लान्सनाईक “हनुमंतअप्पा” यांच्या सियाचीनमधल्या बचावाची चित्तथरारक कथा चित्रपटापेक्षा कमी नाही!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक: नचिकेत शिरुडे
===
आपण आपल्या घरात बसून टीव्हीवर बघत असतो हिमालय पर्वत, त्या हिमालयातील सुंदर दऱ्या खोरे, अप्रतिम निसर्ग, बर्फाच्छादित शिखरे आणि सहज मनोमन त्या सौंदर्याला बघून मंत्रमुग्ध होत असतो. पण ते म्हणतात ना, दुरून डोंगर साजरे, तसंच काहीसं आहे ह्या हिमालयाच्या डोंगरांच्या बाबतीत.
उंच धिप्पाड शिखरांच्या बाबतीत आणि या शिखरांवर असलेल्या ग्लेशियर्सच्या बाबतीत, असंच एक ग्लेशियर आहे या हिमालयात, २०,५०० फूट उंचीवर, ते ग्लेशियर जगातील सर्वात उंचावरची युद्धभूमी म्हणून देखील ओळखले जाते.
त्या ग्लेशियरचं नाव आहे “सियाचीन”.
–
- रक्त गोठवणा-या थंडीतही शत्रुवर करडी नजर ठेवणारी भारताची लेक, नक्की वाचा!
- चीनवर नजर ठेवणाऱ्या भारतीय सैन्याची “उबदार” मदत करणारं “हिम तापक”
–
कारगिल युद्धाच्या काळापासून सियाचीनमध्ये भारतीय सैन्य तैनात आहे. सियाचीनच्या एका बाजूला पाकिस्तान आहे तर दुसऱ्या बाजूला चीन आहे. दोन्ही देशांच्या मध्ये आहे भारतीय जवानांची फळी- जी चोविस तास पहारा देत असते आणि देशाच रक्षण करत असते.
भारतीय सैन्याच्या ६ विविध रेजिमेंट्स या भूमीवर तैनात आहे, यात एक आहे मद्रास रेजिमेंट, जी सियाचिनच्या पश्चिमी भागात तैनात केलेली आहे. जिथून ते चोवीस तास शत्रूच्या हालचालीवर लक्ष ठेवून असतात.
पण सियाचीन मधील सैनिकांना फक्त मानवी शत्रूचा सामना करावा लागत नाही, त्यांचासमोर त्याहून एक अत्यंत भयानक शत्रू असतो तो म्हणजे “निसर्ग”.
–
- ऑपरेशन मेघदूत: भारताने बर्फात पाकिस्तानला हरवून सियाचिनवर तिरंगा फडकावला
- सलाम : पाकिस्तानातला जन्म असूनही भारतासाठी “सियाचीन राखणारा” अपरिचित वीर
–
आणि ह्याच निसर्गाने दोन वर्षांपूर्वी भयंकर रूप धारण केलं होतं. भुस्खलन झालं. एक हिमनगाचा विशालकाय कडा बघता बघता खाली कोसळला, संपूर्ण मद्रास रेजिमेंटचा कॅम्प त्या विशाल हिमनगाच्या खाली गेला होता. सर्व वीर जवानांचा मृत्यू या प्रकोपात झाला पण एक असा जवान होता, ज्याने या नैसर्गिक आपत्तीशी दोन हात केले होते.
तो ३५ फूट बर्फाच्या ढिगाऱ्या खाली देखील जिवंत राहिला होता, त्या वीर जवानाचे नाव होते लान्स नायक हनुमंतअप्पा.
३ फेब्रुवारीच्या रात्री सियाचीनच्या रणभूमीवर पहारा देत असलेल्या मद्रास रेजिमेंटच्या दहा जवानांना माहिती नव्हतं की कोणतं संकट त्यांची वाट बघतं आहे. रात्रीच्या वेळी अचानक भूस्खलन झालं, हिमनगाचा प्रचंड मोठा कडा खाली तीव्र वेगाने कोसळला.
मद्रास रेजिमेंटच्या जवानांचा पूर्ण कॅम्पच त्या बर्फाच्या ढिगाऱ्याखाली आला होता.
ही बातमी समजताच संपूर्ण देशात शोककळा पसरली होती. सैन्याच्या प्राथमिक सर्च ऑपरेशनवरून व घटनेच्या तीव्रतेवरून कोणी वाचलं नाही याची भारतीय सैन्याला खात्री पटली होती.
लगेच दुसऱ्या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकरांनी ट्विट करून भारताच्या जनतेला सर्व जवान मृत्यूमुखी पडल्याची सूचना दिली होती.
नंतर आर्मीने २०० जवानांची टीम बनवली, त्यात श्वानपथक होते, बर्फ फोडून बाजूला काढणारे यंत्र होते, या सर्वांच्या मदतीने बर्फाच्या खाली दबलेल्या मृतदेहाचा शोध सैन्याने सुरु केला. कुत्र्यांचा मदतीने त्यांना दबलेल्या प्रेतांचे ठिकाण भेटत होते.
