Site icon InMarathi

भारत विरुद्ध पाक+चीन युद्ध घडल्यास काय होईल? एका अभ्यासकाने मांडलेलं चित्र

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या रशिया युक्रेन युद्धाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे . तसंच भारत पाकिस्तान तणाव अख्ख्या जगासाठीच काळजीचा विषय आहे. काश्मीर प्रश्नामुळे आणि पाक पुरस्कृत दहशतवादामुळे हा वाद अधिकाधिक चिघळतच जात आहे. चीन त्यात तेल ओतत असतोच. पाकिस्तानला विविध प्रकारे मदत असो, परस्पर गिळंकृत केलेला काश्मीरचा भाग असो वा चीन-पाकिस्तान कॉरिडॉर असो.

चीनने पाकिस्तानची कड घेऊन भारताला त्रास देण्याची एकही संधी सोडलेली नाही.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

==

हे ही वाचा : “भारत चीन युद्ध १९६२” : या महत्वाच्या युद्धात भारताचा दारूण पराभव का झाला…?

==

जर ही परिस्थिती अगदीच विकोपाला गेली तर काय होईल?

हे संबंध इतके ताणले गेले की युद्धाची ठिणगी पडलीच – तर त्याचा किती मोठा भडका उडेल?

जर भारत आणि चीन + पाकिस्तान – असं तिहेरी युद्ध झालंच, तर त्याचा काय परिणाम होतील?

 

ह्यावर आपापल्या मित्र मंडळींत अनेकदा कट्ट्यावरच्या गप्पा होत असतीलच. परंतु आज एका अभ्यासकाचं, एका एक्स्पर्टचं उत्तर वाचा.

क्वोरावर विचारलेल्या ह्याच “भारत विरुद्ध पाक+चीन युद्धाचे संभाव्य परिणाम” अश्या प्रश्नावर साऊथ आफ्रिकेचे विश्लेषक Meziechi Nwogu ह्यांनी  उत्तर नोंदविले आहे. हे उत्तर आवर्जून वाचण्यासारखे आहे. हे युध्द झाले तर उद्भवू शकणारी संभाव्य भीषण परिस्थिती त्यांनी आपल्या उत्तरात मांडली आहे.

नोगु म्हणतात –

युद्धाच्या वेळी भारतीय सैन्य पूर्णपणे अलर्टवर जाईल. चीनजवळील सीमा म्हणजेच अरुणाचल प्रदेश, अक्साई चीन आणि लदाख येथील सीमांवर सैन्याचा फौजफाटा, टँक्स आणि मिसाईल्स तैनात केले जातील.

लदाख येथील फ्लॅट व्हॅलीच्या डोंगर रांगेतून सशस्त्र साठा सीमेपर्यंत पोहोचविला जाईल.

 

 

तिबेट विभागातील चीनी हवाई दल मॅकमहॉन लाइन-अरुणाचल प्रदेश/ झांगानान-अक्साई चीन क्षेत्रामध्ये भारतीय सैन्याच्या विरोधात हवाई हल्ले सुरु करतील.

चिनी सैन्याच्या एक तुकडीला ग्रेटर हिंद महासागरात तैनात असलेल्या भारतीय नौदलाला तोंड देण्यासाठी पाठविले जाईल. जे मालाक्काच्या सामुद्रधुनीत प्रवेश करत चीनी तेल पुरवठा रोखण्याच्या प्रयत्नात असतील.

 

 

युएस, जपान, तायवान, व्हियेतनाम आणि साउथ कोरिया येथील सैन्याला हाय अलर्ट जारी करण्यात येईल. जर चीनी मिसाईल जपान किंवा साउथ कोरियाला धडकला तर हे दोन्ही देश युएसकडून बदल घेण्याची अपेक्षा ठेवतील.

जर रशिया भारताच्या बाजूने असेल तर रशिया भारताचा धोरणात्मक आणि आर्थिक भागीदार असेल. त्यामुळे चीन सर्व बाजूंनी वेढला जाईल.

जर ते बीजिंगच्या बाजूने असेल, तर भारत जपान, व्हिएतनाम, फिलीपींस आणि दक्षिण कोरिया सहाय्य करेल. तसेच अमेरिकन सैन्य शक्तिचा पाठिंबाही असेल.

रशिया ह्या लढाईतून बाहेर देखील राहू शकतो, पण चीन तसे होऊ देणार नाही. कारण रशियाच्या चीन सोबत आधीच सीमेवरून वाद सुरु आहेत. आणि जर चीनने आता भारताला पराजित केले तर त्याच्या नानात्र रशियाच निशाणा असणार हे त्यांना माहित आहे.

युएस सैन्य देखील हाय अलर्ट वर जाईल. तसेच जपान, साउथ कोरिया, द पर्शियन गल्फ, गुआम आणि डिएगो गार्सिया येथे देखील हाय अलर्ट जारी करण्यात येईल. सॅटेलाईट्सद्वारे आण्विक घटनांवर लक्ष ठेवले जाईल.

