आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
क्रिकेट हा भारतीयांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यात भारत कोणाविरुद्ध लढतो आहे हे पण क्रिकेट प्रेमींसाठी तितकंच महत्त्वाचं असतं. भारत पाकिस्तान मॅच ला ज्या प्रमाणे सर्वात जास्ती भाव मिळतो त्याच प्रमाणे भारत आणि इंग्लंड ह्या दोन देशातील मॅच ची पण तितकीच उत्सुकता असते.
सध्या गरम गरम चर्चा रंगतेय ती ह्याच सामन्यांची. इंडिया विरुद्ध इंग्लंड च्या टेस्ट सिरीज ची.
पण ती चर्चा ऑफ ग्राउंड चालुये असं म्हणायला हरकत नाही.
जेव्हा संघ बांधणी होते तेव्हा बऱ्याच बैठका होतात, चर्चा होते, संघ कप्तान आणि बाकी BCCI मेंबर्स च्या सर्वानुमते एक संघ निश्चित होतो आणि तो त्या मॅच साठी परदेशात पाठवला जातो. ह्या बैठकीत बरेच ब्रेन स्टोर्मिंग होत असावे कारण भारतात अव्वल दर्जाचे अनेक खेळाडू आहेत.
काहींनी एकदिवसीय मॅच मध्ये, काहींनी T20 ह्या नव्या पद्धतीच्या खेळात आणि काहींनी 5 दिवसीय मॅच मध्ये वेगवेगळे उच्चांक रचलेत. ह्यातील काही खेळाडू जे परदेशातील खेळा साठी, तिथल्या हवामानाशी, पिच शी जुळवून घेतील आणि विरोधी संघाच्या खेळाडूंना पुरून उरतील असेच असावे लागतात.
काहींना संघात स्थान मिळते तर काहींना डच्चू द्यावा लागतो.
तर ह्याच टेस्ट सिरीज मध्ये एक ट्विटर वॉर उफाळून आलंय. इंग्लंड ला गेलेल्या भारतीय क्रिकेट संघाला, दुसऱ्या टेस्ट मॅच च्या आधी तेथील हाय कमिशन कडे ‘डिनर’ चं निमंत्रण आलं होतं. सगळे संघाचे सदस्य, इतर कर्मचारी आणि प्रशिक्षक सगळ्यांनाच बोलावणं होतं.
पार्टी चांगली पार पडली. फोटो काढले गेले आणि नेहमीच्या सवयीने ते सोशल मिडियावरही अपलोड केले गेले.
#TeamIndia members at the High Commission of India in London. pic.twitter.com/tUhaGkSQfe
— BCCI (@BCCI) August 7, 2018
खरं तर खेळाडूंना परदेशात जाताना काही प्रोटोकॉल पाळावे लागतात. BCCI च्या नवीन नियमांनुसार खेळाडूला स्वतःची मैत्रिण किंवा बायकोलाही सोबत आणण्याची परवानगी नसते. अशात सगळ्या पार्टीच्या फोटोंमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा अगदी जोडीने उपस्थित होते. त्यातून फोटोचाही प्रोटोकॉल फॉलो केला गेला नव्हता.
विराट कोहली हा संघकप्तान पुढे असतो तसा उपकप्तान देखील पुढेच असायला हवा. त्या फोटोंमध्ये उपकप्तान मागच्या रांगेत उभा होता.
अनुष्का शर्मा एखाद्या संघातील खेळाडू प्रमाणे विराट च्या बाजूला उभी होती. ह्या फोटोंमुळे तर चालू झाला ‘ट्रोल्लिंग’ म्हणजे आपल्या भाषेत शालजोडीतून टोमणे मारायचा खेळ.
एका ट्विटर सदस्याने लिहिले की,
‘रोहित शर्माला संघात स्थान दिले असते तर ती जागा (म्हणजे अनुष्का उभी असलेली जागा) मोकळी राहिली नसती.’
दुसऱ्या एका ट्विटर वर ट्वीट होता की,
‘रोहित शर्माची बॅटिंगची सरासरी बाकी नवख्या बॅट्समन पेक्षा नक्की चांगली आहे तर त्याला संघात घ्यायला काय हरकत होती?’
Rohit Sharma averages 58.19, batting at no 6 in tests. That is more than any batsman playing currently in the world. @BCCI @ImRo45
— ANSHUMAN🚩 (@RohitsAvenger) August 7, 2018
ह्या आणि अशा अनेक ट्वीटस येत राहिल्या. रोहित शर्माच्या चाहत्यांनी त्यांच्या नाराजीला अशी वाट मोकळी करून दिली.
अर्थातच स्वतः चांगलं खेळाडू असल्याने रोहित शर्मा देखील BCCI च्या संघ निवडीवर नाराज होता. त्याने चक्क काही ट्वीटस् ना आपली पसंती दर्शवून सोशल मीडियावर उघडपणे आपली नाराजी नोंदवली. त्यालाही असेच वाटले असणार जे त्याच्या चाहत्यांना वाटत राहिले आहे.
अशा तऱ्हेने चाहत्यांशी त्याने हात मिळवणी करून आपला ‘सात्विक’ संताप व्यक्त केलाच.
त्याला संघात न घेण्यामागचं कारण BCCI ने स्पष्ट केलेलं आहे. साऊथ आफ्रिका संघाबरोबरच्या टेस्ट मॅच मध्ये आणि इतर देशाबाहेरील काही सामन्यांमध्ये रोहितची चुणूक जाणवली नव्हती. त्याचा नैसर्गिक खेळ थोडा बिघडला होता. म्हणून त्याच्या जागी नवोदित करुण नायरला इंग्लंड टेस्ट साठी घेतले गेले. त्याने स्वतःची निवड ही सार्थ ठरवली.
पण कायम चांगला खेळत आल्याने अचानक संघातून असा विश्रांती वजा डच्चू मिळाल्याने रोहित चांगलाच नाराज आहे.
त्याच्या ह्या नाराजीवर मात्र कप्तान आणि BCCI चिंतेत आहेत. विराटचं म्हणणं असं आहे की पुढे भरपूर अति-महत्वाच्या मॅचेस ओळीने असणार आहेत आणि रोहित शर्मा सारख्या अत्यंत महत्वाच्या खेळाडूला तेव्हा संघात नक्कीच स्थान असणार आहे.
रोहितला कधीच डावलले जाणार नाहीये. तो अष्टपैलू खेळाडू आहे आणि आम्हाला त्याची कायमच गरज आहे.
ह्यावरून कदाचित आता रोहित शर्माच्या राग थोडा शांत झाला असावा. कारण आत्ताच त्याच्या नवीन ट्विट मध्ये त्याचा नाराजीचा सूर चाहत्यांना थोडा मावळलेला दिसला आहे.
रोहित आता नवीन येणाऱ्या मॅचेस कडे लक्ष लावून बसला आहे. त्याला खात्री आहे की तो पुढे नक्कीच चांगला खेळ करेल आणि त्याच्या चाहत्यांच्या विश्वासाला खरा उतरेल..!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.