आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपल्यापैकी अनेक लोकांना खास करून मुलांना मारधाड, ऍक्शन आणि ढिशुम ढिशुम वाले चित्रपट फार आवडतात.
एक हिरो व्हिलनच्या कच्च्याबच्च्यांना पत्त्यांचा बंगला हवेत उडवल्यासारखा अगदी सहज एकच फाईट मारून हवेत उडवतो.
साउथचे सिनेमे असो कि हिंदी, मराठी असोत की इंग्रजी आपले नायक म्हणजे सुपरहिरो असतात आणि एका फटक्यात भल्या भल्यांना लोळवून चीत करतात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
शेवटच्या क्षणापर्यंत हतबल होऊन मार खाणारा हिरो कोणाच्यातरी इमोशनल अत्याचाराने प्रेरित होऊन एका क्षणात पेटून उठतो आणि दुष्ट व्हिलनचा खात्मा करतो.
हे सगळं करताना तो कलारीपयाट्टूपासून ते तायक्वांदो, कराटे आणि तलवारबाजीपासून सगळे अगदी लीलया करतो.
हे सीन्स आपण मनापासून एन्जॉय करतो आणि म्हणूनच जॅकी चॅन, ब्रूस ली पासून ते आताच्या टायगर श्रॉफचे सिनेमे त्यातील ऍक्शन सिक्वेन्स साठी मन लावून बघतो. \
पूर्वीच्या बहुतांश सिनेमांमध्ये फ्री स्टाईल मारामारी असायची. परंतु गेल्या काही वर्षात मार्शल आर्ट्स फार लोकप्रिय झाले असल्याने चित्रपटांमध्ये मार्शल आर्ट्सचा बोलबाला आहे.
नायकांप्रमाणे नायिकासुद्धा प्रसंगी मार्शल आर्ट्सचे प्रदर्शन करतात. पण हे सगळे दाखवताना त्यातील फायटिंग सिक्वेन्स प्रेक्षकांच्या मनात मार्शल आर्ट्सबद्दल अनेक गैरसमज पेरतात.
खरं तर मार्शल आर्ट्सचा नियम असा आहे की हे फक्त प्रसंगी स्वतःचा बचाव करण्यासाठी उपयोगात आणायचे असतात.
ही युद्धकला दुसऱ्यावर हल्ला करण्यासाठी उपयोगात आणू नये. परंतु सर्वदूर चित्रपटांतून मात्र उलटच चित्र दिसते.
मार्शल आर्ट्स हे फर्स्ट एड बॉक्स सारखे फक्त संकटकाळी वापरावेत हा महत्वाचा नियम मार्शल आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना शिकवला जातो.
ह्याचा उपयोग बदला घेण्यासाठी, कुणाला जखमी करण्यासाठी किंवा ठार मारण्यासाठी करण्याची परवानगी नाही.
परंतु अनेक सिनेमांमध्ये तर हमखास उलटेच दाखवतात. व्हिलन त्याच्या स्वार्थासाठी हीरोवर मार्शल आर्ट्सचे प्रयोग करतो आणि त्याला जखमी करतो असे दृश्य वारंवार अनेक चित्रपटात दाखवतात.
अनेक चित्रपटात असे दाखवतात की हिरो किंवा हिरोईन मनातून व्हिलनचा बदला घेण्याचे ठरवतात आणि तयारीला लागतात. त्यांच्या तयारीचा एक महत्वपूर्ण भाग म्हणजे फायटिंग शिकणे!
हे फायटिंग म्हणजे बऱ्याच वेळा मार्शल आर्ट्सचाच सराव असतो.
आपले सुपरहिरो किंवा सुपरवूमन अवघ्या काही दिवसात कसून मेहनत करून मार्शल आर्ट एक्स्पर्ट बनतात. आणि एका झटक्यात व्हिलनचा खात्मा करण्याइतकी त्यात मास्टरी मिळवतात.
परंतु प्रत्यक्ष आयुष्यात मात्र कुठल्याही मार्शल आर्टमध्ये मास्टरी मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे कसून सराव व मेहनत घ्यावी लागते. तसेच हॅन्ड टू हॅन्ड कॉम्बॅट जसे दाखवतात तसे अजिबातच नसते.
ह्या गोष्टी चित्रपटांमध्ये अतिशय वाढवून चढवून व अतिशयोक्तीपूर्ण दाखविलेल्या असतात. प्रत्यक्षात मात्र असे नसते.
चित्रपटांमधील फायटिंग ही चित्रपटाच्या कथेशी निगडीत, ठरवून कोरियोग्राफ केलेली, अनेक वेळा सराव करून पक्की केलेली असते.
अनेक वेळा खऱ्या अभिनेत्याऐवजी स्टंटमेन ही दृश्य करतात. आणि नंतर ही दृश्ये अधिक मनोरंजक करण्यासाठी पोस्ट प्रॉडक्शन एडिटिंगमध्ये ह्यात स्पेशल इफेक्ट्स टाकले जातात.
परंतु प्रत्यक्षात मात्र कुठलीही फायटिंग कोरियोग्राफ केलेली वगैरे नसून उत्स्फूर्तपणे केलेली मारामारी असते.
आणि ही मारामारी फार काळ चालू शकत नाही कारण ह्यात लोक लवकर दमतात आणि चित्रपटासारखे जखमी अवस्थेत मारधाड करु शकत नाहीत. त्यामुळे हा रियल लाईफ ऍक्शन सिक्वेन्स फार थोड्या वेळ चालतो.
