' तुमचा स्मार्टफोन फारच लवकर डिस्चार्ज होण्यामागे ही आहेत १० कारणे… वाचा – InMarathi

तुमचा स्मार्टफोन फारच लवकर डिस्चार्ज होण्यामागे ही आहेत १० कारणे… वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

स्मार्टफोन हा नवा असो की जुना बॅटरी शिवाय कुठलाही फोन हा काहीही कामाचा नसतो, त्यामुळे स्मार्टफोनची बॅटरी नेहमी व्यवस्थितपणे काम करणे खूप आवश्यक असते.

पण कधीकधी आपण नकळत अशा काही चुका करून बसतो ज्यामुळे आपल्या स्मार्टफोनची बॅटरी खराब होऊ शकते.

त्यामुळे आपल्याला या चुका करणे थांबविले पाहिजे.

 

अपडेट न करणे :

 

smartphone-battery-inamarathi

 

जर तुम्ही तुमच्या फोन मधील अप्लिकेशन्स आणि सॉफ्टवेयरला वेळोवेळी अपडेट करत नसाल तर तुमच्या फोनमध्ये हॅकर्स किंवा वायरस अटॅक होऊ शकतो. वायरस बग मुळे फोनची बॅटरी गरम होऊ लागते आणि त्याच्या परिणाम बॅटरीच्या क्वालिटीवर होतो.

हे ही वाचा – जुना मोबाईल देऊन नवा घेताय: एक्सचेंज करण्यापूर्वी फोनची खरी किंमत जाणून घ्या!

फोन पूर्णपणे डिस्चार्ज होणे :

 

smartphone-battery-inmarathi

 

कुठल्याही फोनच्या चांगल्या बॅटरी लाईफसाठी कधीही त्याला पूर्णपणे डिस्चार्ज होऊ देऊ नका. वेळोवेळी फोनला चार्ज करत राहा. कारण फोन पूर्णपणे डिस्चार्ज झाल्याने त्याचा परिणाम फोनच्या बॅटरीवर होतो.

१५ % चार्जिंग शिल्लक असतानाच फोन चार्जिंगवर लावा. त्याच्या डिस्चार्ज होण्याची वाट बघू नये.

 

बॅग्राऊंडमध्ये सुरु असलेले अप्लिकेशन :

 

smartphone-battery-inmarathi01

 

एकतर  आपण फोनमध्ये वेगवेगळे अप्लिकेशन वापरतो आणि त्यांना पूर्णपणे बंद करता फोन लॉक करतो किंवा फोनवर दुसरं काही करत बसतो. ह्यावेळी ते अप्लिकेशन बॅग्राऊंडमध्ये सुरु असतात.

जेव्हा आपण ते अप्लिकेशन प्रत्यक्षात वापरत नसतो तरीदेखील ते फोनच्या बॅग्राऊंडमध्ये सुरु असते.

ह्यामुळे तुमचा फोनजरी बंद असला तरी त्याची बॅटरी ही खर्च होत असते. त्यामुळे फोनमधील कुठलेही अप्लिकेशन वापरून झाल्यावर ते पूर्णपणे बंद झाले की नाही हेही एकदा तपासून बघा.

 

ओवर हीटिंग :

 

smartphone-battery-inmarathi02

 

फोन जर खूप गरम होत असेल तर त्याचाही वाईट परिणाम फोनच्या बॅटरीवर होतो. त्यामुळे फोनला जास्त गरम होऊ देऊ नये.

गेम खेळताना किंवा फोनवर खुपवेळ काम करत असताना जर असे लक्षात आले की फोन खूप गरम होतो आहे तर लगेच सर्व फंक्शन बंद करून फोनला बंद करून ठेवावे.

 

खराब क्वालिटी :

 

smartphone-battery-inmarathi03

 

फोनची लाईफ जर जास्त हवी असेल आणि आपला फोन चांगला चालवा असं वाटत असेल तर त्यामध्ये कधीही लोकल बॅटरीचा वापर करू नये. आज जरी स्मार्टफोनच्या बॅटरी आपल्याला काढता येत नसल्या तरी त्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

जर तुमच्या फोनची बॅटरी खराब झाली असेल तर त्याला सर्विस सेंटरवर दाखवा.

 

लोकल चार्जर :

 

smartphone-battery-inmarathi04

 

जर तुम्हाला तुच्या फोनची बॅटरी चांगली चालावी असं वाटत असेल तर त्याला नेहमी प्रमाणित कंपनीच्या चार्जरनेच चार्ज करा. लोकल चार्जर चा वापर देखील फोनच्या बॅटरीसाठी घातक ठरू शकतो.

 

चार्जिंगवेळी काय करू नये :

 

smartphone-battery-inmarathi05

 

जर तुम्ही फोन चार्जिंगवर लावला असेल तर त्यावेळी फोनवर गेम खेळू नये. तसेच फोन चार्जिंग वर असताना त्यावर बोलणेही टाळावे, कारण हे धोक्याचे ठरू शकते.

त्यामुळे फोन चार्ज होत असताना तो कुठल्याही प्रकारे वापरू नये. नाहीतर तुमची बॅटरी लवकर खराब होऊ शकते.

 

फोन १०० % चार्ज करणे :

 

smartphone-battery-inmarathi06

 

फोन चार्ज करणे हे आवश्यक असते.पण कधीही फोन हा १०० % म्हणजे पूर्ण चार्ज करू नये. कारण ह्यासाठी तुम्हाला फोन खूप वेळ पर्यंत चार्जिंग वर ठेवावा लागेल, ज्याचा विपरीत परिणाम हा तुमच्या बॅटरीवर होऊ शकतो.

जर तुमच्या बॅटरीची चार्जिंग ४०-८०% ह्यादरम्यान असेल तर ती व्यवस्थित काम करते आणि लवकर खराबही होत नाही.

 

रात्रभर फोन चार्ज करणे :

 

smartphone-battery-inmarathi08

 

अनेकांना फोन रात्रभर चार्ज करण्याची सवय असते. कदाचित त्यांना असे वाटत असावे की त्याने फोन जास्त चार्ज होतो. तर नाही ह्याचा अतिशय वाईट परिणाम हा तुमच्या फोनच्या बॅटरीवर होतो.

अतिवेळ बॅटरी चार्ज केल्याने ती लवकर खराब होण्याचा धोका असतो. त्यामुळे खूप वेळ फोन चार्जिंगवर लावू नये. त्याएवजी थोड्या थोड्या वेळाने तो चार्ज करावा.

 

स्क्रीन टाईम आउट :

 

smartphone-battery-inmarathi00

 

स्क्रीन टाईम आउट, अनेकांना असं वाटत की ह्याने काहीही फरक पडत नाही पण तुमच्या फोनच्या बॅटरीवर ह्या स्क्रीन टाईम आउटच्या वेळेचाही प्रभाव पडू शकतो.

जेवढी जास्त वेळ तुमच्या फोनची स्क्रीन सुरु असेल तेवढी लवकर बॅटरीवर संपत जाईल. त्यामुळे आपल्या फोनचा स्क्रीन टाईम आउट हा शक्य तेवढ्या कमी वेळेचा ठेवावा.

वरील काही टिप्सचा वापर केल्याने तसेच हवी ती काळजी घेतल्याने तुमच्या फोनची बॅटरी लाईफ नक्की सुधारू शकते.

===

हे ही वाचा – मोबाईलच्या चार्जिंगप्रमाणेच मेंदू थकल्यावर त्याला रिचार्ज करण्यासाठी १० झक्कास टिप्स!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?