आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
भारताला कला आणि साहित्य ह्या दोन्ही गोष्टींचा खूप मोठा वारसा लाभलेला आहे आणि कित्तेक कलाकारांनी आपल्या कलेने जगाला त्यांची दखल घ्यायला भाग पाडले आहे.
चित्रपट हा देखील अशाच कलेमध्ये मोडतो जिथे अनेक कलाकार एकत्र येऊन एका नव्या कलाकृतीला जन्माला घालतात.
चित्रपट निर्माण होत असताना साहजिकच प्रमुख कलाकार, दिग्दर्शक ह्या सगळ्यांना जास्त प्रसिद्धी मिळण्याची रीत आपल्याकडे रूढ आहे.
त्यामु़ळे चित्रपटात बाकी गोष्टी हाताळणाऱ्या व्यक्तीला हवी तितकी प्रसिद्धी मिळत नाही, पण मागच्या काही वर्षात चित्रपट बनविण्याचा आणि पाहण्याचा कल बदलत आहे.
अनेक नव्या दमाचे लेखक, कलाकार, गायक आपल्या कलेला जगासमोर आणत आहे. त्यांच्या प्रसिद्धीत सगळ्यात जास्त वाटा हा ऑनलाइन मीडीयाचा आहे, युटुब, फेसबुक ह्यांनी कित्तेक कलाकारांना घरबसल्या प्रसिद्धीत आणल्याची बरीच उदाहरण आपण पाहतो.
कलेसोबत वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या वापराने जागतिक चित्रपट क्षेत्राच्या समृद्धतेत आणखीनच भर पाडली.
आपल्या तंत्रज्ञानाच्या शिक्षणाचा वापर चित्रपटासाठी करत कित्तेक लोकं आज नाव कमावत आहे, तशातच एका मराठी माणसाने चित्रपटातील तांत्रिक योगदाना करिता चित्रपट क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्काराचा मिळवला.
पराग हवालदार त्यांच नाव.
पराग हवालदार हे तसे मुळचे पुण्याचे त्यांच अभियांत्रिकी पर्यंतच शिक्षण त्यांनी IIT खरगपूर मधून संगणक विज्ञान शाखेतून १९९१ साली पूर्ण केलं आणि पुढे १९९६ साली Southern California विद्यापीठातून Computer Vision and Graphics ह्या विषयात त्यांनी PhD मिळवली. काही दिवसांपूर्वी एक लेख वाचला त्या लेखाच शीर्षक इतकं छान होता की आपसूकच ह्या माणसाबद्दल जाणून घ्याव असं वाटलं.
शीर्षक होते-
“This Oscar-Winning IIT Grad from Pune has changed the face of Hollywood Animation”
पराग ह्यांना चेहऱ्यावरच्या हावभावा वर आधारित तंत्रज्ञाना च्या निर्मिती करता गेल्या वर्षीचा ऑस्कर देण्यात आला ज्याचा वापर चित्रपटात खऱ्या पात्राला साजेसा अॅनिमेशन तयार करण्यासाठी केला जात आहे.
त्यांनी निर्माण केलेल्या ह्या तंत्रज्ञानामुळे अॅनिमेशन वर आधारित चित्रपटांच्या निर्मितीचा वेळ कमी होण्यास मदत झाली. Beowulf, The Amazing Spider-Man, Watchmen, Hancock, Bewitched, The Smurfs किंवा Monster House ही हॉलीवुड चित्रपट आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी पाहिली असतील त्या मधे वापरण्यात आलेला तंत्रज्ञान हे पराग हवालदार ह्यांनी केलेला काम दर्शवता.
Sony Pictures Imageworks मध्ये कार्यरत असलेले हवालदार सोनीच्या Performance Capture विभागाच काम बघतात, पराग आणि त्यांच्या टीमने तयार केलेल्या ह्या तंत्रज्ञानाचा वापर सध्या हॉलीवुडमध्ये कॅॅरक्टर अॅनिमेशन निर्मिती करता मोठ्या प्रमाणात केला जात आहे.
