Site icon InMarathi

अनेक नेत्त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी “मरीना बीच” का निवडला जातो? हा बीच एवढा खास का आहे?

marina

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

एखाद्या राज्यातील समुद्र हा त्या राज्याची ओळख असतो,

मात्र तो समुद्र ओळखला जातो तो त्याच्या विशालतेसाठी, त्याच्या सौंदर्यासाठी आणि तेथे होणा-या पर्यटकांच्या गर्दीसाठी.

मात्र तामिळनाडुतील मरिना बीच म्हटलं की आठवतो अनेक बड्या नेत्यांच्या अत्यंसंस्काराचा प्रसंग.

खरं तर हा समुद्रकिनारा भव्यदिव्य आणि अत्यंत नयनरम्य आहे, असं असतानाही य़ा ठिकाणी राजकीय वर्तुळातील नेत्यांच्या अत्यंसंस्काराचा हट्ट का धरला जातो, हा प्रश्न हमखास पडतो.

त्यासाठी तीन वर्षांपुर्वी घडलेली घटना आठवावी लागेल.

तामिळनाडूच्या राजकारणातील एक महत्वाची व्यक्ती म्हणजे पूर्व मुख्यमंत्री एम करुणानिधी यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजल्यानंतर करुणानिधी ह्यांच्या समर्थकांनी करुणानिधी ह्यांचे अंतिम संस्कार आणि स्मारक मरीना बीच वर बनविण्यात यावं अशी मागणी केली.

म्हणजेच करुणानिधी ह्यांना अग्नी न देता त्यांना दफन करण्यात यावे अशी त्यांची मागणी होती.

पण तामिळनाडू सरकारने यासाठी नकार दिला. नकार दिल्यानंतर तामिळनाडू सरकारच्या या निर्णयाला करुणानिधी यांच्या समर्थकांनी चेन्नई हायकोर्टात आव्हान दिले.

त्या दिवशी सकाळी झालेल्या सुनावणीत कोर्टाने करुणानिधी यांचे अंत्यसंस्कार मरीना बीच येथेच व्हावे आणि त्यात तामिळनाडू सरकारने बाधा आणू नये असे सांगितले.

या निर्णयानंतर करुणानिधी यांचे मरीना बीच येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. चाहत्यांच्या गर्दीत आणि शोकमग्न वातावरणात त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

financialexpress.com

 

आपल्याला माहित आहेच की जयललिता, रामचंद्रन आणि अन्नादुराई ह्यांचे अंतिम संस्कार ह्याच मरीना बीच वर करण्यात आले आणि करुणानिधी ह्यांचे अंतिम संस्कार देखील येथेच करण्याची मागणी जोरावर होती.

पण तामिळनाडू सरकार ह्याच्या विरोधात होते.

त्यामुळे हे प्रकरण कोर्टात जाऊन थांबले आणि कोर्टाच्या निर्णयानुसार आता करुणानिधी ह्यांचे अंतिम संस्कार मरीना बीचवर झाले.

राज्य सरकारने नकार देऊनही त्यांचे अनुयायी या मरीना बीचवर त्यांचा अंत्यसंस्कार करण्यावर ठाम राहिले.

हा मरीना बीच चेन्नई शहराचे सौंदर्य वाढवणारा. पण आपल्या नेत्याचे अंत्यसंस्कार आणि स्मारक त्याच ठिकाणी व्हायला हवं असं त्या लोकांना का वाटत होतं?

या मरीना बीचच्या बाबतीत असं काय खास आहे? पाहूयात..

२०१६ साली जेव्हा तामिळनाडूच्याच पूर्व मुख्यमंत्री जयललिता ह्याच्या मृत्यूवेळी देखील अशीच मागणी करण्यात आली होती.

याचे कारण जयललिता ह्यांचा संबंध द्रविड मुव्हमेंटशी होते आणि द्रविड आंदोलन हे हिंदू धर्माच्या कुठल्याही परंपरा मानत नाही.

ह्याआधी एमजी रामचंद्रन ह्यांना देखील दफन करण्यात आले होते.

तिथेच द्रविड आंदोलनाचे नेते आणि डीएमकेचे संस्थापक अन्नादुराई ह्यांची देखील कबर आहे.

 

newindianexpress.com

 

मरीना बीच हा चेन्नई शहरातील एक सुंदर ठिकाण आहे. हा किनारा उत्तर मधून फोर्ट सेंट जॉर्ज पासून सुरु होतो आणि दक्षिणेत फोरशोर एस्टेट पर्यंत आहे.

सहा किलोमीटर मध्ये पसरलेला हा समुद्र किनारा देशातील सर्वात सुंदर आणि लांब समुद्र किनारा आहे.

स्वातंत्र्यानंतर येथे ट्रायंफ ऑफ लेबर आणि गांधीजींच्या दांडी यात्रेची प्रतिमा देखील लावण्यात आली आहे.

bbc.com

 

येथे अव्वइयार, तिरुवल्लुवर, कम्बर, सुब्रमनिया भरतियार, भारतीदसन आहेत. १९७० साली येथे अन्नादुराई ह्याचं मेमोरियल बनविण्यात आलं होतं.

तसेच १९८८ साली एमजीआर स्मारक बनविण्यात आले. त्यानंतर येथे कामराज आणि शिवाजी मेमोरियल बनविण्यात आले.

आणि जयललिता ह्यांच्या मृत्युनंतर त्यांचे अंतिम संस्कार येथेच झाले आणि आता लवकरच त्यांचे स्मारक देखील बनविण्यात येईल.

करुणानिधी ह्यांच्या अंतिम संस्कारानंतर त्यांचे मेमोरियल देखील येथेच बनविण्यात येईल.

 

rediff.com

 

हा मरीना बीच चेन्नईमध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. आणि एवढ्या महान राजकारणांची स्मारके त्याला आणखी खास आणि वेगळं बनवितात.

अनेक द्रविड नेत्यांचा या ठिकाणी अंत्यसंस्कार झाल्याने मरिना बीच हे द्रविड अस्मितेचे केंद्रस्थान बनले आहे.

करुणानिधी यांनी हीच द्रविड अस्मिता आपल्या राजकीय कारकिर्दीत प्राणपणाने जोपासली.

आपल्या लाडक्या नेत्याचे निधन आणि त्याने झालेले नुकसान तामिळ जनतेला चटका लावून गेले.

या नेत्याचे अंत्यसंस्कार अशा महत्वाच्या ठिकाणी व्हावेत आणि तिथेच त्यांचे स्मारक उभे राहावे असे त्यांच्या अनुयायांना वाटणे साहजिकच होते.

त्याप्रमाणे चेन्नई हायकोर्टाने निकाल दिला आणि करुणानिधी याच मरिना बीचवर अनुयायांचे अभिवादन स्वीकारत अनंताच्या प्रवासासाठी निघून गेले.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version