Site icon InMarathi

१५ ऑगस्ट पासून एक तरुण मोदींजींकडून ह्या प्रश्नांच्या उत्तराची वाट पहातोय…पण…

modi-plastic-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणाच्या बाबतीत कुणी बरोबरी करू शकत नाही असं म्हणतात. त्यांच्या उद्बोधक भाषणशैलीत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याची ताकद आहे. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिन, मन की बात आणि परदेशातही अनेक ठिकाणी भारतीय समुदायाला उद्देशून केलेली भाषणे विशेष गाजतात.

स्वातंत्र्यदिनाच्या भाषणासाठी तर मोदी यांनी थेट लोकांकडून मुद्दे मागितले होते.


“माझ्या १५ ऑगस्टच्या भाषणासाठी तुमच्याकडे काय आयडिया आहेत? “नरेंद्र मोदी App” वरून तुमच्या कल्पना माझ्याशी शेअर करू शकता.”

असं त्यांनी एका ट्वीटमधून जनतेला आवाहन केलं होतं.

भारताच्या पंतप्रधानांनी भाषणासाठी जनतेकडून कल्पना मागीवण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी. हे ट्वीट केल्यानंतर माध्यमांमध्ये अनेक बाजूंनी चर्चा झाल्या होत्या. नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान कार्यकालाची चार वर्षे, त्यात दिलेल्या वचनांची पूर्तता.. वगैरे वगैरे.

पण या चर्चा पाहिल्यावर त्यातून बरेच महत्वाचे मुद्दे गायब असल्याचे दिसून आले. या मुद्द्यांना हात घालत काही प्रश्न फेसबुकवर स्वप्नील खैरनार या मनस्वी तरुणाने पोस्ट केले होते. त्याने पंतप्रधानांना या मुद्द्यावर प्रकाश टाकण्याची विनंती केली होती.

काय होते हे प्रश्न? – वाचा स्वप्नीलच्याच भाषेत –

===

संपादकीय आवाहन : सदर मुद्द्यांवर उत्तरं देण्याची इच्छा असणाऱ्या वाचकांनी आपली उत्तरं इनमराठीच्या फेसबुकपेज facebook.com/InMarathi.page वर मेसेज करावीत. अभ्यासपूर्ण उत्तरांना नक्कीच प्रसिद्धी देण्यात येईल.

===

१) नियोजन आयोग बरखास्त करून नीती आयोग का आणला?

 

catchnews.com

२) नोटबंदीने नेमकं देशविधायक काय सिद्ध झालं? त्याने देशाला नेमका कसा फायदा झाला?

नोटबंदी तुन किती जुन्या नोटा नेमक्या बँकेत आल्या? त्यातल्या किती काळ्या पैशावाल्या होत्या? त्या काळ्या पैशावाल्यांचं काय केलं? चलनात किती फेक नोटा होत्या? त्याने नेमका किती फायदा झाला?

नोटबंदी मुळे किती दहशतवादी, नक्षलवादी याचे कंबरडे मोडले?

 

dailiyo.com

२००० रुपयाच्या नोटेचं नेमकं प्रयोजन काय? २०० ची नोट त्यामुळे काढावी लागली का?

कॅशलेस भारत करायचा होता तर मग पूर्वी इतक्याच किंवा त्यापेक्षा जास्त नोटा का छापल्यात? नोटबंदी काळात किती लोकांच्या नोकऱ्या गेल्या? किती लोकं उपाशी झोपली? किती मेले?

GDP उगाच २% खाली आला का?

३) २०१४-१५ ला GDP मोजण्याची पद्धत बदलली, तरी तुलना करताना मागचे आकडे का दाखवतात?

 

Mocomi.com

४) रोजगाराची उपलब्धता कमी होते आहे, ती का?

 

Oneindia.com

रोजगारनिर्मितीची जी आश्वासने सत्तेत आल्यानंतरही वेळोवेळी देण्यात आली त्या आश्वासनांची कितपत पूर्तता झाली आहे?

५) एक देश एक कर ही संकल्पना असतांना GST चे वेगवेगळे दर का?

चला ते असेनात का.. पण GST लागू करायचा म्हणून करायचाच का? पूर्वतयारी म्हणून किमान वेबसाईट तरी फुलप्रूफ असावी की नाही? टॅक्समधला आमूलाग्र बदल म्हणून थोड्याफार चुका होऊ शकतात आणि त्यानुसार बदलही.

पण रोज काहीतरी बदलणार, कधी लॉजिकल कधी इलॉजिकल.

 

youtube.com

यामुळे छोट्या व्यावसायिकांवर किती परिणाम होतो हे कधी समजणार?

गोंधळ किती आहे त्याच एक उदाहरण द्यायचं म्हणजे तर मेडिसिन वर असणारा GST खरं तर नकोच! पण आहे!

0%, 5%,12%,18%… असा वेगवेगळा…!

आता मेडिसिनची कॅटेगरी मेडिसिन नाही का राहू शकत? – वगैरे सविस्तर प्रशांची उत्तरे वाटली तर द्या.

