आणखी एक “अभिमन्यू” डाव्या संघटनांचा स्वगृहीचा बळी : माध्यमांनी मौन का बाळगलंय?
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
Google न करता, कोण हा अभिमन्यू? हे कळणारे, ओळखणारे किती जण असतील? मराठी वाचणाऱ्या/लिहीणाऱ्या किती लोकांना हे नाव माहीत आहे? काय प्रकरण आहे ही व्यक्ती?
काय महत्वाचं घडलंय या नावासंदर्भात? काय आणि का महत्वाचं असावं याच्याकडे?
महावीद्यालयीन वयातील लोकांना विद्यार्थी संघटना आणी त्या संदर्भातील घटना-गोष्टी नक्कीच परिचीत असतील. तसेच विद्यार्थी संघटनांशी जोडलेल्या लोकांना देखील कित्येक घटना, त्याचे तपशील, कारणे-घटनाक्रम-परिणाम माहीत असतात.
कॉलेजमध्ये जाणाऱ्या वयाची मुलं/मुली बहुतांशी बंडखोर, प्रश्नांना भिडणारी, स्वतःच्या क्षमता पडताळण्यासाठी उत्सुक असणारी असतात.
मग पटलेल्या गोष्टींसाठी बरेचदा कशाचीही तमा न-बाळगण्याचं हे वय. विद्यार्थी संघटनांतून विधायक काम करणारे अनेकजण आहेत. तर पुढे राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आलेले देखील कित्येक!
वर उल्लेखलेलं नाव देखील अशाच एका आभाग्या विद्यार्थी नेत्याचं. होय अभागीच. मृत विद्यार्थी नेता.
मुन्नर जिल्ह्यात त्याचे आई वडील अत्यंत हालाखीच्या अवस्थेत रोजंदारीची कामे करून पोट भरत आहेत. तीन भावंडांत सर्वांत लहान असलेला अभिमन्यू २० वर्षाचा होता. पैशांअभावी मोठया भावाने दहावी नंतर शाळा सोडली आणी शेतीत राबतोय… तर बहीण देखील दहावी नंतर कापड कारखान्यात काम करते.
पैशांअभावी शिक्षण सोडावं लागलेल्या मुलांच्या पाठीवर उच्च शिक्षणाची आस घेतलेला अभिमन्यु महाराजा कॉलेजमध्ये शिक्षणासाठी आला.
५८ वर्षांचे वडील मनोहरन आणि ५० वर्षांची आई भुपती यांनी अभिमन्युला पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहीत केलं फक्त एक खोली असलेल्या घरात राहणाऱ्या अभिमन्युच्या आई बाबांना अभिमन्युला कॉलेजमध्ये पाठवण्यासाठी पैसे उधार घ्यावे लागले होते
घरची आर्थिक परिस्थीती तशी नाजुकच असल्याने जेव्हा कधी पैसे लागतील तेव्हा चुलतभावासोबत पडेल ते काम तो करत होता. हॉस्टेलवर राहताना बॅनर लिहीणे, रंगवणे, लावणे हे देखील तो करत होता.
कधी-कधी वापरलेले बॅनर अंथरूण म्हणून वापरता येतील म्हणून टाकून न-देता वापरत होता. अडचणीच्या वेळी पैसे मिळवण्यासाठी अभिमन्यु पोस्टर चिकटवणे, प्लंबिंगची वगैरे कामे करायचा, अस त्याच्या चुलत भावाने सांगितले
तशातच तो विद्यार्थी संघटनांच्या संपर्कात आला. बऱ्यापैकी वक्ता असल्याने त्याला काही SFI ने जबाबदार पद दिले. २० वर्षांचा अभिमन्यु SFI च्या ईडुक्की जिल्हा समितीचा सदस्य होता.
या वर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करणाऱ्या घोषणा, भिंतींवर लिहीण्यावरून वाद झाला. २ तारखेच्या रात्री अभिमन्यु आणि त्याच्या एका मित्रावर महाराजा कॉलेजच्या आवारात जीवघेणा हल्ला झाला. दुसऱ्या दिवशी इस्पितळात अभिमन्युचा दुःखद अंत झाला.
शुल्लक कारणांवरून २० वर्षांच्या तरुण मुलाचा दुःखद अंत झाला..
मागच्या २/३ वर्षांत विद्यार्थी संघटना आणी राजकारण अधिकच वादग्रस्त आणी उग्र झालेलं आपण पाहतोय. मग ते जे. एन. यु. मधील उमर खालीद/कनैह्या प्रकरण असो, किंवा राजमस कॉलेजधील हंगामा. या सर्वांत हंगामा झालेले प्रकरण म्हणजे रोहीत वेमुला.
