Site icon InMarathi

फोनची रिंग वाजल्यानंतर टीव्हीच्या स्पीकरमधून कर्कश्श आवाज का येतो? समजून घ्या..

ringing-phone (1)

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तुमच्याकडे जर मोबाइल असेल तर तुम्हाला माहीतच असेल की ते किती शक्तिशाली यंत्र आहे. पण मोबाईल सुद्धा परफेक्ट नाही. मोबाइलची स्क्रीन मोबाईल पडला की फुटणं असो किंवा पाण्यात पडल्याने त्याची बॅटरी फुगणं असो –

या गोष्टी मोबाइल बाह्य परिणामांना बळी पडत असल्याचेच दाखवून देतात.

 

 

या मोबाईलचे आणखी एक आश्चर्यकारक फिचर म्हणजे –

मोबाईलची रिंग वाजल्यावर जर बाजूला स्पीकर चालू असेल तर त्याच्या आवाजात होणारा विचित्र बदल.

तुम्हाला नक्कीच आठवेल, तुमचा मोबाईल जवळपास वाजल्यानंतर कर्कश्य आवाजात ओरडणारा तुमचा स्पीकर.

सुरुवातीला स्पीकरच्या आवाजातला हा बदल आपण मोबाईल वाजण्याशी जोडत नसलो तरी आता मात्र आवाज बदलला की आपलं लक्ष सहजच मोबाईल वाजतोय का? याकडे जातं.

तर प्रश्न असा आहे की हा असा कर्कश आवाज नेमका कशामुळे येतो?

 

 

कर्कश्य किंचाळीमागचे विज्ञान:

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, आपण हे समजून घ्यायला हवे की प्रत्येक मोबाईल फोन हा वस्तुतः एक रेडिओ ट्रान्समीटर असतो.

आणि हा डिजिटल आवाजाच्या सुक्ष्मकणांचे आणि त्या मोबाईलमधील डेटा फाईल्सचे वहन बेस स्टेशनकडे म्हणजेच टॉवरकडे करत असतो, जेणेकरून दोन टोकांमध्ये संवाद प्रस्थापित होऊ शकेल.

बहुतेक स्पीकर्समधील तारांची जोडणी ही संरक्षित नसते आणि त्या स्पीकरमध्ये टिपिकली एक non-linear वर्तुळाकार घटक म्हणजेच ट्रान्झिस्टर असतो जो हे high-pulse radio signals ओळखतो.

त्यानंतर स्पीकर्समधील घटक रेडिओ सिग्नल्स ऑडिओ सिग्नल्समध्ये ट्रान्सलेट करतात. हाच कर्कश्य आवाज नंतर आपल्याला स्पीकरमधून ऐकू येतो.

आधीच स्पीकर मधून ऐकू येणाऱ्या आवाजाची गुणवत्ता चांगली नसते. त्यात याची आणखी भर पडते. चालू नसलेल्या स्पीकर बाबतीत शक्यतो हे घडत नाही.

मात्र काही प्रकारचे फोन हे बंद असलेले स्पीकर्स चालू करतात.

दुय्यम दर्जाचे मोबाईल फोन असे शक्यतो करू शकत नाहीत आणि त्यांची स्पीकर्सच्या अँटिनाशी कमी interaction होते.

 

 

आणखी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर स्पीकरमध्ये एक अँटिना असतो. जेव्हा तुम्ही मोबाईलवर बोलत असता तेव्हा हा अँटिना बेस सिग्नलवरून पाठवलेले रेडिओ सिग्नल्स स्वीकारतो.

हा अँटिना ते सिग्नल्स स्वीकारतो आणि स्पीकरमधून आपल्याला काहीच स्पष्ट ऐकू न येता फक्त गोंधळ ऐकायला येतो.

जोवर आपले फोनवरील बोलणे संपत नाही तोवर हे चालू राहते. अशा वेळी रेडिओ सिग्नल्स एकीकडून दुसरीकडे पोहोचू शकत नाहीत.

या त्रासापासून वाचण्यासाठी काय कराल?