६) जनधन योजना, स्मार्ट सिटी, अटल पेन्शन, स्टार्ट अप इंडिया, स्वच्छ भारत योजना वगैरे यांचं बॅलन्स शीट द्याल का?

म्हणजे अगदी जी परिस्थिती आहे ती…?

 

interestinginfos.com

७) मागे म्हणे काहीतरी विधेयक आणलं होतं, की ज्यायोगे पार्टी फंड कुणी दिला, कसा दिला हे RTI मधून पण गायब केलं…!

 

post.jagran.com

आपल्या मीडिया ने नेमकं काही दाखवलं नाही. पण हे खरं आहे का? आणि असेल तर राजकीय माहिती अधिकाराच्या कक्षेतून बाहेर का ठेवले गेलेत?

८) तुम्ही भरमसाठ आश्वासने दिली. बरेच “इलेक्शन जुमला” होते हे आम्हाला ही समजतं!

त्यासाठी अमित शहा ह्यांचे उदाहरण द्यायची पण गरज नाही…!

पण कुठलं तरी निदान एक त्यासाठी पाऊल उचलण्यात आलंय असं काही आहे का?

शेतकऱ्यांचं उत्पन्न “दुप्पट” होईल असे आश्वासन होते. पण इथे हमीभाव मिळत नाही. रस्त्यावर भाजीपाला, दूध फेकलं जातंय.

 

navodayatimes.in

स्वामिनाथन आयोग लागू करू वगैरे आश्वासनं होती. तो तर आधीच्यानी त्यांच्या सोयीस्कर केलाय लागू. इथे कृषी मंत्री कोण हेच कळत नाही. किंवा आहेत का कुणी?

पटेल, गुज्जर, जाट, मराठा हे सवर्ण वेगवेगळ्या राज्यातले लोक पहिल्यांदा संयमित आंदोलन करताना नंतर हिंसक होतायेत. असं का?

तुमच्या जाहीरनाम्यात ह्या सगळ्यांना दिली गेलेली आश्वासने तर कारणीभूत नव्हेत…?!!!

९) आरोग्य, शिक्षण, महिला सबलीकरण यात नेमकं आपलं सरकार कुठे आहे?

ऑक्सिजनअभावी, अगदी छोट्या मोठ्या सेवेअभावी लहान बालक, गर्भवती स्त्रिया जीवानिशी अजूनही जातायेत.

 

navbharattimes.indiatimes.com

स्त्रीभ्रूणहत्या थांबवता येत नाहीये, स्त्री शिक्षण अजून दुय्यम आहे. त्याबद्दल नेमकी तजवीज काय? त्याच बॅलन्स शीट पण द्या.

१०) आपले नेते, आमदार, खासदार, मंत्री उठसूट काहीही बोलत असतात त्यांवर आपण काही कारवाई का करत नाही?

की आपलं त्यांना मौन समर्थन आहे?

 

newindianexpress.com

११) हिंदुत्त्ववादी सरकार सत्तेत आलंय, पण सत्तेत जे येतं ते फक्त “भारतवादी” असतं ही माझी धारणा.

पण काही संघटनांना चेव आलाय, म्हणून ते स्वतः कायदा हातात घेऊन इतर धर्मीयांबद्दल द्वेषच काय पण त्यांना अक्षरशः चेंदत आहेत. तेही कायदा हातात घेऊन!

 

minoritiesofindia.org

यावर आपलं सरकार नेमकं काय करतंय?

१२) जातीय, धार्मिक सलोखा वाढण्याऐवजी दुरावा वाढतोय.. तो का बरे?

 

ndtv.com

१३) विज्ञानाकडे जायला हवं तर ते पुराण, वेद का?

तुम्ही स्वतः प्लास्टिक सर्जरी पुराणात होती वगैरे दाखले देतात.. त्याची थोडी तरी वैज्ञानिकदृष्ट्या मांडणी करता येईल का?

 

thehindu.com

१४) गाय उपयुक्त पशु किंवा माणसाची संपत्ती आहे. पण तिला मातेचा दर्जा देऊन माणसाला आणि त्याच्या जीवाला गायीपेक्षा कमी लेखलं जातंय.

त्याबद्दल काही ठोस बोलाल का? काही कराल का?

 

BBC.com

टीप : हे माझं मत आहे, जेव्हा माझे पंतप्रधान असे  विचारतात की स्वातंत्र्यदिनी काय बोलू?

===

स्वप्नीलने सदर प्रश्न विचारून आता ४ महिने होऊन गेली आहेत. परंतु उत्तरं मात्र अजून मिळालेली नाहीत…!

===

संपादकीय आवाहन : सदर मुद्द्यांवर उत्तरं देण्याची इच्छा असणाऱ्या वाचकांनी आपली उत्तरं इनमराठीच्या फेसबुकपेज facebook.com/InMarathi.page वर मेसेज करावीत. अभ्यासपूर्ण उत्तरांना नक्कीच प्रसिद्धी देण्यात येईल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version