==

हे ही वाचा : चीनची मुजोरी उधळण्यासाठी या भारतीयाने उभारले होते ‘स्वदेशी’ आंदोलन

==

 

जगभरातील प्रसार माध्यमांची नजर ह्या दोन देशांवर असेल. युद्ध समाप्त करण्यासाठी जागतिक निषेध केला जाईल.

स्टॉक मार्केटवर देखील ह्याचा मोठा विपरीत परिणाम बघायला मिळेल. तसेच इंधनाच्या किमतीही वाढतील. त्यासोबतच सोन्याच्या दरात देखील वाढ होईल. चीन आणि अमेरिकेतील चलन पडेल आणि त्यासोबतच महागाई देखील वाढेल.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद काही दिवसांत आणीबाणीचे सत्र आयोजित करेल.

 

 

तर रशिया देखील हे युद्ध संपविण्याच्या दृष्टीने हालचाल करेल. तसेच युएस ह्या विरोधाभासासाठी चीनला दोषी ठरवेल आणि तायवान ला शस्त्रसाठा पुरविण्याचा दावा करेल. तसेच तायवान ला स्वातंत्र्य मिळावं ह्यासाठी समर्थन देखील देतील.

ह्या युद्धादरम्यान चीन त्यांच्या मिसाईल्सचा वापर नक्की करेल. तो भारतीय शहर आणि गावांना आपला निशाणा बनवेल. तसेच चीन हा जपान आणि टोकियो येथील युएस इंस्टॉलेशनवर देखील निशाणा साधेल. ज्यानंतर युएस आणि भारत देखील चीनवर वार करेल.

पाकिस्तान ह्या युद्धात चीनच्या बाजूने उडी घेण्याची शक्यता असेल. तो, अर्थातच, काश्मीरला मिळविण्याचा प्रयत्न करेल.

ह्या युद्धादरम्यान जेव्हा भारताकडून युएस तसेच चीन चे इतर शत्रू म्हणजेच जपान, व्हियेतनाम, साऊथ कोरिया लढेल. तेव्हा चीन आणि पाकिस्तान नक्कीच आण्विक अस्त्रांचा वापर करतील.

जर त्यांनी आण्विक अस्त्रांचा वापर केला तर युएस, रशिया, फ्रान्स आणि संयुक्त राष्ट्र देखील ह्याला असंच उत्तर देतील.

 

जर आण्विक अस्त्रांचा वापर केला गेला तर त्याचे काय पडसाद उमटतील तेही जाणून घेऊ.

भारतातील आण्विक अस्त्र संपूर्ण पाकिस्तानला संपवून जाईल. चीनचा निम्म्याहून भाग नष्ट होईल. नवी दिल्ली आणि बीजिंग देखील नष्ट होईल. जवळपास ३० कोटी लोकांना आपला जीव गमवावा लागेल.

जर आण्विक अस्त्रांचा वापर झाला नाही तर काय होईल…?

तर चीनची अर्थव्यवस्था ढासळत जाईल. प्लॅन नेव्हलची ताकद कमी केली जाईल आणि दक्षिण चीन आणि चीनच्या पूर्व सागरात चीनचा दावाही कमी होईल.

भारताची अर्थव्यवस्था चीनच्या तुलनेत अधिक प्रभावित होईल. खासकरून उत्तर पूर्व भारत.

युनायटेड स्टेट्सचा विजय होईल. कारण ह्यानंतर खूप काळापर्यंत चीन त्यांना आर्थिक किंवा सैन्यदृष्ट्या आव्हान देऊ शकणार नाही. तायवानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले जाईल.

जागतिक आर्थिक उदासीनता वाढेल. शेअर मार्केट धाडकन कोसळेल. कोसळतच राहील.

 

पण –

सर्व नेत्यांना ह्या संभाव्य महाभयंकर परिणामांची चांगलीच कल्पना आहे. त्यामुळे परिस्थिती इथवर ताणली जाण्याआधी, असं काही होण्याआधीच ते सांभाळतील.

==

हे ही वाचा : माघार घेतल्यानंतर ३ महिन्यांतच चीनने केलं होतं भारतावर आक्रमण! रात्र वैऱ्याची आहे!

==

एकंदरीत हा फारच मोठा “कल्पनाविलास” वाटू शकतो.

परंतु शांतपणे विचार केल्यास, वरील उत्तरात ह्या भारत विरुद्ध पाकिस्तान + चीन अश्या युद्धाचा सर्वांगाने विचार केल्याचं दिसून येईल. नुसता विचारच नाही, तर तौलनिक अभ्यास करून संभाव्य परिणामांची केलेली मांडणी देखील तर्कसंगत वाटते.

हे सगळं वाचून झाल्यावर, “सैन्यशक्ती युद्ध लढण्यासाठी नसते. युद्ध घडूच नये ह्यासाठी केलेलं शक्ती-प्रदर्शन हीच सैन्यशक्तीची खरी गरज” हे वाक्य खरंच पटतं – आणि ते तसंच असावं असं वाटल्याशिवाय रहात नाही.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version