Site icon InMarathi

डॉक्टर “पांढरा” आणि वकील “काळ्या” रंगाचाच कोट घालतात, माहीत आहे का?

doctor and lawyer feature inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तुम्ही हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि नर्सना कायम पांढऱ्या कोटमध्ये पाहिलं असेल. आणि कधी कोर्टात जायची वेळ आली असेल तर तिथे सर्व वकील आणि न्यायाधीशांना काळ्या कोटात पाहिलं असेल.

विविध क्षेत्रातील लोकांचा गणवेश वेगवेगळा असतो. पण जगातील काही क्षेत्र अशी आहेत, त्यात हा ड्रेस कोड कैक वर्षांपासून बदललेला नाही.

अशाच युनिफॉर्ममध्ये डॉक्टरांचा पांढरा कोट आणि वकिलांच्या काळ्या कोटाचा समावेश होतो. पण तुम्हाला त्यांचा हा युनिफॉर्म असण्यामागील कारण माहीत आहे का?

 

 

प्रत्येक रंगाचं असं खास वैशिष्ट्य असतं. रंगांचा प्रभाव म्हणून सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. या कारणामुळे काही विशेष प्रोफेशन्ससाठी रंगांची निवड करताना विशेष लक्ष दिले गेले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

वकिलांचा काळा युनिफॉर्म असण्याची सुरुवात ही १७ व्या शतकात झाली असे मानले जाते.

जेव्हा Queen Mary II ही कांजिण्या आल्याने १६९४ मध्ये वारली तेव्हा विधुर झालेल्या राजा किंग विलीयम्स तिसरा याने तिच्या मृत्यूप्रीत्यर्थ राणीला श्रद्धांजली म्हणून सर्व न्यायाधीश आणि वकिलांना काळा गाऊन घालून कोर्टामध्ये यायची आज्ञा केली.

ही त्याने दिलेली आज्ञा कधीच लिखित स्वरूपात सापडली नाही. मात्र वकील आणि न्यायाधीशांनी तो पोशाख गणवेश म्हणून स्वीकारला तो कायमचा.

 

 

दुसरा मतप्रवाह असे सांगतो की, जुन्या काळात रंगीत कपडे जास्त उपलब्ध नसत. विविध रंगांचे डाय मोठ्या प्रमाणात उपलब्ध नसत.

जांभळा रंग हा श्रीमंतीशी जोडला गेला असल्याने मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेला दुसरा एकच रंग होता तो म्हणजे काळा. त्यामुळे काळा रंग त्यांनी निवडण्याचे हे कारण होते.

ज्याप्रमाणे वेगवेगळ्या धर्मांचे धर्मगुरू हे ईश्वराप्रती त्यांची असलेली निष्ठा, वाहून घेणे हे दर्शविण्यासाठी पांढरी, भगवी, निळी वस्त्रे परिधान करत, त्याप्रमाणे वकील हे आपली न्यायाप्रती असलेली निष्ठा दाखविण्यासाठी काळ्या रंगाचा कोट परिधान करत.

शिवाय काळा रंग हा वर्चस्वाचा रंग मानला जातो. त्यामुळे काळ्या वेशातील माणूस हा जास्त शक्तीशाली आणि प्रभावी वाटतो. त्याचप्रमाणे काळा रंग हा काही गोष्टींपुढे आपलं झुकणं दर्शवितो.

 

ज्याप्रमाणे धर्मगुरू काळा कोट घालून त्यांचं देवासमोर समर्पण व्यक्त करतात तसेच वकील काळा कोट घालून त्यांचे कायद्यासमोर असलेले समर्पण दाखवतात.

काळा कोट हा वकिलांना असलेल्या आपल्या पक्षकाराची बाजू मांडण्याचा अधिकार आणि न्यायाधीशांना असलेला न्यायदानाचा अधिकार, त्यांच्यातील एकजूट सूचित करतो.

काळा रंग आपल्या कर्तव्यातील गांभीर्याची आपल्याला जाणीव करून देतो.

