आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
राजकारण आणि उद्योग विश्व ह्यांचं नातं तसं सर्वश्रुत आहे. म्हणजे जगाच्या राजकारणात डोकावल्यावर जाणवतं कित्तेक उद्योजकांनी राजकारणात कुठल्या न कुठल्या मार्गाने सहभाग नोंदवला आहे.
अगदी जगातल्या महाशक्ती असलेल्या अमेरिका पासून ते व्लादिमिर पुतीनच्या रशिया पर्यंत जर निरखून पाहिलं तर कळतं की सत्तेचा हा डोलारा फक्त राजकारण ह्या एका स्तंभावर आधारलेला नाही.
तर ह्याला आणखीन निरनिराळे पैलू आहे आणि ह्या सगळ्यात महत्वाच्या भूमिकेत असतं ते उद्योग जगत.
प्रत्येकवेळी उद्योजक हा राजकारणाच्या मुख्य प्रवाहात उतरूनच काम करेल असं म्हणता येणार नाही आणी त्यामु़ळे राजकारणाची समीकरणे आणि भविष्य ओळखून हे लोक देशाच्या निवडणुकांमध्ये राजकारण्यांना पैसे पुरवतात. त्याला पक्षनिधी नावाच लेबल दिलेलं असतं.
निवडणुकांसाठी देण्यात आलेला पैसा हा सामाजिक जबाबदारी किंवा समाजसेवा म्हणून देण्यात येत नाही. त्याचा मोबदला म्हणून निवडून आलेल्या पक्षाला सत्तेच्या वाटचालीत ह्या उद्योजकांचं बोट धरून चालावं लागतं.
देशात येऊ घातलेला प्रत्येक व्यवसाय, प्रत्येक नवीन प्रकल्प मग एखाद्या विशिष्ट समुहाच्या पारड्यात पडतो हा काही योगायोग नसतो.
==
हे ही वाचा : “बॉयकॉट चायना” च्या पार्श्वभूमीवर गुगल-रिलायन्सच्या युतीचं “हे” महत्व प्रत्येक भारतीयाने समजून घ्यायला हवं!
==
तो असतो मोबदला निवडणुकीत केलेल्या सहकार्याचा! ह्या अशा पद्धतीतूनच भांडवलशाही आणखीन मजबूत होत जाते, श्रीमंत लोक हे आणखीन श्रीमंत होऊ लागतात, आणि गरीब लोकं जास्त गरीब म्हणूनच गरीब श्रीमंत ही दरी आणखीन वाढतच जाते.
ह्या सगळ्या व्यवहाराला भारत किंवा भारतीय राजकारण देखील अपवाद नाही, आणि म्हणूनच राजकारण्यांच्या जोडीने नेहमीच अंबानी, अदानी ही नावं प्रसारमाध्यमात झळकत असतात. भ्रष्टाचार म्हटल की आपसूकच सामान्य माणसाच्या विचाराची सुई राजकारण्यांकडे वळते.
त्यांचे हात मळलेले असतीलच असे नाही, पण ह्या सगळ्या भ्रष्ट कारभाराला हे उद्योजक कितपत जबाबदार आहे आणि ही लोकं स्वतः कितपत भ्रष्ट आहे ह्याचा अंदाज घेणं फार गरजेचं आहे.
रिलायंस समूह आणि त्यांचे प्रमुख असलेले अंबानी कुटुंब हे तसं पाहता भारतीय उद्योग क्षेत्रातलं सगळ्यांत मोठ नाव. पण राहून राहून हे नाव भारतीय राजकारणाच्या अवतीभोवती वावरत असतं. असं का होत आहे हे जाणून घेत असताना काही घटनांचा मागोवा घेतला त्यावेळी एक प्रश्न सारखा पडत होता-
मुकेश अंबानी खरंच भ्रष्ट आहेत का? आणि जर आहेत तर ते “किती” भ्रष्ट आहे ?
==
हे ही वाचा : ह्या RSS कार्यकर्त्याने व्यापम घोटाळा उघडकीस आणला – पण आता तो एकटा पडलाय!
==
काही वर्षांपूर्वी रिलायंस समूहाने Network 18 Media and Investments Ltd. नावाची भारतीय प्रसारमाध्यम क्षेत्रातल्या अग्रगण्य कंपनी विकत घेत आपल्या समूहात सामील करून घेतलं, ह्याच Network 18 कंपनीकडे CNBC TV18, CNN-IBN, CNN Awaz असल्या दूरदर्शन क्षेत्रातल्या चॅनलची मालकी आहे तसेच firstpost.com, moneycontrol.com सारखे संकेतस्थळ ही ह्यांच्याच मालकीची आहे.
अंबानीकडे ह्यांची मालकी जाणे ह्याचा साधा अर्थ असा होतो की, लोकांनी बातम्या म्हणून काय बघावं आणि काय बघू नये ह्यावरच नियंत्रण त्यांच्या हाती जाणे असा होत.
प्रसारमाध्यम हे आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ मानतो पण जेव्हा हाच स्तंभ अशा रितीने विकत घेतला जातो तेव्हा निष्पक्ष पत्रकारिता आणि खऱ्या बातम्या बघायला मिळतील का ह्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होतो.
डिसेंबर २०१३ साली मुंबईमध्ये Aston Martin गाडीचा एक अपघात घडला होता, जिची मालकी Reliance Ports नावाच्या कंपनीकडे होती.
