युद्धधर्म- तत्त्वनिष्ठपणाची सांगड घालणारा कर्ण ‘महारथी’ होता हे दर्शवणारा अज्ञात प्रसंग
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
कौरव आणि पांडवांमध्ये युद्ध सुरु होऊन आता सोळा दिवस उलटले होते. सतराव्या दिवशी पुन्हा युद्धाला सुरुवात झाली.
अर्जुनाने कर्णाचा पुत्र वृषसेना याचा वध केला होता.
अर्जुनाला पुत्र वियोगाचे दु:ख काय असते हे कर्णाला दाखवून द्यायचे होते. कारण चक्रव्युह भेदण्यासाठी आत शिरलेल्या अर्जुनाच्या पुत्राला – अभिमन्यूला देखील हाल हाल करून मारण्यात आले होते.
परंतु आपल्या पुत्राच्या मृत्यचे दु:ख कुरवाळीत न बसता कर्ण पुन्हा लढण्यासाठी सज्ज झाला. कारण त्याला दुर्योधनाला दिलेले विजयाचे आश्वासन पूर्ण करायचे होते.
कर्ण अर्जुनाशी दोन हात करण्यासाठी सरसावला. इतक्यात अश्वसेना नाग नावाचा सर्प कर्णाच्या भात्यात शिरला.
हा तोच सर्प होता ज्याची आई अर्जुनाने खांडवप्रस्थला लावलेल्या आगीमध्ये जळून मृत्यू पावली होती.
त्या आगीतून अश्वसेना नाग कसाबसा वाचला. आपल्या आईच्या मृत्यूने व्यथित झालेल्या त्या सर्पाने त्याचे वेळी अर्जुनाचा नाश करण्याचा विडा उचलला.
आता कर्ण आणि अर्जुनाच्या युद्धप्रसंगावेळी त्याला आयती संधी मिळाली होती. त्याने स्वत:चे रूप पालटले आणि बाणाच्या रुपात तो कर्णाच्या भात्यात जाऊन बसला.
जेव्हा कर्णाने बाण काढण्यासाठी आपल्या भात्यात हात घातला, तेव्हा त्याच्या हाती रूप पालटलेला अश्वसेना नाग आला, पण ती गोष्ट कर्णाच्या ध्यानी आली नाही. त्याने आपल्या धनुष्याला बाण जोडला आणि सरळ अर्जुनावर सोडला.
अर्जूनाच्या रथाचे सारथ्य करणाऱ्या कृष्णाच्या ही गोष्ट लक्षात आली की समोरून आपल्या रोखाने येत असलेला बाण हा साधासुधा नाही.
आपल्या प्राणप्रिय अर्जुनाचे प्राण वाचवण्यासाठी त्याने चतुराईने आपल्या पायावर भार देऊन रथाचे चाक जमिनीच्या दिशेने झुकवले…! यामुळे रथ काहीसा वाकडा झाला आणि बाणाच्या रुपात अर्जुनाच्या ठाव घ्यायला चाललेला अश्वसेना नाग चुकला.
अर्जुनाचे नशीब बलवत्तर म्हणून तो अर्जुनाच्या मुकुटाला घासून गेला. चवताळलेला अश्वसेना नाग पुन्हा कर्णाकडे गेला आणि त्याने कर्णाला विनंती केली की
“तुझ्या शक्तिशाली धनुष्यामधून पुन्हा एकदा मला अर्जुनावर सोड. यावेळेस मी त्याचा प्राण घेतल्याशिवाय रहाणार नाही.” त्यावेळेस कर्णाने एखाद्या श्रेष्ठ योद्ध्याला साजेसे असे उत्तर त्याला दिले. कर्ण अश्वसेना नागाला म्हणाला,
“धनुष्यातून निघालेला बाण पुन्हा आपल्या शत्रूवर चालवणे माझ्यासारख्या वीराला शोभणार नाही, किंबहुना ते माझ्या तत्वांमध्ये बसत नाही. तू तुझा सूड उगवण्यासाठी दुसरा कोणता तरी मार्ग शोध. मला मात्र क्षमा कर.”
कर्णाचा नकार ऐकून अश्वसेना नाग स्वत:च अर्जुनाचा बळी घेण्यासाठी धावला. परंतु अर्जुनाने त्याला एकाच बाणात गारद केले आणि अश्वसेना नाग आपले प्राण गमावून बसला.
वरील प्रसंग तत्त्वनिष्ठ कर्णाचे दाखले देण्यास पुरेसा आहे. समजा कर्णाने नाग अश्वसेनाचे ऐकून दुसऱ्यांदा बाण अर्जुनावर सोडला असता, तर कदाचित अर्जुन तेव्हाच मारला गेला असता किंवा कृष्णाच्या कृपेने कर्णाचा तरी वध झाला असता.
पण कर्णाने संधी चालून आली म्हणून आपल्या तत्वांचा त्याग केला नाही. त्याने धर्मानेच युद्ध लढण्याचा मार्ग अवलंबिला.
इतक्या कठीण प्रसंगी देखील युद्धधर्म आणि तत्वनिष्ठपणा यांचा आधार घेऊन वागणारा केवळ एकच वीर असू शकतो तो म्हणजे श्रेष्ठ महारथी कर्ण होय!
===
- कौरव असूनही महाभारतात पांडवांच्या बाजूने लढणाऱ्या ‘अज्ञात कौरवा’ची गोष्ट!
- शापित कृष्ण! महापराक्रमी कृष्ण कधीच ‘राजा’ होऊ न शकण्यामागची अज्ञात कथा!
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.