रोहीत प्रकरणात शब्दशः शेकडोंच्या घरात लेख, बातम्या प्रसारीत केल्या गेल्या होत्या. कुठे निषेध सभा, तर कुठे निदर्शन केली गेली. अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर या प्रकरणाची दखल घेतली जावी, इतक्या प्रमाणात हवा निर्माण केली गेली.
असच एक प्रकरण नजीब अहमद नावाच्या मुलाचं. JNU मधुन अचानक गायब झालेल्या मुलाचा अजुन ठाव-ठिकाणा कळालेला नाही.
आता मुख्य मुद्दा..
वेमुला, कनैह्या , उमर खालीद, नजीब अहमद सर्व विद्यार्थी आणि वेगवेगळ्या कारणांनी प्रकाश झोतात आलेले.
या चौघांची नावं आणी त्यांच्या विषयीचा घटनाक्रम कुणालाही अगदी सहज सांगता येईल.
पण “अभिमन्यु” हे नाव आपल्या पैकी कित्येकांना गुगल केल्या शिवाय कळणार नाही. त्याच काय झालं? हे देखील गुगलच करावं लागेल. त्याच्या कुटुंबियांची आर्थिक स्थिती काय होती, हे देखील गुगल करावं लागेल. महाराजा कॉलेज कोणत्या राज्यात आहे ??? हे पण सहज सांगता येणार नाही
वेमुला, कनैह्या , उमर खालीद, नजीब अहमद ….या सर्वांना जितकं मिडीया कव्हरेज, माध्यमांच अटेंशन मिळालं तेवढं “अभिमन्युला” नक्कीच मिळाल नाही.
हे असं का व्हावं की विद्यार्थी संघटनांशी संबंधीत असुनही “अभिमन्यु” हे नाव गुगल करणे भाग पडावं?
केस स्टडी म्हणून वेमुलाची आत्महत्या आणि त्या संबंधीच रिपोर्टिंग पाहीलं तरी, अभिमन्यु तसा कम नशिबीचं म्हणायला हवा
कित्येक चॅनेल्स, पेपर्समध्ये वेमुलाचा मुद्दा काही महिने अविरत सुरू होता. मग या ही घटनेत एका तरुण-उदयोन्मुख विद्यार्थी-नेत्याने जीव गमावलाय. मग तरीही काही स्थानीक आणी काही मोजकी राष्ट्रीय वृत्तपत्र सोडली तर “अभिमन्युच्या” बाबतीत रिपोर्टिंग कमी झालयं.
ईंग्रजी भाषेतील राष्ट्रीय वृत्तपत्रांनी देखील ३/४ बातम्या देऊन विषय संपवलाय.
मराठी भाषेतील वृत्तपत्रांनी या ही वेळी निराशचं केलं. अभिमन्युच्या हत्येनंतरच्या एका महिनाभरातील लोकसत्तातील केरळातील बातम्यांचा आढावा घेतला तर या हत्येची बातमी नाहीये. वैयक्तीक लोकसत्ता प्रिंट वाचत नाही, मात्र on-line वाचतो. त्या वरून हे विधान.
प्रिंट एडिशन मध्ये या घटने बाबत बातमी असेल तर, माझे लोकसत्ता बद्दलचे हे विधान बिनशर्त मागे घेईन.
लोकसत्ताचे उदाहरण का? कारण लोकसत्तात बतम्यांसोबत ईतर विषयांवर वेगवेगळ्या लेखकांचे लेख. आणि विश्लेषण! त्यामुळे लोकसत्ता तसा सर्वंकष आणी बरेच विषय हाताळणारा.
JNU मधून गायब झालेल्या नजीब नावाच्या मुलावरून वादंग सुरु असतांना, पोलीस तपास सुरू असताना, दोषी कोण हे सिद्ध होणं बाकी असतांना, लोकसत्ताच्या अन्वयार्थ सदरात ‘नजीब अहमदचे काय झाले?’ मथळ्याचा लेख प्रकाशीत झाला होता.
सदर लेखात नजीबच्या गायब होण्यात उजव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनेचा हात होता, हे मांडलेल होत.
लेखन स्वातंत्र्य मान्य,पण तपास सुरू असताना कुणालाही सरळ-सरळ दोषी ठरवत वाचकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न !.
त्यातही बातमी आणी संपादकीय यात फरक असतो. बातमी म्हणजे जे घडले तसे इतरां पर्यंत पोहोचवणे. पण संपादकीय किंवा एखादा लेख म्हणजे घटनाक्रम, त्या संबंधीत तपशील तपासून, पडताळून केलेली कारण मीमांसा, विश्लेषण.
