवली. त्यातीलच एक ऍटम बॉम्ब.

 

atom-inmarathi

 

नाव ऐकताच आठवतो तो  इतिहास. ‘दुसऱ्या महायुद्धाचा..!’

प्रचंड नरसंहार,

अमेरिकेने जपानवर केलेल्या अणुबॉम्ब म्हणजेच ऍटम बॉम्ब हल्ल्याचा. किती भीषण हल्ला. दोन्ही शहरं पूर्णतः उध्वस्त झाली. सगळं सगळं बेचिराख.

इतकी शक्ती होती त्या अणुबॉम्ब मध्ये की जपान्यांच्या कित्येक पिढ्या त्या बॉम्ब हल्ल्यातील अणूंचे परिणाम भोगत राहिले.

‘ऍटम बॉम्ब’ (त्याला न्युक्लीयर बॉम्ब असेही संबोधतात) हे एक असे विध्वंसक अस्त्र आहे की, त्याने प्रचंड नुकसान संभवते.

जिथे अणुबॉम्ब पडतो तिथून दीड दोन किलोमीटरचा भाग पूर्ण जळून खाक होतो. २ किलोमीटरच्या पुढील भागाला पण ऍटम्स मधून निघणाऱ्या उष्णतेचा मारा सहन करावा लागतो.

त्या ऍटम्सचे रेडिएशन खूप तीव्र असते. त्यामुळे बरेच वर्षे त्याचा प्रभाव त्या प्रभागात जाणवू शकतो.

 

hiroshima-nagasaki-inmarathi

हे ही वाचा – नासाच्या एका वैज्ञानिकाने केलाय गौप्यस्फोट – चंद्रावर ‘कुणीतरी’ आहे!

असा हा ऍटम बॉम्ब

युरेनियम किंवा प्लुटोनियम पासून बनतो. जो फुटला तर त्याचा मोठा धमाका होतो आणि युरेनियमचे छोटे छोटे अणू तयार होतात.

ह्या प्रक्रियेला शास्त्रीय भाषेत फिशन (Fission) असे म्हणतात. त्यातून खूप उष्णताही बाहेर पडते. जी सगळं विध्वंस घडवते. ह्या ऍटम बॉम्बचा मोठा भाऊ म्हणजे हैड्रोजन बॉम्ब.

मोठा भाऊ ह्याच्यासाठी की हा बॉम्ब फ्युजन पद्धतीने फुटतो. म्हणजेच,

जेव्हा हा बॉम्ब फोडायचा असतो तेव्हा त्याच्या सोबत बॉम्ब युनिटमध्ये ऍटम बॉम्ब सुद्धा असतो. पहिला ऍटम बॉम्ब फुटतो आणि त्याच्या उष्णतेने हैड्रोजनचे अणू एकमेकांशी जोडले जातात.

ह्यालाच फ्युजन पद्धती म्हणतात. हे अणू जोडले जाऊन एक पूर्ण मोठा गोळा बनतो आणि तो हिलीयम मध्ये रूपांतरित होतो.

ह्यामध्ये खूपच ऊर्जा निर्माण होते. जणू सूर्याचा गोळा. खूपच मोठा धमाका होऊन हा बॉम्ब फुटतो. हा धमाका ऍटम बॉम्बपेक्षा १००० पटीहून जास्ती मोठा असतो. ह्याची शक्ती हवी तितकी वाढवता येते. पण वास्तविकतेत असे केले जात नाही.

ह्या बॉम्ब ची शक्ती कशी ओळखतात?

खाणीतले दगड फोडताना TNT नामक स्फोटके फोडली जातात. त्याचा धमाका सुद्धा कानठळ्या बसवणारा असतो. बॉम्बची शक्ती TNT शी बरोबरी करून ठरवतात.

हिरोशिमावर पडलेला बॉम्ब हा १५ हजार टन TNT शक्तीचा होता. तो जरा लहानच होता.

एक मालगाडी भरून म्हणजेच ५००० टन TNT असेल तर अशा ३ मालगाड्या भरल्या जातील इतका मोठा धमाका हिरोशिमाला झाला होता.

त्यापेक्षा मोठा होता नागासाकीवर पडलेला जो २१ हजार टन TNT च्या ताकदीचा होता. पण हैड्रोजन बॉम्ब तर ह्याही पेक्षा विनाशकारी असतो.

 

hydrogen-bomb-inmarathi.jpg

 

अणुबॉम्बचा पहिला प्रयोग दुसऱ्या महायुद्धात झाला. हैड्रोजन बॉम्ब बनवण्यासाठी सुद्धा मोठमोठ्या देशात स्पर्धा लागली होती. तेव्हा अमेरिकेने पहिला हैड्रोजन बॉम्ब बनवून त्याची टेस्ट देखील घेतली.

हळू हळू प्रत्येक देशाला आपापल्या देशाच्या सुरक्षेसाठी हे असे अतिशक्तीशाली बॉम्ब आपल्या शास्त्रासाठ्यात असले पाहिजेत ह्याची जाणीव झाली आणि एकच चढाओढ लागली.

हे सगळे अणुबॉम्ब आणि हैड्रोजन बॉम्ब पृथ्वी नष्ट करू शकतील का?

एकेक बॉम्ब लावला तर बराच मोठा प्रदेश उध्वस्त होऊ शकतो. पण हे सगळे जर एकाच वेळी फुटले तर पृथ्वी नक्कीच नष्ट होऊ शकते. नुसती नष्ट नाही तर पुन्हा जीवसृष्टी निर्माण व्हायलाही अडथळे येऊ शकतील.

स्फोटांनंतर उरलेली जीवसृष्टी सुद्धा अनेक परिणामांच्या आणि रेडिएशनमुळे धोक्याखालीच राहील.

ह्याही उप्पर जाऊन काही देशांना ह्या दोन्ही बॉम्ब पेक्षाही अजून शक्तिशाली बॉम्ब बनवायची इच्छा आहे. त्याला नाव दिलेला आहे ‘कोबाल्ट बॉम्ब.’ ह्या बॉम्बमध्ये ऍटम, हैड्रोजन आणि कोबाल्टचं मिश्रण असेल.

हा बॉम्ब तर इतका महा शक्तिशाली असेल की पूर्ण पृथ्वी नष्ट होऊ शकेल.

थोडक्यात खरा खुरा dooms day म्हणजे जगाचा अंत. त्यातून काही जण चुकून जिवंत राहिलेच तर त्यांना कॅन्सरसारखे रोग होऊन तेही मरणासन्न होऊन जातील.

 

Hiroshima-Nagasaki-inmarathi

हे ही वाचा – इतिहासातल्या या सर्वाधिक दाहक अणुस्फोट अपघाताच्या सावलीत आजही आपण जगतोय…

पण असे बॉम्ब बनवून काय हाशील होऊ शकते?

बलाढ्य देश असण्याचे बिरुद मिरवायला प्रत्येक देश उतावीळ झालेला आहे.

जो तो आपलाच देश शक्तिशाली बनवू बघत आहे. अशी भयंकर शस्त्रास्त्रे बनवून दुसऱ्या देशांना दहशतीखाली ठेवणे हेच मोठे कारण आहे.

पण अशा अस्त्रांनी पृथ्वीचे आणि पर्यायाने मानवजातीचे, इतर जीव जंतूंचे अतोनात नुकसान होईल. ह्याची चिंता मात्र कोणीच करताना दिसत नाही.

अणू बॉम्ब नंतर हैड्रोजन बॉम्ब आला. कोबाल्ट बॉम्ब सुद्धा बनेल आणि त्यानंतर..?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?