खरंतर हे उपाय अगदीच आपल्या कॉमन सेन्सवर आधारित आहेत. या कर्कश्य आवाजापासून वाचण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमचा मोबाईल हा स्पीकर्स पासून पुरेशा अंतरावर ठेवा.

साधारणपणे यामुळे निर्माण होणाऱ्या अडथळ्याची रेंज ही काही विशिष्ट फूट इतकी असते. तर काही केसेस मध्ये ही काही इंच इतकी कमी देखील असू शकते.

 

 

जर तुम्हाला या आवाजाचा कधीच त्रास होऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही योग्य प्रकारच्या स्पीकर्सची निवड कराल म्हणजे असे जे पुरेशा चांगल्या प्रतीचे आहेत.

डिजिटल इनपुट्स असणारे चांगल्या प्रतीचे स्पीकर्ससुद्धा जुन्या स्पीकर्ससारखा कर्णकर्कश्य आवाज करत नाहीत.

अत्यल्प किंमतीच्या स्पीकर्सच्या subwoofer मध्ये असलेल्या amplifier चे संरक्षण तुम्ही तो amplifier, tin foil च्या वेष्टनात गुंडाळून आणि तो जमिनीवर ठेऊन करू शकता.

याने तुम्ही आवाजात येणारे अडथळे टाळू शकता.

 

 

वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल हे Radio signal situations मध्ये वेगळ्या प्रकारे कार्य करतात.

उदाहरणार्थ, TDMA (Time Division Multiple Access) फोनमधून रेडिओ सिग्नल्स जवळच्या स्पीकर्सपर्यंत लगेचच पोहोचतात. त्यामुळे असे मोबाईल स्पीकर्स जवळ नेणे किंवा स्पीकरलगत ठेवणे वाईट ठरते.

तर दुसरीकडे CDMA (Code Division Multiple Access). हे फोन येतात. हे फोन नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार करण्यात आले असल्याने यामध्ये अशा प्रकारच्या interference च्या खूप कमी तक्रारी ऐकायला मिळतात.

यातला एक प्रकार हा दुसऱ्या प्रकारापेक्षा हरेक बाबतीत दुसऱ्यापेक्षा उजवा ठरेल असे नाही.

कारण CDMA आणि TDMA या फोनच्या मूलभूत तंत्रज्ञानात फरक आहे.

पण तुमचा फोन वाजला असता जर तुमच्या स्पीकरमधून किंचाळल्यासारखा कर्णकर्कश्य आवाज येत असेल तर कोणता फोन घेणे इष्ट ठरेल हे तुम्हाला समजलेच असेल.

 

 

यासाठी सर्वांत उत्तम मार्ग म्हणजे तुमचा मोबाईल तुमच्या खिशात ठेवणे.

आणि शक्यतोवर तुम्हाला कोणाचा फोन येणार आहे हे अगोदरच ठाऊक असेल तर तेव्हा त्या ठिकाणी असलेल्या कमी प्रतीच्या स्पीकर्स शेजारी उभे न राहणे.

तुमचा मोबाईल स्पीकर आणि स्पीकरची वायर यापासून शक्य होईल एवढा दूर ठेवा.

जर तुम्ही तुमचा मोबाईल स्पीकरपासून तीन ते सहा फूट लांब ठेवलात तर स्पीकरला मिळणारी ऊर्जा ३/४ ने कमी होईल.

तुम्ही तुमचा मोबाईल पूर्णपणे बंद ठेवू शकलात तरी तुम्हाला हा त्रास होणार नाही. पण काही मोबाईल्स असेही असतात जे तुम्ही पूर्णपणे बंद केले आहेत असे तुम्हाला वाटते, पण ते तसे बंद झालेले नसतात.

ते मोबाईल नेटवर्क्सना रिस्पॉन्स देत असतात. फक्त त्यांनी त्यांचा आवाज बंद करून ठेवलेला असतो. अशावेळी जर फोन पूर्णतः बंद झालेला नसेल तर तुम्ही मोबाईलची बॅटरी काढून ठेवा. यामुळे तुम्ही निश्चितपणे स्पीकरमधून येणाऱ्या कर्णकर्कश्य आवाजपासून वाचू शकाल आणि संगीताचा उपभोग घेऊ शकाल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version