Site icon InMarathi

“गोरिला ग्लास”: ह्या विचित्र नावामागचं लॉजिक काय?

gorilla inmarathi

corning

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

मोबाईल सध्या जितका आवश्यक झाला आहे तितकिच त्याची सेफ्टी सुद्धा आवश्यक होतं चालली आहे, महागडे फोन्स घेताना त्याची सेफ्टी किती महत्वाची असते ही सुद्धा लक्षात घेण्याजोगी बाब आहे! मोबाईलचा विमा किंवा एन्टी व्हायरस आपण घेतो तसंच त्या मोबाईल स्क्रीनच्या बाबतीत कधी आपण विचार करतो का?

 

forbes

 

की ही स्क्रीन नक्की चांगल्या दर्जाची आहे ना? सहजासहजी ती फुटणार तर नाही ना? आणि समजा फुटलीच तर ती पुनः दुरुस्त करता येते ना?

असे असंख्य प्रश्न आपल्या मनात असतात, पण सध्याच्या मोबाईल कंपन्यांनी यावर जास्त लक्ष दिलेले आपल्याला आढळून येईन, एमोलेड डिस्प्ले किंवा सुपर एमोलेड डिस्प्ले ही नाव आपण ऐकली असतीलच, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्क्रीनस मुळे मोबाईलची स्क्रीन तुटण्याचा धोका फार कमी झालाय!

आणि याबरोबरच आणखीन एक प्रकार व्हायरल होतोय तो म्हणजे “गोरीला ग्लास”, तर काय आहे नक्की हा प्रकार या लेखात आपण जाणून घेऊया!

आज कुठलाही नवीन स्मार्टफोन जेव्हा बाजारात येतो तेव्हा त्यात बाकी काही असो की नसो एक गुण असलाच पाहिजे आणि तो म्हणजे ‘गोरिला ग्लास’. पण तुम्हाला माहित आहे का? हा  गोरिला ग्लास काय आहे आणि “गोरील्ला” ह्याचा अर्थ काय आहे?

 

pcquest

 

तर गोरिला ग्लास ही कुठल्या विशिष्ट प्रकारची काच नसून तो एक ब्रँड आहे. म्हणजे जसं वन प्लस, सॅमसंग, नोकिया तसच गोरिला ग्लास.

 

 

whatphone.net

 

‘गोरिला ग्लास’ नावाच्या ब्रांडवर ‘कॉर्निंग इंक’ नावाच्या कंपनीचे कॉपीराईट आहे. हा ग्लास अल्युमिनियम, सिलिकॉन आणि ऑक्सिजन ह्याच्या मिश्रणातून बनतो. ह्या प्रोसेसला Ion-Exchange Process (आयन एक्सचेंज प्रोसेस) म्हणतात.

 

India tv

 

आयन एक्स्चेंज एक रासायनिक प्रक्रिया आहे, जी एका काचेला मजबूत बनविण्याच काम करते. ह्यामध्ये आयनला काचेमध्ये भरले जाते ज्यामुळे कम्प्रेशनची स्थिती निर्माण होते आणि त्यामुळे काचेला मजबुती मिळते.

 

youtube.com

 

गोरिला ग्लास हा इतर प्रकारच्या ग्लासेसपेक्षा हलका आणि पातळ असतो आणि त्याहून जास्त मजबूत असतो. तरीदेखील ‘कॉर्निंग इंक’ रोज ह्याला आणखी पातळ आणि अधिक मजबूत बनविण्याच्या प्रयत्नात असते. म्हणून गोरिला ग्लासचे नवनवीन वर्जन बाजारात येत असतात. आता तर ह्याचा सहावा वर्जन बाजारात आला आहे.

‘कॉर्निंग इंक’ ह्याचा दावा आहे की ह्याचा सहावा वर्जन पाचव्या वर्जनपेक्षा जास्त मजबूत असेल. एवढा मजबूत की ह्याला एका मीटरच्या उंचीवरून १५ वेळा पाडल्यावर देखील तो तुटणार नाही.

‘कॉर्निंग इंक’चा हा गोरिला ग्लास जरी आज एवढा प्रसिद्ध झाला असला तरी देखील ह्या कंपनीने हा ग्लास साठच्या दशकातच बनविला होता. तेव्हा  जिथे मजबूत काचेची गरज असायची तिथे ही काच वापरली जायची.

 

reliance digital

 

गोरीला ग्लास चा फायदा म्हणजे एकतर ती अनब्रेकेबल असून सर्वात जास्त काळ टिकणारी आणि तुमच्या मोबाईलला एक वेगळाच लुक देते! पण तरीही ही ग्लास तुटत नसली तरी तिच्यावर ओरखडे पडू शकतात, आणि त्यामुळे टी तूटणार नाही पण तुम्हाला स्क्रीन वापरताना थोडाफार त्रास नक्कीच होईल!

त्यामुळे कितीही सुरक्षित असली तरी मोबाईलचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास तिला सुद्धा दगा फटका होऊ शकतो!

 

DW

 

टच स्क्रीन मोबाईलला ऍपल ने  बाजारात आणले. पण हा मोबाईल बनविण्यासाठी त्यांना अश्या काचेची गरज होती जी मजबूत, हलकी असेल तसेच स्क्रॅचही सहन करू शकेल.

त्यामूळे ‘कॉर्निंग इंक’ ह्यांच्या कंपनीची मदत घेतली गेली. त्यांनी गरजेनुसार ह्या काचेमध्ये परिवर्तन केले. आणि त्यानंतर ह्याला गोरिला ग्लास म्हणून रजिस्टर करण्यात आले.

आज ऍपल नाही तर जवळपास सर्वच स्मार्टफोन्समध्ये हा गोरिला ग्लास वापरला जातो.

हा ग्लास मजबूत असल्या कारणाने ह्याची तुलना गोरिलाशी करण्यात आली. त्यामुळे ह्याला गोरिला ग्लास असे नाव देण्यात आले.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version