Site icon InMarathi

चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत बंधनकारक करण्याच्या निर्णयामागचा आधार काय?

नुकताच सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की चित्रपट सुरु होण्यापूर्वी चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत चालवणे बंधनकारक आहे आणि सगळीकडे या निर्णयाची चर्चा सुरु झाली. या निर्णयावरून पुन्हा ‘त्या’ दोन गटांमध्ये शाब्दिक युद्ध सुरु झाले. पण हा निर्णय देशातील सर्वोच्च न्यायालयाने दिला असल्याकारणाने त्याचे पालन करणे बंधनकारकच आहे. संपूर्ण देशातील सर्वच चित्रपटगृहांमध्ये पुढील १० दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच आदेश सुप्रीम कोर्टाने दिले असल्याने चित्रपटगृहाच्या मालकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

स्रोत

हा निर्णय आपण कोणत्या आधारावर देत आहोत हे स्पष्ट करताना सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आले की,

जेव्हा एखादा नागरिक आपल्या राष्ट्रगीताबद्दल आणि आपल्या तिरंग्याबदल आदर व्यक्त करतो तेव्हा त्या आदरातून त्याचे आपल्या देशावरील प्रेम दिसते. हा निर्णय लागू करण्याचे हे मुख्य कारण आहे. तसेच या निर्णयामुळे राष्ट्रगीताचे गायन केल्यास नागरिकांमध्ये देशभक्तीची आणि राष्ट्रहिताची भावना निर्माण होण्यास मदत होईल. संविधानामध्ये सांगितलेल्या मुलभूत तत्वांनुसार नागरिकांनी देशाच्या तिरंग्याचा सन्मान करणे गरजेचे आहे. आपण सर्वजण संविधानाचा आदर करतो त्यामुळे त्यात सांगितलेल्या नियमाचा आदर करणे देखील आपले कर्तव्य आहे. आपण ज्या देशात राहतो त्या देशाच्या संविधानात्मक राष्ट्रभक्तीचे प्रतिक असणाऱ्या राष्ट्रगीताचा सन्मान राखला गेला पाहिजे हे प्रत्येक नागरिकाच्या लक्षात येण्याची वेळ आली आहे. हा निर्णय नागरिकांवर थोपण्याचा किंवा त्यांच्या अधिकारांवर गदा आणण्याचा कोणताही हेतू नाही. हा निर्णय संविधानाच्या आधारावरच घेण्यात येत आहे.

स्रोत

हा निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने चित्रपटगृहांसाठी इतरही काही बाबींचा आवर्जून उल्लेख केला आहे. त्यापुढीलप्रमाणे:

स्रोत

आता या निर्णयाचा आनंदाने स्वीकार करावा किंवा त्यावर वाद घालत बसावा ही ज्याची त्याची choice !!!

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: MarathiPizza.com.

Copyright (c) 2016 मराठी pizza. All rights reserved.

Exit mobile version