Site icon InMarathi

….आणि या कारणासाठी १५ ऑगस्ट हाच दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून निवडला गेला

tiranga feature im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारताची बहुसंख्य लोकसंख्या ही स्वतंत्र भारतात जन्मलेली आहे. अनेक सशस्त्र आणि अहिंसावादी क्रांतीकारक ह्यांच्या बलीदानातून, प्रयत्नांतून भारताने स्वातंत्र्य मिळवलेले आहे.

या स्वातंत्र्यलढ्यात कित्येक देशभक्त भारतीयांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.

कित्येकांचे संसार पणाला लागले. पण मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अविरत जातात राहिलेल्या त्या हुतात्म्यांनी वैयक्तिक स्वार्थ  केव्हाच गुंडाळून ठेवला होता. आणि या त्यागातून साकार झालं स्वातंत्र्य.

 

 

१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारत स्वातंत्र्य झाला.

दर वर्षी अतिशय उत्साहाने १५ ऑगस्टला सरकारी, सार्वजनिक आणि वैयक्तिक पातळीवर आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो.

हा एक राष्ट्रीय सोहळा आहे. भारताला मिळालेले स्वातंत्र्य हे भारताच्या इतिहासातील सहावे सोनेरी पान आहे. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का? की १५ ऑगस्ट हाच स्वातंत्र्य दिन म्हणून का निवडण्यात आला?

१५ ऑगस्टला असे काय विशेष महत्व आहे?

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की १५ ऑगस्टच्या ऐवजी दुसराच एक दिनांक स्वातंत्र्य दिन म्हणून निवडण्यात आला होता.

पण नंतर लॉर्ड लुई माऊंटबेटन यांना भारताचा शेवटचा वॉईसरॉय म्हणून नेमण्यात आले. त्यांनीच हा दिनांक बदलून १५ ऑगस्टला भारतला स्वातंत्र्य मिळेल असे घोषित केले.

 

 

इंडिया इंडिपेंडेंस बिलमध्ये बिट्रिश सरकारने भारताना सत्ता हस्तांतरण करण्यासाठी ३ जून १९४८ हा दिनांक निवडला होता. १९४७ मध्ये बिट्रेनचे प्रधानमंत्री क्लेमेंट रिचर्ड यांनी सुद्धा या दिनांकाला पुष्टी दिली होती आणि ३ जून १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळेल असे घोषित केले होते.

१९४७ साली लुई माऊंटबेटेन यांना भारताचा शेवटचा वॉईसरॉय म्हणून नेमण्यात आले.

त्यांच्यावर व्यवस्थित पद्धतीने भारताला सत्ता देण्याची जबाबदारी सुद्धा होती. तसेच दिनांक निश्चित करण्याचा अधिकार सुद्धा त्यांना देण्यात आला होता.

भारताचे वॉईसरॉय बनण्याआधी ते म्यानमारचे गर्व्हनर होते. माऊंटबेटेन आल्यानंतर भारताच्या स्वातंत्र्य दिनामध्ये खूप मोठा बदल करण्यात आला. त्यांनी ३ जून १९४८ हा दिनांक बदलून १५ ऑगस्ट १९४७ हा दिनांक निश्चित केला.

 

त्यांनी नियोजित दिनांक बदलून १५ ऑगस्ट हा दिनांक का निवडला यावर आजही बरेच वाद आहेत.

काही इतिहासकार म्हणतात की,

भारताला लवकरात लवकर स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा द्यावा म्हणून माऊंटबेटन यांनाच दिनांक निवडण्यास सांगण्यात आले होते आणि हा माऊंटबेटन ह्यांचा वैयक्तिक निर्णय होता.

भारतीय सैन्य इंग्रजांशी प्रामाणिक नव्हते आणि आर्थिकदृष्ट्या भारतावर राज्य करणे देखील शक्य नव्हते.

“फ्रीडम ऍट मिड नाइट” या पुस्तकात लॅरी कॉलिंग आणि डोमिनिक लॅपियर यांनी १५ ऑगस्ट हा दिनांक निवडण्यामागचे कारण दिले आहे.

