' चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत बंधनकारक करण्याच्या निर्णयामागचा आधार काय? – InMarathi

चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत बंधनकारक करण्याच्या निर्णयामागचा आधार काय?

नुकताच सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की चित्रपट सुरु होण्यापूर्वी चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत चालवणे बंधनकारक आहे आणि सगळीकडे या निर्णयाची चर्चा सुरु झाली. या निर्णयावरून पुन्हा ‘त्या’ दोन गटांमध्ये शाब्दिक युद्ध सुरु झाले. पण हा निर्णय देशातील सर्वोच्च न्यायालयाने दिला असल्याकारणाने त्याचे पालन करणे बंधनकारकच आहे. संपूर्ण देशातील सर्वच चित्रपटगृहांमध्ये पुढील १० दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच आदेश सुप्रीम कोर्टाने दिले असल्याने चित्रपटगृहाच्या मालकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

supremecourt-national-anthem-decision-marathipizza01

स्रोत

हा निर्णय आपण कोणत्या आधारावर देत आहोत हे स्पष्ट करताना सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आले की,

जेव्हा एखादा नागरिक आपल्या राष्ट्रगीताबद्दल आणि आपल्या तिरंग्याबदल आदर व्यक्त करतो तेव्हा त्या आदरातून त्याचे आपल्या देशावरील प्रेम दिसते. हा निर्णय लागू करण्याचे हे मुख्य कारण आहे. तसेच या निर्णयामुळे राष्ट्रगीताचे गायन केल्यास नागरिकांमध्ये देशभक्तीची आणि राष्ट्रहिताची भावना निर्माण होण्यास मदत होईल. संविधानामध्ये सांगितलेल्या मुलभूत तत्वांनुसार नागरिकांनी देशाच्या तिरंग्याचा सन्मान करणे गरजेचे आहे. आपण सर्वजण संविधानाचा आदर करतो त्यामुळे त्यात सांगितलेल्या नियमाचा आदर करणे देखील आपले कर्तव्य आहे. आपण ज्या देशात राहतो त्या देशाच्या संविधानात्मक राष्ट्रभक्तीचे प्रतिक असणाऱ्या राष्ट्रगीताचा सन्मान राखला गेला पाहिजे हे प्रत्येक नागरिकाच्या लक्षात येण्याची वेळ आली आहे. हा निर्णय नागरिकांवर थोपण्याचा किंवा त्यांच्या अधिकारांवर गदा आणण्याचा कोणताही हेतू नाही. हा निर्णय संविधानाच्या आधारावरच घेण्यात येत आहे.

supremecourt-national-anthem-decision-marathipizza02

स्रोत

हा निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने चित्रपटगृहांसाठी इतरही काही बाबींचा आवर्जून उल्लेख केला आहे. त्यापुढीलप्रमाणे:

  • चित्रपटगृहात चालवण्यात येणाऱ्या राष्ट्रगीताच्या माध्यमातून चित्रपटगृहाच्या मालकाने कोणताही व्यावसायिक स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करू नये.
  • दाखवण्यात येणाऱ्या राष्ट्रगीताच्या चित्रफितीमध्ये कोणत्याही प्रकारचा उथळपणा वा अतिशयोक्ती असू नये, कारण ती कोणतीही मनोरंजनाची गोष्ट नसून देशाच्या एकात्मतेचे प्रतिक आहे त्यामुळे राष्ट्रगीताचा आदर राखला गेलाच पाहिजे. चित्रित केलेले किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने स्वत:हून बनवलेले राष्ट्रगीताचे व्हर्जन चित्रपटगृहात दाखवता येणार नाही.
  • चित्रपटगृहामध्ये केवळ भारतीय तिरंगा स्क्रीनवर दाखवून राष्ट्रगीत चालवावे. इतर कोणत्याही प्रकारे राष्ट्रगीत चालवणे म्हणजे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे उल्लंघन समजले जाईल.
  • जर चित्रपटगृहामध्ये चित्रफितीच्या माध्यमातून राष्ट्रगीत दाखवण्यात काही समस्या असेल तर राष्ट्रगीताचे गायन करणे बंधनकारक आहे.
  • चित्रपटगृहामध्ये राष्ट्रगीत चालवण्यापूर्वी किंवा त्याचे गायन करण्यापूर्वी चित्रपटगृहाचे सर्व दरवाजे बंद असले पाहिजेत. जेणेकरून राष्ट्रगीत सुरु असताना कोणीही व्यक्ती बाहेरून प्रवेश करून राष्ट्रगीतामध्ये अडथळा उत्पन्न करणार नाही.

supremecourt-national-anthem-decision-marathipizza03

स्रोत

आता या निर्णयाचा आनंदाने स्वीकार करावा किंवा त्यावर वाद घालत बसावा ही ज्याची त्याची choice !!!

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: MarathiPizza.com.

Copyright (c) 2016 मराठी pizza. All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?