त्यानुरूप अत्यंत प्रतिकूल अश्या वादळी हवामानाच्या परिस्थितीत देखील जवानांचे मृतदेह बाहेर काढले जात होते. या ऑपरेशनच्या सहाव्या दिवशी त्यांना कळलं की या बर्फाच्या ढिगाऱ्याखाली एक व्यक्ती आहे.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
तब्बल ३५ फूट बर्फाच्या खाली ती व्यक्ती होती. आर्मीला वाटलं की हा मृतदेहच असणार म्हणून त्यांनी नेहमी प्रमाणे रॉक ड्रिल करून बर्फ बाजूला केला. टीमच्या एका जवानाने खड्यात उडी मारत देह उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला जाणवले की ती खड्यात पडलेली व्यक्ती जिवंत आहे.
त्याने लगेचच आपल्या टीमला यासंदर्भात सूचना केल्या आणि लगेचच हळुवारपणे लांसनायक हनुमंतअप्पाना यंत्राद्वारे बाहेर काढण्यात आले.
त्वरित वरिष्ठांना तश्या सूचना करण्यात आल्या. लगेच ऍक्शन घेत हेलिकॉप्टरच्या मदतीने प्रथमोपचार करत कॅप्टन हनुमंतअप्पांना दिल्लीला आर्मी हॉस्पिटलला रवाना करण्यात आलं जिथे त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले.
३५ फूट बर्फाखाली तब्बल उणे ५५ डिग्री तापमानात लान्सनायक हनुमंतअप्पानी दिलेली मृत्यूची झुंज अनेकांना अचंबित करणारी होती. हा एक अमानवीय संघर्ष ३० वर्षांच्या लढाखु हनुमंतअप्पांनि लढला होता.
जशी हनुमंतअप्पा जिवंत असल्याची बातमी उत्तर कर्नाटकातील धारवाड येथील त्यांच्या घरी समजली त्यांनी एकच जल्लोष करायला सुरुवात केली. देशभरातून हनुमंत अप्पांच्या शौर्याला व संघर्षाला लोकांनी सलाम ठोकला.
—
हे पण वाचा:
असतोस “उरी” तू जेव्हा: तिरंगा उराशी कवटाळलेला, अंतर्मुख करणारा हुतात्मा राणेंच्या पत्नीचा फोटो
भारतीय सैन्यावर दगडफेक करण्यासाठी काश्मिरी तरुणांना मिळतो पगार
—
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी , तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकरांनी हॉस्पिटल मध्ये जाऊन हनुमंतअप्पांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
त्यांना वाचवण्यासाठी पुरेपूर मदत करण्यात आली. त्यांचा परिवाराला प्लेनने दिल्लीला आणण्यात आलं. देशभर लोकांनी हनुमंत अप्पांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना सुरु केली होती.
दुसरीकडे सैन्याने ढिगाऱ्याखालचा इतर फसलेल्या सैनिकांच्या देहाना काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करायला सुरुवात केली. परंतु त्यांना वाचवण्यात अपयश आलं. इतर सैनिकांनी निसर्गाशी व शत्रूंशी लढण्यात प्राण त्यागले होते.
फक्त हनुमंतअप्पा अगदी चमत्कारिकरित्या मृत्यूशी सुरु असलेल्या संघर्षात आश्चर्यकार्यक रित्या बचावले होते.
खरंतर हनुमंतअप्पांंना त्या बर्फाच्या ढिगाऱ्याखालून काढण्यात जरी सैन्याला यश आलं होतं तरी त्यांचा शरीराला झालेल्या जखमा आणि पूर्णपणे गोठलेले अवयव यामुळे त्यांना वाचवणं शक्य झालं नाही आणि दिल्लीतील मिलेटरीच्या इस्पितळात त्यांनी प्राण त्यागला आणि असामान्य संघर्षाचा शेवट झाला होता.
पण जेव्हा भविष्यात सियाचीन आणि तेथे तैनात असलेल्या मद्रास युनिटचे नाव निघेल तेव्हा लान्स नायक हनुमंतअप्पांनी निसर्गाशी दिलेली झुंज आणि त्यांना वाचवण्यासाठी आर्मीने केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांबद्दल सदैव स्मरण केलं जाईल.
आपल्यासाठी ऊन वारा पाऊस कसलाच विचार न करता अत्यंत प्रतिकूल परस्थितीत देशाचं रक्षण करणाऱ्या, ते करतांना आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सैनिकांप्रती प्रत्येक भारतीयाचा मनात निसंदेह श्रद्धा असणे हेच आपल्या भारतीयत्वाचे लक्षण आहे.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.