Site icon InMarathi

ज्यांना बहीण असते अशी मुलं उत्तम प्रियकर होऊ शकतात? ही आहेत यामागची मानसशास्त्रीय कारणं

brother sister inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या प्रियकराकडून सगळ्याच मुलींच्या काही अपेक्षा असतात. त्या त्याने मी न सांगता ओळखून पूर्ण कराव्यात ही सुद्धा त्यातलीच एक अपेक्षा आहे. पण सर्वच मुलांना हे जमत नाही. असं का?

याचं उत्तर दडलंय ते त्या मुलाला बहिण आहे की नाही यात. होय…

मुलाला बहिण असणे इथे खूप महत्त्वाचे ठरते. बहिणीसोबत वाढलेली मुले ही जास्त चांगले प्रियकर बनतात.

या मुलांना लहानपणापासून बहिणीसोबत राहिल्याने तिच्याशी कसे वागावे, तिला कसे समजुन घ्यावे, तिच्या आवडी-निवडी, तिचे हट्ट यांची सवय झालेली असते.

याच गोष्टी त्यांना पुढे मदतीच्या ठरतात.

एवढेच नाही तर ज्या मुलांच्या आयुष्यात मैत्रिणी आहेत त्यांनाही त्याचा खुप फायदा होतो. पुरेशा मैत्रिणींचा सहवास लाभला की पुरुषांचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो.

ते स्त्रियांना अधिक चांगल्या प्रकारे ओळखतात, त्यांना स्त्रियांबद्दल सहानुभूती वाटते. याउलट ज्या पुरुषांना स्त्रियांचा पुरेसा सहवास लाभत नाहीत त्यांना स्त्रियांचे अधिक कुतुहल असते.

ते शारिरीकदृष्ट्या अधिक आकर्षित होतात. त्यामुळे स्त्रियांची भावनिक बाजु समजून घेण्यास कमी पडतात.

आज आम्ही चांगला प्रियकर बनण्यासाठी गरजेच्या असणाऱ्या गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्हाला बहिण असेल तर आधीपासुनच अवगत असतील.

१. स्त्रियांसोबत कसे वागावे याचे ज्ञान :

 

 

कोणताही प्रियकर चांगला प्रियकर ठरतो ते तो प्रेयसीसोबत कसे वागतो यावरुन. पण जर तुम्हाला बहिण असेल तर या गोष्टीचा विचार करण्याची अज्जिबात गरज नाही.

कारण एखाद्या मुलीला कशी वागणुक हवी असते, तिला कसे समजुन घ्यावे हे तुमची बहिण तुम्हाला नकळत सतत शिकवत असते.

बहिणीला खुश करण्यासाठी काय करावे, ती उदास असल्यावर तिच्याशी कसे वागावे याचे उत्तम ज्ञान तुम्हाला असते. याच गोष्टी पुढे प्रेयसीला खुश ठेवण्यासाठी मदत करतात.

२. माफी मागण्याची सवय :

 

 

नाते म्हटले की वाद आलेच. बरेचदा एका सॉरीने समस्या सुटतात असे म्हणतात. पण ते म्हणायचे कुणी? आणि जरी म्हणायची इच्छा असेल तरी कसे म्हणावे? हे प्रश्न पडतात.

परंतु बहीण-भावामध्ये ही नेहमीची गोष्ट असते. सतत वाद होतात त्यामुळे सतत माफी मागावी लागते व हा सवयीचा भाग बनतो.

आपल्या चुका मान्य करायला हव्यात, त्यांबद्दल माफी मागायला हवी, नाराजी दूर कशी करावी याची समज या नात्यातुन आलेली असते.

अशी मुलं प्रेयसीची नाराजी दुर करण्यात यशस्वी होतात व यशस्वी प्रियकर बनतात.

३. मुलींना काय भेट द्यावी याची उत्तम समज :

 

 

घरात बहिण असेल तर नेहमी तिच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतात. शिवाय रक्षाबंधन आणि भाऊबीजेला तर गिफ्ट देणे बंधनकारकच ठरते.

वर्षानुवर्षे या मागण्या करून बहिणीला काय आवडते? काय गिफ्ट दिल्यावर ती खुश होते याची कला मुलांना अवगत होते.

म्हणून प्रेयसीला गिफ्ट देताना इतरांचे सल्ले घेण्याची गरज पडत नाहीत. अशी मुले अगदी सहज मुलीला इम्प्रेस करतात.