 

 

 

ब्रिटिश काळापासूनच न्यायाधीश आणि वकिलांसाठी ब्लॅक गाउन आणि विग वापरण्याची सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच हे प्रतिष्ठित क्षेत्र मानले जाई.

त्यामुळे काळा रंग हा त्यांच्या उच्च वर्गाचे आणि वकिली पेशाच्या गांभीर्याचे प्रतीक होता. वकिलांचा काळा कोट हा त्यांच्या क्षेत्रातील शिस्त दर्शवितो.

काळ्या कोटाचा अर्थ अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रवृत्ती असाही आहे. न्याय मिळवून देण्यासाठी वकील आणि न्यायाधीशांना विपरीत परिस्थितीतून उत्तर शोधावे लागते.

काळा रंग हा न्यायाचा तसेच सुरक्षेचा देखील रंग मानला जातो. ऍडव्होकेट ऍक्ट १९६१ नुसार, भारतातील सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, डिस्ट्रीक्ट तसेच ट्रिब्युनल कोर्टामध्ये येणाऱ्या सर्व वकिलांनी काळ्या युनिफॉर्ममध्ये येणे आवश्यक आहे.

तर हे झाले वकिलांचे. आता आपण पाहुयात की डॉक्टर्स कायम पांढरा कोट का घालतात.

 

 

पांढरा रंग हा शांती आणि सलोख्याचे प्रतीक मानला जातो. डॉक्टरांचे काम असते आपल्या पेशंटवर उपचार करणे आणि त्यांना धीर देणे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा घडवणे.

हॉस्पिटलमध्ये आलेला रुग्ण हा तणावयुक्त परिस्थितीत सुद्धा सकारात्मक राहू शकावा म्हणून देखील डॉक्टर कायम पांढरे कपडे घालतात.

पांढरा रंग हा शांती, पवित्रता, इमानदारी यांच्याशी देखील जोडला जाऊ शकतो. डॉक्टरांनी पांढरा कोट वापरण्याची सुरुवात विसाव्या शतकात झाली.

१९व्या शतकापर्यंत उपचार करणारे physicians रुग्णांशी संपर्क करताना काळा पोशाख करत. तोवर आरोग्याच्या तक्रारी आणि त्यासाठी वैद्य गाठावा लागणे ही गोष्ट साधी मानली जात नसे. वैद्याकडे जावे लागले म्हणजे तो रुग्ण गंभीररीत्या आजारी असल्याचे मानले जात असे.

१९ व्या शतकाच्या शेवटी आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीस जेव्हा वैद्यकीय क्षेत्र हे पूर्णतः वैज्ञानिक म्हणून नावारूपाला आले तेव्हा या क्षेत्राची पवित्रता कायम राखण्यासाठी पांढरा कोट घातला जाऊ लागला.

 

 

पांढरा कोट हा डॉक्टर आणि रुग्णांमधील दुवा म्हणून तर डॉक्टर आणि त्यांच्या भोवतालच्या वातावरणात एका भिंतीसारखे काम करतो. डॉक्टर हे रुग्णांच्या शरीराशी संपर्कात येतात.

त्यांना पेशंटचे रक्त लागते, injection किंवा औषधांमधील रसायने त्यांच्या शरीरावर सांडतात. इतर रंगीत कोटच्या तुलनेत पांढऱ्या कोटवर हे समजणे सोपे जाते.

डॉक्टरांना स्वतःला धोकादायक रसायनांपासून लवकरात लवकर वाचविण्यासाठी हे मदत करते.

 

 

शिवाय पांढऱ्या कोटवर लगेचच रक्ताचे, औषधांचे, रसायनांचे डाग दिसून येत असल्याने त्यांना आपले कपडे खराब झाल्यावर बदलावे लागतात आणि त्यामुळे ते आपोआपच स्वच्छ राहतात. यामुळे त्यांच्यातर्फे इन्फेक्शन पसरण्याला आळा घालता येतो.

तर ही आहे डॉक्टर आणि वकिलांच्या कोटाच्या रंगाबद्दलची न सांगितली जाणारी लॉजिकल गोष्ट.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version