' पेट्रोलचे भाव वाढतच राहणार… तुमच्या गाडीचं ऍव्हरेज वाढवण्याच्या १० भारी टिप्स! – InMarathi

पेट्रोलचे भाव वाढतच राहणार… तुमच्या गाडीचं ऍव्हरेज वाढवण्याच्या १० भारी टिप्स!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘पब्लिक ट्रान्सपोर्ट’ची सेवा असली तरीही प्रत्येकाला स्वतः ची एक गाडी असावी असे वाटतच असते. मग बँक बॅलन्स, हफ्ते याचं गणित जमवून एक चांगला मुहूर्त शोधला जातो..

गुढी पाडवा, दिवाळी, दसरा, हे आपले सण नवीन गाड्या घेण्याचे खास मुहूर्त झाले आहेत असे म्हणायला काही हरकत नाही. ह्या सणांच्या दिवशी आपण बाहेर जाताना रस्त्यावर हार घातलेल्या, मंदिरा समोर पूजा करत असलेल्या नवीन कोऱ्या गाड्या बघतो.

ह्या गाड्या म्हणजे चार चाकी किंवा दुचाकी असतात. आणि प्रत्त्येकाने आपापल्या सोयीसाठी, नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी वेळेवर जाण्यासाठी, जाण्या येण्याचा वेळ वाचवण्यासाठी अथवा कुटुंबातील इतरांच्या सुविधांसाठी घेतलेल्या असतात.

पण प्रत्त्येकाला ही वाहने कशी चालवायची, कशी सांभाळायची याची माहिती असतेच असे नाही. काहीजण फक्त पेट्रोल भरतात आणि चालवायला सुरुवात करतात.

 

bike-on-road-inmarathi

 

 

विशेषतः दुचाकी घेताना तिची संपूर्ण माहिती शोरूममधून जाणून घेत नाहीत, आणि नंतरही ती माहिती जाणून घेत नाहीत.

त्यामुळे त्यांना अनेक त्रासांना सामोरं जावं लागतं, आर्थिक फसवणूक, आर्थिक नुकसान, मानसिक ताण, आणि त्यांच्यामुळे कधी कधी दुसऱ्यांना ही त्रास. आता ते कसं काय?

तर दुचाकीचे संपूर्ण माहिती नसल्याने त्यात काय बिघाड झालाय हे कळत नाही. त्यासाठी काय करावे ते कळत नाही. अनोळखी मेकॅनिक ह्याचा फायदा घेतात आणि फसवतात, कामाचे अव्वाच्यासव्वा पैसे उकळतात.

रस्त्यात दुचाकी नादुरुस्त झाल्यास इच्छित स्थळी पोचायला उशीर होतो, आणि ज्यांची भेटगाठ होणार असते त्यांनाही ताटकळत राहावं लागतं.

ह्यासाठी आपण घेतलेल्या दुचाकीची संपूर्ण माहिती आपल्याला असणे जरूरीचे असते. नुसते दुचाकी चालवणे म्हणजे अनेक छोट्या मोठ्या संकटांना निमंत्रण. त्यात आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलचे दर वाढतच चालले आहेत.

सगळ्याच गोष्टींची बचत करावी लागते तसेच पेट्रोलचीही बचत करणे दुचाकी चालवणाऱ्यांना करावी लागते. पण जर ती पेट्रोलची बचत कशी करावी हेच माहिती नसेल तर खर्चाचे प्रमाण वाढतच जाते.

दुचाकी चालकांना पेट्रोलची बचत करणे सहज सोपे आहे. कशी करायची ही बचत? जाणून घ्या तर मग साध्या सोप्या टीप्स.

१. ज्या मेकची दुचाकी आपण घेतो त्या कंपनीने अनेक प्रकारच्या टेस्ट घेऊन नंतरच ती दुचाकी किंवा ते मॉडेल बाजारात आणलेले असते. त्या टेस्ट करताना त्यांनी ठराविक दर्जाचे पेट्रोल वापरलेले असते त्याच दर्जाचे पेट्रोल आपण नेहमी वापरावे.

 

Petrol-Bunk-Scam-India-inmarathi

 

२. ऑइल सुद्धा ठराविक दर्जाचे वापरलेले असते तेच ऑइल आपण ऑइल बदलताना वापरावे. त्यामुळे इंजिन चांगले कार्य करते.

