Site icon InMarathi

२००० पाकिस्तानी सैनिक+रणगाड्यांना हरवणारे १२० शूर भारतीय सैनिक!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक: शरद गोगावले

वो केहते है…

सुबह का नाश्ता लोंगेवाल में…

दोपहर का खाना रामगढ मैं…और…

शाम कि चाय जैसलमेर में करेंगे….लेकीन आज हम नाश्ता ऊनका करेंगे !

मरनेकी बात आज की है, दुबारा मत करना…. क्युंकी इतिहास गवाह है, जंग मरके नहीं जीती जाती !!!

बॉर्डर मधील सनी देओलचे हे डायलॉग आपल्या सर्वांच्या मनावर कोरले गेले आहेत.

ज्या प्रसंगावर बॉर्डर चित्रित झाला होता, त्याचा हा लेखाजोखा…!

१९७१ च्या भारत-पाक युद्धाला सुरुवात झाली होती. ४ डिसेंबर १९७१ च्या रात्री पाकिस्तानी सैन्याने रणगाडे आणी इतर युद्धसामुग्रीसहीत मोठ्या तयारीनीशी वेगात हल्ला केला.

लोंगेवाल-रामगढ-जैसलमेर अशी योजना होती त्यांची.

राजस्थान मधील लोंगेवाल पोस्टवर ब्रिगेडियर कुलदीपसिंग चांदपुरी यांच्या नेतृत्त्वाखाली १२० जवान तैनात होते आणि समोरून २००० सैन्यासहीत कित्येक रणगाडे चालुन येत होते.

 

मेजरनी हवाई हल्ल्याची मदत मागितली…पण अंधारात उड्डाण करू शकण्याची क्षमता नसल्याने, हवाई मदत सकाळ पर्यंत मिळणार नाही, तुम्ही पोस्ट सोडुन मागे फिरु शकता, असा संदेश बेस कॅम्प ने दिला…!

मेजर कुलदीपसिंग यांनी परतीच्या प्रवासातील धोका ओळखुन लढण्याचा निर्णय घेतला…आणी इतर जवानांना त्यांचा निर्णय सांगीतला.

सर्व जवानांनी एकमुखाने मरे-पर्यंत लढण्याचा निर्णय घेतला आणी भयानक लढाईला सुरवात झाली.

काही झालं तरी पहाटेच्या पहील्या किरणांपर्यंत पोस्ट सांभाळणे आवश्यक होते.

मेजरनी सर्व सैनिकांना चेतावलं…मोक्याच्या जागी जवानांच्या नेमणुका केल्या…स्वतः शस्त्रसज्ज झाले…!

रात्री साडेबाराच्या सुमारास पहिला हल्ला झाला….दोन्ही कडुन तुफान गोळीबार सुरु होता.

उंचावर असल्याने भारतीय सैन्याला पाकिस्तानी सैनिकांना टिपणे सोपं जात होत….या उलट, थर वाळवंटाच्या रेतीचा अवजड रणगाड्यांना त्रास होत होता, बरेच रणगाडे आग ओकणाऱ्या भारतीय रिकॉइललेस गन आणी भूसुरुंगाना बळी पडुन धडाधडा पेटले होते.

 

रात्री साडेबाराच्या सुमारास पहिला हल्ला झाला….दोन्ही कडुन तुफान गोळीबार सुरु होता.

उंचावर असल्याने भारतीय सैन्याला पाकिस्तानी सैनिकांना टिपणे सोपं जात होत….या उलट, थर वाळवंटाच्या रेतीचा अवजड रणगाड्यांना त्रास होत होता, बरेच रणगाडे आग ओकणाऱ्या भारतीय रिकॉइललेस गन आणी भूसुरुंगाना बळी पडुन धडाधडा पेटले होते.

Barb wire – वेटोळी केलेली संरक्षक जाळी, भुसुरुंग आणि वाळवंटातील रेती…यामुळे रणगाड्यांचा आणि इतर सैनीकी वाहनांचा वापर कुचकामी ठरला होता. त्यातच लोंगेवाल-रामगढ-जैसलमेर प्रवासासाठी रणगाड्यांवर जास्तीच इंधन petrol-diesel साठवून ठेवलं होतं… त्यानेही जळणाऱ्या रणगाड्यांचे नुकसान वाढवले…!

इकडे सूर्योदयाच्या पहील्या किरणांसोबत भारतीय लढाऊ विमानांनी उड्डाण केले आणि काही क्षणांत लढाईला निर्णायक वळण लागले.


अचुक नेम धरत रणगाडे, सैनीक आणी ईतर वाहनांचा काही मिनिटांत चुराडा झाला….आणि शत्रू सैन्यास रणांगण सोडावं लागलं.
लढाईत भारताचा विजय झाला होता !

हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानी रणगाड्यांनी माघार घेतांना, हल्ल्यापासून वाचण्यासाठी घेतलेली नागमोडी वळणं दाखवणारं हवाई छायाचित्र

कालांतराने मेजर आणि इतरांना सैन्य पुरस्कार दिले गेले.

सनी देओलने अभिनय केलेला “बॉर्डर” सिनेमा याच लढाईवर आधारीत आहे!

मेजर कुलदीप सिंग चंदपुरी, ज्यांची भूमिका सनी देओल ने निभावली होती.

स्रोत

पाकिस्तानी सैन्याची क्षती:

२०० जवान
३४ रणगाडे
५०० हुन अधिक सैन्य वाहन

भारतीय सैन्याची क्षती:

००२ जवान ( फक्त दोन )
००१ anti-aircraft gun

जागतिक स्तरावर प्रसिद्ध असणाऱ्या लढायांमध्ये या घटनेचा उल्लेख होतो…आणि अभ्यास देखील !

पाकिस्तान मात्र “आपणच युद्ध जिंकलो” अश्या खोट्या कंड्या पिकवत असतं. पाकिस्तानी सैन्याच्या खोटारडेपणाचा इतिहास वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 


Exit mobile version