चित्रपटात हिरो फिट नसला, जखमी असला किंवा नुकताच आजारपणातून उठलेला असला तरीही अनेक वेळ मार्शल आर्टचे प्रदर्शन मांडतो परंतु प्रत्यक्ष मात्र माणूस कितीही शक्तिवान असला तरी फायटिंग करताना थोड्याच वेळात दमतो.
तसेच प्रत्यक्ष फायटिंगमध्ये शस्त्रामुळे किंवा फर्निचरमुळे मार लागला तर माणूस जागचे हलू शकत नाही, मग मारामारी तर लांबच राहिली.
चित्रपटात अनेक लोक एकाच वेळी हीरोवर चाल करून आले तरीही हिरो एकाला मारत असताना बाजूलाच उभा असलेला दुसरा आपली मार खायची पाळी येईपर्यंत थांबलेला असतो.
इतका पेशंस खऱ्या आयुष्यात कुणीही दाखवत नाही. खऱ्या खुऱ्या आयुष्यात जेव्हा तुमच्या अंगावर एकापेक्षा अधिक लोक चालून येतात तेव्हा तुम्हाला एकावेळी अनेक लोकांशी लढणे शक्य नसते.
कारण तुम्ही एकाला मारण्यात व्यस्त असाल तेव्हा तुमच्या मागून दुसरा येऊन तुमच्यावर हल्ला करेल!
म्हणूनच अश्या वेळी तुमच्याकडे कितीही रंगाचे (काळे, निळे, पिवळे) बेल्ट असले तरी संधी मिळताच स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून पळून जाण्यातच धन्यता आहे.
हे पण वाचा:
स्पेशल इफेक्ट्स शिवाय तुमचे आवडते चित्रपट कसे दिसले असते ?
ह्या चित्रपटांतील कल्पना वापरून चोरांनी खऱ्या चोऱ्या घडवून आणल्यात
सिनेमात हिरो किंवा हिरोईन एकाच वेळी १०- १५ लोकांना मारून किंवा जखमी करून किंवा व्हिलनला ठार मारून शांतपणे आपल्या पुढच्या कामांना लागतात. परंतु प्रत्यक्ष आयुष्यात असे होत नाही.
आपण कुठल्याही प्रकारची हिंसा प्रत्यक्ष बघितली किंवा त्यात आपला सहभाग असेल तर आपण नंतर कितीतरी दिवस सामान्य जीवन जगू शकत नाही.
त्या घटनेच्या आठवणी सतत आपल्या डोक्यात येतात आणि आपलं मन तणावाखाली असतं. ह्याला पोस्ट ट्रोमॅटिक स्ट्रेस असे म्हणतात.
आपण हिंसेतून कुणाचा मृत्यू बघितला किंवा स्वत: कुठल्याही जीवावर बेतणाऱ्या प्रसंगाला सामोरे गेलो किंवा कुणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलो तर तो तणाव भयंकर असतो.
सामान्य माणूस चित्रपटासारखे सगळे काही विसरून परत बॅक टू नॉर्मल इतक्या सहज येऊ शकत नाही.
खऱ्या आयुष्यात तुमच्यावर अचानक हल्ला झाला तर तुम्ही लगेच एका क्षणात प्रत्युत्तर देऊ शकत नाही. तुमचे सर्व्हायवल इन्स्टिंक्ट स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करेल.
परंतु सामान्य माणूस कितीही धीट असला तरी इतक्या लगेच प्रतिक्रियेदाखल समोरच्यावर हल्ला करु शकत नाही.
आपल्यावर अचानक हल्ला झाल्यावर आपल्याला आधी मानसिक धक्का बसतो आणि आपण जागच्या जागी फ्रीज होतो. आपल्याला थोडावेळ काहीही सुचत नाही.
व नेमके काय घडते आहे हे कळायला थोडा वेळ तर लागतोच.
चित्रपटात मात्र हिरो मार्शल आर्ट्स एक्स्पर्ट असल्याने लगेच अरे ला कारे करून शून्य सेकंदात प्रत्युत्तरादाखल हल्ला करणाऱ्यांना तुडवायला सुरुवात करतो.
म्हणूनच टीव्हीवर व सिनेमात जे दाखवतात त्याला मार्शल आर्ट्स समजण्याची चूक करू नये. त्यात अतिशयोक्तीपूर्ण गोष्टींचा भरणा असतो.
मार्शल आर्ट्सचे कराटे, ज्युदो, तायक्वांदो, ऐकीदो, किकबॉक्सिंग, जुजुस्तु, wing chun, ब्राझिलियन jiu-jitsu असे असंख्य प्रकार आहेत. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असली तरी नियम मात्र एकच आहे.
तो म्हणजे कुठल्याही परिस्थितीत ह्या कलेचा उपयोग फक्त संरक्षणासाठी करणे.
परंतु चित्रपटांत तर हाच नियम धाब्यावर बसवल्यामुळे ह्या कलेविषयी प्रेक्षकांच्या खास करून लहान मुलांच्या मनात गैरसमज निर्माण होतात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
हे पण वाचा:
हास्यास्पद कारणे देऊन पाकिस्तानात या भारतीय चित्रपटांवर बंदी घालण्यात आलीय !
चित्रपटाला “सेन्सॉर बोर्ड”चं सर्टिफिकेट मिळण्याचे निकष काय असतात? जाणून घ्या..
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.