 

४.स्त्रियांचा वावर असण्याची सवय :

 

 

घरात बहिण असली की तिच्या मैत्रीणींचे येणे- जाणे आलेच. मग त्यांच्याशी बोलणे, वेळप्रसंगी समस्या सोडवणे या गोष्टीही ओघाने आल्याच.

यामुळे आपल्या अवतीभोवती मुलींचा वावर असण्याची, त्यांच्याशी मोकळेपणाने बोलण्याची सवय होते.

अशा मुलांना प्रेमाच्या बंधनात जुळवून घ्यायला बहिण नसलेल्या मुलांच्या तुलनेत कमी वेळ लागतो. ते मुलींशी बोलताना, वेळ घालवताना अगदी सहजतेने वावरतात.

५. संरक्षकाची भूमिका :

 

 

भाऊ लहान असो वा मोठा, बहीण नेहमीच आपल्या समस्या त्याला सांगते. भाऊसुद्धा बहिणीच्या समस्या सोडवण्याचा, तिला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत असतो.

त्याला तिच्या समस्या माहिती असतात, समाजात वावरताना तिला कशा कशाला तोंड द्यावे याची जाणीव असते.

त्यामुळे असा भाऊ मुलींना आदर देण्यास, त्यांची काळजी घेण्यास त्यांच्या समस्या समजून घेण्यास शिकतो.

काहीही झाले तरी आपण बहिणीच्या पाठीशी उभे राहायला हवे याची भावना त्यांच्यात निर्माण होते. ही मुले प्रेयसीला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतात. मुलींना अशा प्रियकराजवळ अधिक सुरक्षित वाटते.

६.’त्या’ गोष्टींबद्दल बोलताना वा ऐकताना लाज वाटत नाही :

अनेक मुलांना मुलींचे PERIODS, MOOD SWINGS व अशा इतर गोष्टींबद्दल बोलण्याची लाज वाटते. ते याबद्दल मोकळेपणाने न बोलता ते बोलणेटाळतात वा अज्ञानापोटी अशा गोष्टींवर हसतात.

अशा मुलासोबत राहणे मुलींना गैरसोयीचे वाटते. कारण अशा मुलांना मुलींच्या या समस्या नीटपणे हाताळता येत नाहीत.

 

 

त्यामुळे या गोष्टी नात्यातील वादाचे कारण ठरतात. घरात बहीण असेल तर त्याला या गोष्टींची अधिक जाणीव असते. परंतु जर मुलगा याबद्दल मोकळेपणाने बोलत असेल तर नात्यात अवघडलेपणा येत नाही.

शिवाय मुलींमधील या बदलांची जाणीव असणारा मुलगा अशावेळी प्रेयसीची अधिक काळजी घेतो, तिला समजुन घेतो.

प्रेयसीला अशा समस्या असताना ती परिस्थिती अशी मुले व्यवस्थित हाताळतात.

 

७. नैसर्गिक स्पर्शातून आधार देण्याची कला :

अनेक प्रसंगांत फक्त बोलून, समजावून उपयोग होत नाही. समोरची व्यक्ती अत्यंत खचलेली असते. अशावेळी तुमचा एक स्पर्श जादु घडवून आणू  शकतो.

या स्पर्शाचा आधार वाटून त्या व्यक्तीला खूप हलके वाटू शकते.

 

 

केवळ स्पर्शाने आधार देता येणे ही एक कला आहे. जी मुले बहिणीशी सुख-दु:खे वाटुन घेतात त्यांना ही कला अवगत असते.

शिवाय कधी असा आधार द्यावा याचीही उत्तम जाण त्यांना असते. अशाप्रकारची शारिरीक जवळीक साधण्यात त्यांना भीती वाटत नाही.

थोडक्यात तुम्हाला जर बहिण असेल तर तुम्ही इतर मुलींसोबत अगदी सहजतेने वेळ घालवू शकता.

तुमच्या बहिणीसोबत वागताना शिकलेल्या गोष्टी तुम्हाला तुमच्या प्रेयसीसोबतचे नाते घट्ट करण्यास खूप मदतीच्या ठरतात.

एक चांगला भाऊ हा चांगला प्रियकर नक्कीच बनू शकतो. तसेच तुम्हाला पुरेशा मैत्रिणी असतील तर एखाद्या मुलीसोबत बंधनात अडकताना फारसे वेगळे वाटत नाही.

एकंदर फक्त बहिणच नाही तर आयुष्यात असलेल्या इतर स्त्रियांसोबतच्या अनुभवामुळे तुम्ही चांगले प्रियकर बनता.

त्यामुळे जरी बहिण नसेल तरी तुमच्या मैत्रिणींची तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version