 

Bike-Oil-inmarathi

 

===

हे ही वाचा – पेट्रोलचे दर का वाढत आहेत? सामान्यांना पडलेल्या प्रश्नाचं अभ्यासपूर्ण उत्तर

===

३. दुचाकीचे महत्वाचे काम करतो तो म्हणजे कार्बोरेटर. ह्यावर धूळ जमा होणार नाही ह्याची काळजी घेणे जरुरीचे असते. वेळच्यावेळी त्याची साफसफाई ठेवली पाहिजे आणि इंजिन ट्युनिंग करून घेतले पाहिजे.

 

bike-service-inmarathi

४. एअर फिल्टर साफ असलं पाहिजे त्यामुळे इंजिन कधीही थकणार नाही, जसे आपल्या शरीराचे नाक असते त्याप्रमाणे हे कार्य करत असते.

 

bike air filter-inmarathi

 

५. क्लच प्लेट अलाईनमेंट ही चांगल्या मेकॅनिक कडून करून घ्यावी, म्हणजे रस्त्यात दुचाकी कधीच दगा देणार नाही.

सतत गिअर बदलल्या मुळे क्लच खराब होतात. म्हणून सारखे आणि जोराने गिअर बदलले जाणार नाहीत ह्याची काळजी घेतली पाहिजे. म्हणजेच चांगल्या रस्त्यावरून दुचाकी चालवावी.

 

bike-clutch-plate-inmarathi

 

६. जोरात एक्सिलरेटर वावण्याने पेट्रोल जास्त जळते, त्यामुळे एक्सिलरेटर हळूहळू वाढवावा. जोरात वाढवून एकदम कमी करून ब्रेक दाबणे टाळावे. ह्याने पेट्रोलची खूप बचत होईल. सतत एक्सलरेटर कमी जास्त करण्याने पेट्रोल जास्त जळते.

 

bike-inmarathi

 

७. शक्यतो कमी ट्रॅफिक असलेला स्ता निवडावा ज्यामुळे जास्तीत जास्त वेळ एकाच वेगाने वाहन चालेल आणि सगळ्यात जास्त इंधनाची बचत होईल.

 

bike-traffic-inmarathi

 

८. महत्वाचे म्हणजे सतत टायर मधील हवेचे प्रेशर चेक करावे, कंपनीने ठरवून दिलेले हवेचे प्रेशर राहील ह्याची काळजी घ्यावी, टायरमधली हवा कमी असेल तर एव्हरेज वर परिणाम होतो आणि दुचाकी थकल्यासारखी चालेल. इंधनही जास्त लागेल.

 

bike-tire-pressure-inmarathi

 

९. धुळीच्या रस्त्यावरून सतत वाहन चालणार असेल तर मोटरसायकलची चेन धुळीमुळे जाम होते आणि गती मंदावते. त्यासाठी चेन साफ ठेऊन त्यावर ऑइल सोडले तर निश्चितच मोटरसायकल स्मूथ चालेल आणि इंधन वाचेल.

 

bike-dust-inmarathi

 

१०. वाहन पार्क करताना सावलीत पार्क करणे जरुरीचे असते. विशेषतः रेल्वे स्टेशन जवळच्या पार्किंगमध्ये सावली नसते. ६/७ तास जर वाहन उन्हात राहिले तर पेट्रोलची वाफ होते. रोज थोडी थोडी वाफ झाली तर महिन्याच्या शेवटी पेट्रोल जास्त लागले असे दिसेल.

 

bikes-in-india-inmarathi

 

अशा पद्धतीने आपण जर आपल्या दुचाकीची काळजी घेतली तर निश्चितच सगळीकडून बचत होईल आणि होणारा त्रास एकदम नाहीस होईल.
कोणतेही वाहन चालवा पण संपूर्ण माहिती घेऊन चालवा, ते वाहन तुमचीही काळजी घेईल यात शंकाच नाही.

लवकरच सणांना सुरुवात होईल. आता ठरवा कधी घ्यायची नवीन दुचाकी/चारचाकी…. आणि चालवा ती एकदम ‘मख्खन जैसी’ स्मूथ..!!

===

हे ही वाचा – रॉयल इनफील्ड बुलेट खरेदी का करावी? ही आहेत १० कारणं

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?