वॉईसरॉय यांना दाखवून द्यायचे होते की,

“सगळे काही त्यांच्या नियंत्रणात आहे. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की भरताला स्वातंत्र्य देण्यासाठी एखादा दिनांक निश्चित करण्यात आला आहे का? तेव्हा त्यांच्या मनात ऑगस्ट आणि सप्टेंबर असे दोन महिने आले. यानंतर त्यांनी ऑगस्ट महिन्याची निवड केली.”

ऑगस्ट हा महिना आणि या महिन्याचा १५ दिनांक त्यांच्यासाठी खास होती. याच दिवशी अर्थात १५ ऑगस्ट १९४५ ला दुसर्‍या महायुद्धात जापानने इंग्रजांसमोर समर्पण केले होते. त्यावेळी ते अलाइस फोर्सेसचे कमांडर होते.

१५ ऑगस्ट १९४७ साली या घटनेस दोन वर्ष पूर्ण होणार होते. लॉर्ड लुई माऊंटबेटेन यांना हा दिनांक शुभ वाटत होता.

 

काही लोकांचं या बाबतीत वेगळे तर्क आहेत. त्यांच्या तर्कानुसार,

 इंग्रजांना भारताची फाळणी करायची होती आणि अशा परिस्थितीत त्यांना कळालं होतं की मोहम्मद अली जिन्नांना कॅंसर झाला होता. जर ३ जून १९४८ पूर्वी जींनाचा मृत्यू झाला असता तर फाळणी करण्याचा इंग्रजांचा डाव फसला असता.

म्हणून लवकरात लवकर भारताची फाळणी व्हावी. जेणेकरुन दोन्ही देश आपापसात लढत राहतील असा इंग्रजांचा डाव होता.

याच कारणासाठी त्यांनी १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस निवडला. पण या तर्काला इतिहासाचा आधार नाही. म्हणून हा तर्क त्यांचे वैयक्तिक मत म्हणूनच गृहित धरले जाईल. पण आजही भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे.

या गोष्टीला आता सत्तर वर्ष झाली तरी देखील त्यांच्यातील संबंध सुधरलेले नाहीत.

 

असंही म्हटलं जातं की, पाकिस्तानला भारताच्या एक दिवस आधी स्वातंत्र्य मिळाले. मुळात १४ ऑगस्ट या दिवशी पाकिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून स्वीकृती देण्यात आली होती. याच दिवशी माऊंटबेटेन यांनी पाकला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा दिला होता. असेही सांगण्यात येते की,

१४ ऑगस्ट १९४७ ला रमजान या पवित्र महिन्याचा २७ वा दिवस. इस्लामी कालगणनेनुसार हा दिवस शुभ आणि पवित्र मानला जातो. म्हणूनच पाकिस्तान १४ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करतो.

पण १९४८ मध्ये पाकिस्तानने पहिले टपाल तिकीट जारी केले त्यात १५ ऑगस्टची नोंद आहे आणि पाकीस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जीन्ना यांनी १५ ऑगस्टलाच पाकीस्तानच्या जन्माची घोषणा केली होती.

तसेच इंडियन इंडिपेंडेंस ऍक्टनुसार भारत आणि पाकिस्तान एकाच दिवशी स्वतंत्र झाले आहे.

 

 

आता प्रश्न असा आहे की भारताला मध्यरात्रीच का स्वातंत्र्य मिळाले असावे. ज्योतिष्यांच्या मते १५ ऑगस्ट हा शुभ दिनांक नव्हता. माऊंटबेटेन यांना विविध शुभ दिनांक सुचवण्यात आले होते.

पण १५ ऑगस्ट या दिनांकावर त्यांनी जणू मनाने मोहरच केली होती. कारण हा त्यांचा शुभ दिवस होता.

मग या दिनांकात फेरबदल न करता यावर तोडगा काढणे महत्वाचे होते. म्हणूनच मध्यरात्री स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली. एका विशिष्ट कालावधीत नेहरुंनी आपले भाषण पूर्ण केले आणि स्वातंत्र्याचा पहिला शंखनाद झाला.

तर अशाप्रकारे १५ ऑगस्ट १९४७ ला मध्यरात्री भारताला स्वातंत्र्य मिळाले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version