प्रत्यक्षदर्शी लोकांनी तिथे अंबानींच्या मुलाला पाहिले होते. पण नंतर अपघाताची जबाबदारी अंबानी कुटुंबाच्या एका चालकाने घेतली.
पाहणाऱ्या लोकांनी स्पष्ट आठवत नसल्याच सांगितल्याने चालकालाही अटक झाली नाही. प्रत्यक्षदर्शी लोकांनी असे सांगितले, त्यांना कसली भीती होती हे सगळंच एका गुढपटासारखं आहे.
या बातमीबद्दलची माहिती Forbes.com, milleniumpost.in आणी dailymail.co.uk अशा संकेतस्थळावर आजही उपलब्ध आहे. (मूळ बातमी वाचण्यासाठी संकेतस्थळाच्या नावावर क्लिक करा.)
Hindustantimes.com संकेतस्थळावर मागे भारतीय जनता पक्षाच्या प्रचार खर्चाबद्दल एक माहिती आली होती आणि खर्चाचा अंदाज साधारण ५,००० कोटी रुपये एवढा सांगण्यात आला होता. हा इतका अमाप पैसा कुठून आणि कसा येतो आणि कुणी देत असेल तर त्याबदल्यात त्यांना काय मिळत असेल हे अगदी रहस्य आहे.
कारण सरकारच्या निविदा आणि धोरणांची एकंदर मांडणी कुठल्या समुहाच्या फायद्याला अनुसरून आहे हे पाहिलं की पैशाच्या स्त्रोताचा अंदाज घेणं कुणाला फारसं कठीण जाणार नाही.
अमेरिकास्थित DeGolyer and MacNaughton ने प्रसारित केलेल्या एका अहवालानुसार, सुमारे ११००० कोटी किंमतीच्या ONGC या सरकारमान्य समुहाचा गँस रिलायंसने बेकायदेशीररित्या वापरल्याची बातमी मागे बरीच गाजली होती.
==
हे ही वाचा : ‘रिलायंस जिओ’ला मिळालेल्या प्रचंड यशाचं रहस्य काय आहे? समजून घ्या..
==
त्याच्या विरोधात नुकसान भरपाईकरिता सरकारने न्यायालयीन करवाईचा आधार घेतला होता.
२००८-२००९ साली झालेल्या Radia टेप वाद प्रकरणात मुकेश अंबानींच्या रिलायंस कंपनीचं नाव हे निरा राडीया ह्यांच्या कंपनीच्या प्रमुख क्लाइंट लिस्टमध्ये होतं.
२०१४ साली CAG ने दिलेल्या एक अहवालानुसार गुजरात राज्य सरकार काही विशिष्ट खाजगी समूहांना प्राधान्य देत असल्याचं नमूद करण्यात आलं होतं आणि त्यात अंबानी तसेच अदानी ह्या दोन्ही उद्योजकांची नावं चर्चेत आली होती.
रिलायंस ने काही वर्षांपूर्वी दूरसंचार क्षेत्रात आणलेल्या “जिओ सिम कार्ड”ने भारताच्या दूरसंचार क्षेत्रात क्रांती आणली खरी, पण आणलेल्या ह्या बदलाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.
तसे पाहता बऱ्याच वादविवादात ही व्यक्ती आणि त्यांचा समूह अडकला आणि अगदी आरामात सुटला देखील, हे इतकं सहज सोपं कसं असू शकतं, असा प्रश्न कुठल्याही वाचकाला पडू शकतो. पण त्याचं उत्तर निवडणुकीआधी दिल्या गेलेल्या पक्षानिधीमध्ये दडलेलं असू शकतं आणि हे आणखीही बरेच अंदाज, तर्क लावणे साहजिकच शक्य आहे. पण हे असंच चालत राहणार का?
सत्तेच्या तिजोरीचा मालक आपण निवडून द्यायचा तर खरा पण चाव्या नेहमीच एकाकडे असणार, सत्ता कुणाचीही असो पण तो मात्र त्याच जागेवर त्याच भूमिकेत असणार कारण त्याच्याकडे पैसा आहे तो भांडवलशाह आहे, हा खरा यक्ष प्रश्न आहे.
बाकी अंबानीने भ्रष्टाचार केला का? ते भ्रष्टाचारी आहेत का? हे प्रत्येक वाचकाने ठरवावं कारण सद्यस्थितीत कायदेशीररित्या ते सिद्ध होणे तसे तर कठीणच आहे.
सध्या सत्तेत असलेलं भाजप सरकार काम करत आहे, पण तेही अगदी धुतल्या तांदळाइतकं स्वच्छ आहे, असा दावा कुणी करणे शक्य नाही. पूर्वीच्या सरकारने केलेले भ्रष्टाचार, चुकीचे व्यवहार ह्यांना कंटाळून लोकांनी नव्या सरकारला संधी दिली आहे.
जर भविष्यात सत्ताबदल पहायला मिळाला तर ज्या उद्योग विश्वाचं बोट धरून सध्याचं सरकार वाटचाल करत आहे, त्याच उद्योग समूहांचं दुसऱ्या हाताचं बोट विरोधकांना धरायला मिळू शकेल आणि हे केव्हा घडलं हे आम्हा सामान्यांना कळणार देखील नाही.
==
हे ही वाचा : ह्या एका ऐतिहासिक कारणामुळे, PNB ची वाताहत भारतासाठी क्लेशकारक आहे
==
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.