Site icon InMarathi

पेप्सी ने “कुरकुरेमध्ये प्लास्टिक असतं!” हा जोक फारच सिरियसली घेऊन इंटरनेटवर युद्ध पुकारलंय!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

पेप्सी कंपनीने नुकतीच फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब आणि ट्विटर सारख्या सोशल साईट्स विरुद्ध कोर्टात केस दाखल करून यांच्या कंपनीकडून २.१ करोड रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. तसेच त्यांचा नुकसानीस कारणीभूत असणाऱ्या पोस्ट विरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली आहे.

“जपून बरं”

कुरकुरे तर आपल्या आवडीचा टाइमपास, लहांनांपासून मोठ्यांपर्यंत आणि खाऊ पासून चकण्या पर्यंतच लोकप्रिय खाद्द्य! पण याच कुरकुरे च्या लोकप्रियतेला काही अफवांचं ग्रहण अशात लागत होतं. काय तर म्हणे “कुरकुरे मध्ये प्लास्टिक आहे…..”

कोणीतरी अफवा उठवली आणि काय हाहाकार माजला बाप्पा ! जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणीं तेच म्हटल्या सारखा.. फेसबुक-इंस्टाग्राम-ट्विटर-यु ट्युब सगळीकडे तेच..

‘सावधान, तुम्ही प्लास्टिक खाताय..’, ‘काय म्हणता? कुरकुरेत प्लास्टिक ?’

 

 

अश्या मथळ्याखाली मग बरेच जण आपलं ज्ञान पाजळत होते. आणि याचाच धसका घेतला पेप्सी कंपनीनं. नक्कीच त्याचा विक्रीवर आणि लोकप्रियतेवर परिणाम झालाच असणार.

या अफवेवर कसा निर्बंध घालावा यासाठी पेप्सी कंपनीने सरळ दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आणि आपलं गाऱ्हाणं गायलं. ज्याचा परिणाम म्हणून आज जेलभरो आंदोलन सारखंच “पोस्ट डिलीट करो आंदोलन” चालू झालंय.

“पोस्ट केलीत तर…..”

कुरकुरेमध्ये प्लास्टिक असल्याची खबर काय लागली, लोकांनी आपापले अनुभव देखील सांगायला सुरुवात केली, लोकांना नसती पोटदुखी आठवली. काहींनी आश्चर्य व्यक्त केले, काहींनी कंपनीला दूषणे दिली, काहींनी दुजोरा दिला, काहींनी समर्थन केले, काहींनी तर चक्कं युट्युबवरती व्हिडीओ पोस्ट केले.

कुरकुरे जाळताना म्हणे प्लास्टिक जाळल्या सारखा वास येतो. तसेच ते प्लास्टिक जळताना विरघळते तसेच विरघळत होते. अगदी जिवंत पुराव्यासकट गोष्ट सिद्धच केली गेली.

 

News18.com

त्याचे दुष्परिणाम, कंपनीने केलेली फसवणूक, त्याच्यावर विनोद बनवणे, मीम बनवणे या गोष्टींना तर ऊत आला होता. पेप्सिको ला याची खबर लागताच तिने आरोप पत्र दाखल केले. ज्यात या सर्व सोशल साईट्स ना या नुकसानीस कारणीभूत समजले आहे आणि अश्या अफवांना पसरविण्यास एक माध्यम बनल्या बद्दल त्यांचावर आरोप करण्यात आले.

तसेच साईटवर पोस्ट करणाऱ्यांना मूकसंमती दिल्या बद्दल या सोशल साइट्स कडून नुकसान भरपाई म्हणून २.१ करोड रुपये मागितले आहेत.

तसेच कोर्टाची नोटीस असलेले इ-मेल्स काही लोकांना गेले असल्याचे समजले आहे, ज्यात त्यांना पेप्सिको विरुद्ध टाकलेली हि पोस्ट दिलेले करण्याचे आवाहन केले असून, कदाचित त्यांना कोर्टात यावे लागण्याची शक्यता आहे.

पेप्सिकोने या सर्व लोकांची माहिती पुरवावी अशी विनंती केलेली असून ती बंद लिफाफ्यात त्यांना देणार असण्याची बातमी आहे.

“अळी मिळी गुपचिळी”

तर, आता कुरकुरे-प्लास्टिक-पेप्सिको असे काही तुमच्या पोस्ट मध्ये असेल तर…. लगेच डिलीट करा कारण.. उनकी नजर सब पे है..! आणि त्यामुळे तुम्हाला देखील कोर्टाची नोटीस येऊ शकते.

शहाण्याने कोर्टाची पायरी चढायची नसते म्हणतात बुआ..!

म्हणूनच, तुम्हाला त्याचा काय अनुभव आला हे जाहीरपणे सांगणे किंवा कोणी त्याची परीक्षा कशी करावी हे व्हिडीओ करून टाकणे असे कृपया करू नये.