नजीब अहमद गायब होण्याच्या संदर्भात संपादकीय लिहीताना लेखकाने काय म्हणून उजव्यांना दोषी ठरवलं? हे आजही अगम्य. वेमुलावर, नजीब अहमदवर रकाने-च्या-रकाने लिहीणाऱ्या माध्यमांना अभिमन्युची हत्या का बरं महत्वाची वाटली नसावी? का कोणत्याही राष्ट्रीय चॅनेलने अभिमन्युच्या घरच्यांची अवस्था दाखवली नाही?
२०१४ च्या केंद्रातील सत्तांतरा नंतर अघोषीत आणीबाणी वगैरे म्हणत, का कोणत्या चॅनलने आपली स्क्रीन काळी केली नाही ? लोकशाही धोक्यात आलीये, वगैरे बडबडगीते कोणत्याही पेपरमध्ये वाचायला का बरं मिळाली नाहीत ?
वेमुला आणी नजीब प्रकरणात संदीग्धता आजही असतांना माध्यमांनी सरळ सरळ काहींना दोषी ठरवुन टाकले होते. त्याच माध्यमांनी आज या हत्येचं किती वृत्तांकन केलं? कित्येकांच्या समोर झालेली हत्या, आणी पकडले गेलेले आरोपी यांचे तपशील पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध असतांना एखादा लेख किंवा संपादकीय का बरं लिहीलं गेलं नाही मराठी वृत्तपत्रांत ?
२०१४ नंतर बातमी देतांना जातीय संदर्भांना फार महत्त्व आलंय. ते निकष इथेही लावता आले असते. कारण अभिमन्यु हा देखील बहुतेक निम्न स्तरांतून होता.
मग हे प्रकरण या अँगलनेही का बरं चित्रीत केल गेलं नाही ?
बरं अभिमन्यु देखील SFI या गैर-उजव्या विद्यार्थी संघटनेचा नेता होता. अभिमन्युची हत्या गैर-उजव्यां वरील अत्याचार वगैरे म्हणून देखील दाखवता आले असते. पण ते ही नाही. का? वेमुला प्रकरणात तर थेट केंद्रीय मंत्र्याला झळ पोचली होती.
मग इथे नेमक काय झालं? का ही बातमी राज्याच्या बाहेर माहीत नसावी?
महाराजा कॉलेज मध्ये, २०१७ मध्ये पार पडलेल्या निवडणुकांत १४ पैकी १३ जागा SFI ने जिंकलेल्या आहेत. म्हणजे महाराजा कॉलेज मध्ये तसा SFI चा स्ट्रॉंग होल्ड…मग तरीही हे प्रकरण राष्ट्रीय का झाले नाही? Autopsy करणाऱ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हल्ल्यानंतर अभिमन्यु ४० सेकंदां पेक्षा जास्त वेळ जगला नसेल.
राजकीय विश्लेषक NM Pearson यांच्या मते या हत्येमागे धार्मीक मूलतत्त्ववादाची घट्ट होत जाणारी पकड मुख्य कारण आहे.
जेष्ठ पत्रकार आणी राजकीय विश्लेषक के. सुनील कुमार या घटने बाबत म्हणाले की,
“सशक्त संघटनांकडे असलेले पाशवी वर्चस्व हे कॉलेज आवारातील वाढत्या हिंसेच एक कारण आहे. अशा बळाचा वापर करून, ईतर संघटनांना काम करू दिलं जात नाहीये.”
वेमुला आणी नजीब प्रकरणात संदीग्धता आजही असतांना माध्यमांनी सरळ सरळ काहींना दोषी ठरवुन टाकले होते….त्याच माध्यमांनी आज या हत्येचं किती वृत्तांकन केलं?
कित्येकांच्या समोर झालेली हत्या, आणी पकडले गेलेले आरोपी यांचे तपशील पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध असतांना एखादा लेख किंवा संपादकीय का बरं लिहीलं गेलं नाही? की डाव्यांच्या राज्यातील घटनांना केराची टोपली दाखवायची असते?
माहीतीसाठी…
अभिमन्यु SFI या डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनेचा नेता होता. SFI The Students’ Federation of India is the student wing of the Communist Party of India त्याच्या हत्येच्या आरोपाखाली अटक झालेले PFI – Popular Front of India, CFI – Campus Front of India, SDPI- Social Democratic Party of India या संस्थेचे कार्यकर्ते आहेत. SDPI is political wing of the Popular Front of India.
याच PFI च्या महिला शाखेच्या कार्यक्रमात माजी उपराष्ट्रपती हमीदजी अन्सारी सहभागी झाले होते. बाकी सुज्ञांस सांगणे नलगे!
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.