Site icon InMarathi

गॉगलचा वापर कशासाठी करावा? कोणता वापरावा? वाचा गॉगलबद्दल बरचं काही…

goggle inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – सुशील जोशी
===

“गॉगल” ही एक प्रत्येक तरुनाच्या आवडीची वस्तू. प्रत्येक जण त्याच्या त्याच्या आवडीने गॉगल घेतो. काही जण तर १-२ महिन्याला गॉगल बदलतात. १०० रुपयांपासून ते ५०००-१०००० पर्यन्त गॉगल काही जण घेतात.

पण खरंच ते डोळे उघडे ठेवून गॉगल घेतात का? पेट्रोल पंपाच्या बाजूला मिळणारे अगदी कमी किमतीचे stylish गॉगल, तुमच्या डोळ्यांना किती महाग पडू शकतात याची कल्पना किती जणांना असेल?

ठीके काही जण महागड्या दुकांनान मध्ये घेत असतील, पण जो गॉगल घेताय तो खरंच तुमच्या डोळ्यांना suitable आहे का याची खात्री किती जण करत असतील?

 

 

सर्व प्रथम, गॉगलची गरज काय आहे, गॉगल घेण्यामागे कारण काय?

बरेच जण स्टाईलसाठी गॉगल घेतात. काही जण डोळ्यात कचरा जाऊ नये, ऊन लागू नये, तसेच थोडी स्टाईल पण असावी म्हणून गॉगल घेतात. एक असा देखील वर्ग आहे जो गॉगल वापरतच नाही.

खरं तर गॉगल ही एक अशी वस्तू आहे जी की प्रत्येकाने वापरावी, अगदी लहान मुलां पासून ते मोठ्यापर्यंत. फक्त आणि फक्त एकाच मुख्य हेतू साठी, ते म्हणजे डोळ्यांचे संरक्षण!

आपण दिवसभरात भरपूर वेळेस सूर्य प्रकाशामध्ये असतो, मुख्य करून प्रवास करताना. घर-ऑफिस-घर हा तर नेहमीचाच प्रवास. हा जो सूर्यप्रकाश आहे, तो वेगवेगळ्या wavelength च्या radiation पासून बनला आहे.

त्यातले सर्वात घातक आहेत UV Radiations. UV radiations थोड्या प्रमाणात जर शरीरावर पडले तर ते आपल्या शरीरात व्हिटॅमिन D च्या निर्मितीस चालना देतात, पण हेच प्रमाण जर जास्त झाले तर ते शरीरासाठी हानिकारक आहे.

 

शरीर तर कपड्यांनी झाकलेले असते पण डोळ्यांचे काय? ते तर सरसकट रोज UV Radiation सहन करत असतात.

जर गूगल वर Effects of UV Radiation on Eyes सर्च केलं तर उत्तर येतं —

Extended exposure to the sun’s UV rays has been linked to eye damage, including cataracts, macular degeneration, pingueculae, pterygia and photokeratitis that can cause temporary vision loss

तसेच डोळ्यांच्या कोपऱ्यांमध्ये ज्या सुरकुत्या पडतात त्या देखील ह्याचाच एक परिणाम आहे.

तर आता एव्हाना समजलं असेल की आपल्या डोळ्यांना ह्या UV Radiation पासून वाचवले पाहिजे. त्यासाठी काय करावे तर Simply, 100% UV protection असणारा गॉगल वापरावा. रस्त्यावरचे स्वस्त गॉगल त्यामुळे डोळ्यांना महाग पडू शकतात.

दुकानात सुद्धा गॉगल घेताना 100% UV Protection लेबल नसलेला गॉगल पाहायला देखील घेऊ नये.

काही वेळेस महागडे गॉगल देखील 100% UV Protection देत नाहीत, त्यांची ती किंमत त्यांच्या sylish फ्रेम मुळे असू शकते. 100% UV-400 Protection असलेला गॉगल डोळ्यांचे 400 nanometer wavelength पर्यंत च्या UVA, UVB, UVC radiation पासून संरक्षण देतो. फक्त डार्क शेड असलेला गॉगल UV Protection देतो हा समज चुकीचा आहे.

 

 

या मध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महागडे Polarised गॉगल हे UV Protection देत नाहीत.

Polarised गॉगल हा गॉगल चा एक वेगळा प्रकार आहे जो कि चमकणाऱ्या प्रकाशात “चांगली दृष्टी” देण्याचं काम करतो. त्यामुळे polarised गॉगल असणाऱ्यांनी ह्या भ्रमात राहू नये की आपला गॉगल डोळ्यांचे UV Radiation पासून देखील संरक्षण करतो. Polarised + 100% UV Protection, दोन्ही असलेला गॉगल सर्वोत्तम.

आपले डोळे आपल्या शरीराचे खूप नाजूक तसेच व्यक्तीची सुंदरता वाढविणारे घटक आहेत. त्यांच्या कोपऱ्यांना wrinkles पडलेल्या किंवा ते damage झालेले कोणालाही आवडणार नाहीत.

हे सुंदर जग, सुंदर (आणि धडधाकट!) डोळ्यांनी अधिक सुंदर दिसेल, त्यामुळे त्यांची काळजी घ्या…!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version