ते सरळ सरळ पेप्सिको च्या विरोधात काही करण्यासारखे आहे ज्याचा परिणाम आपल्याला कोर्टकचेरीचे पालुपद मागे लावून घेण्यास होऊ शकतो. म्हणूनच शांतता राखा कारण कोर्ट “चालू” आहे.

“टेढा है पर मेरा है !”

पेप्सिको ने मात्र या असल्या अफवांना अजिबात थारा न देता त्यांच्या शुदद्धतेची आणि गुणवत्तेची योग्य ती पुरवणी व ग्वाही दिली आहे. ज्यामुळे या अफवा असून हे काहीही खरे नाही तसेच कुरकुरे हे खाण्यास योग्य आहे व त्याचे काही दुष्परिणाम नाहीत असे त्यांचे ठाम मत आहे.

जसे त्यांच्या जाहिराती मध्ये कुरकुरे च्या आकारावर जाऊन तो वाकडा तिकडा असला तरी माझा आहे असे म्हणून कुरकुरे प्रेमी त्याबद्दलचे प्रेम दर्शवायचे तसेच कुरकुरे च्या पाठीशी खंबीर पाने उभे राहून कंपनीने त्यांचा वाक्य खरं केलंय जणू !

 

IndianShowBiz.com

“असं काय दडलंय?”

पण इतक्या कल्लोळ माजविणाऱ्या अश्या अफवेबद्दल खरं किती आणि खोटं किती ? तर खरं असं आहे कि फक्त कुरकुरेच नाही तर असे नमकीन असणारे बरेच स्नॅक्स जेव्हा जाळले जातात तेव्हा असेच जाळतात व त्यांचा वास देखील थोडाफार असाच येतो कारण त्यांच्यात कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कर्बोदके असतात.

आणि प्लास्टिक सारखा जो काही प्रकार आहे असे सर्वांना वाटत आहे ते बाकी काही नसून “स्टार्च” आहे.

पण ही मस्करी बऱ्याच वर्षांपासून चालू असल्यामुळे पेप्सिकोला शेवटी काही कठोर पाऊले उचलावीत लागली कारण अश्यामुळे त्यांचा खप घटला असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

 

पण बाकी त्यांच्या रेसिपी मध्ये आणखी काही आक्षेपार्ह आढळून आले नसल्याने कोर्टाने त्यांना न्याय मिळवून देण्यास मदत केली असणार आहे.

“कारवाई अशी होतेय..”

पेप्सिको ने घेतलेल्या कठोर निर्णयामुळे सोशल मीडिया वर असणाऱ्या अश्या सगळ्या आक्षेपार्ह पोस्ट काढून टाकण्याचे किंवा ब्लॉक करण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने सर्व सोशल साईट्स न दिले आहेत. तसेच काही लोकांना त्याबद्दल नोटीस कम वॉर्निंग दिली गेली आहे, कि त्यांनी ती पोस्ट डिलीट करून टाकावी.

निखिल जॉईस नामक व्यक्तीला २०१५ मध्ये ट्विटर वर याबद्दल “आपण कधी कुरकुरे जाळून पहिले आहेत का? यात प्लास्टिक आहे” अशी पोस्ट केल्याबद्दल कोर्टाने कायदेशीर कारवाईसाठी ती पोस्ट कोर्टात सादर करण्यात येणार असल्याचे इ-मेल द्वारे कळवले.

अशीच नोटीस आणखी शेकडो लोकांना मिळाली आहे. आणि त्यांची वैयक्तिक माहिती कोर्टात दिली जात आहे.

युटब वरून या पोस्ट शी संबंधित URL काढून टाकले गेले आहेत. ट्विटर च्या ५६२, फेसबुक च्या ३४१२ लिंक्स आहेत तसेच २०२४४ पोस्ट्स आहेत, यु ट्युब वर २४२ लिंक्स असून इंस्टाग्राम वर ६ लिंक्स आहेत. ज्या काढल्या आहेत.

 

indeksonline.net

“पराचा कावळा होतोच कसा?”

‘पेप्सी चे उत्पादन चालू असताना एका HIV पॉसिटीव्ह व्यक्तीने त्यात आपले दूषित रक्त मिसळले असून त्याच पेप्सी आता बाजारात आलेल्या आहेत तरी त्यांचे सेवन करू नये.’

अश्या आशयाचे मेसेज व्हाट्स अप किंवा बाकी सोशल मीडिया वर प्रत्येकाने पहिलाच असेल. यामागील उद्देश तर स्पष्ट नाही.

पण कधी यांचे उत्पादन होण्याची प्रक्रिया आणि HIV चा रोगप्रसार कसा होतो हे पाहता लक्षात येते की या बातमीत जराही तथ्य नाही, पण भोळी जनता कदाचित हे मान्य करू शकते. इथेच कंपनीचे नाव खराब होते. त्यामुळे ‘उघडा डोळे बघा नीट’ आणि मग च ठरवा कि या अफवा आहेत की सत्य.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version