सोनी समुहासोबत कार्यरत असलेले हवालदार Southern California विद्यापीठात Multimedia विषयाबद्दल अध्यापनाचंं काम देखील करतात जिथून त्यांनी PhD पूर्ण केली होती.
ऑस्कर पुरस्काराच नाव घेताच डोळ्यासमोर येता ते कॅमेरा, चित्रपट, कलाकार वगेरे लोकांना मिळणारे पुरस्कार पण बदलत्या तंत्रज्ञानाच्या चित्रपटातल्या वापराने ऑस्करला त्याची दखल घ्यायला भाग पाडली आणि गेल्या वर्षी हा पुरस्कार एका मराठी माणसाला मिळाला.
ऑस्कर पुरस्काराचा इतिहास पाहिल्यास लक्षात येतंं की, फार कमी वेळा भारताने ऑस्करपर्यंत मजल मारली आहे. १९५८ साली Mother India चित्रपटासाठी भारताला सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट ह्या विभागातून पहिल्यांदा ऑस्करसाठी नामांकन मिळाला, त्यानंतर काही वर्षांच्या अंतरांने भारताला नामांकन मिळत गेली.
पण पहिल्यांदा पुरस्कार मिळाला तो १९८३ साली भानु अथाय्या ह्यांना गाँधी चित्रपटासाठी Costume Design विभागात, पण हा विभाग तसाही सामान्य लोकांना फारसा माहीत असण्यासारखा नसल्याने १९९२ साली सत्यजित रे ह्यांना देण्यात आलेला मानद (Honorary) ऑस्कर पुरस्कार हा जास्त भारतीय लोकांच्या माहितीत आहे.
त्यानंतर बरीच हिंदी मराठी चित्रपट ऑस्कर वारीला जाऊन आली आमिर खानची प्रमुख भूमिका असलेला आणी आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’ हा पण त्यापैकीच एक चित्रपट, पण २००९ हे वर्ष भारतासाठी पुन्हा एकदा ऑस्कर घेऊन आला.
८१व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताला Slumdog Millionaire ह्या चित्रपटासाठी संगीत विभागात ३ ऑस्कर पुरस्कार मिळाले.
ए.आर.रेहमान, रेसुल पूकॊट्टी आणी गुलज़ार ह्यांनी भारताला पुन्हा ऑस्कर मिळवून देत चित्रपट क्षेत्रात एक नवा आयाम रचला, नंतरच्या काही वर्षात राहुल ठ्क्कर, कोट्टालँगो लेओन आणी विकास साठये अशा नावानी विज्ञान तंत्रज्ञान विभागातून ऑस्करला गवसणी घातली आणी त्यात आता पराग हवालदार ह्या नावाची आणखीन एक भर.
पराग ह्यांच कुटुंब त्यांच्या बालपणीची काही वर्षे झाम्बियामध्ये स्थित होते आणि त्यानंतर ते पुन्हा पुण्यात आले त्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी पुणे आणि IIT खरगपूर मधून पूर्ण केला.
गेल्या ११ फेब्रुवारीला Beverly Hills, California येथे मुख्य पुरस्कार ऑस्कर सोहळ्याआधी पराग ह्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
भारतीय चित्रपटामधे तंत्रज्ञानाचा वापर हॉलीवुडच्या तुलनेत कमी केला गेला आहे, पण गेल्या काही वर्षात भारतीय चित्रपट क्षेत्र कुस बदलताना दिसत आहे आणि वेगवेगळे आव्हान स्वीकारून स्वतःची दखल अंतरराष्ट्रीय पातळीवर घ्यायला भाग पाडत आहे, अशा वेळी पराग ह्यांना मिळालेला हा पुरस्कार भारतीय चित्रपट सृष्टीला नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.