Site icon InMarathi

वायुसेनेचे एकमेव “परमवीरचक्र” विजेते फ्लायिंग ऑफिसर निर्मलजीतसिंह यांची थरारक कहाणी…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

१६ डिसेंबर १९७१ ला भारतीय सेनेने पाकिस्तान विरुद्ध एक निर्णायक युद्ध जिंकले. आपल्या देशाच्या रक्षणासाठी कित्येक धाडसी सैनिकांनी आपल्या जीवाची बाजी लावली आणि शहीद  झाले.

आज ३६ वर्षानंतर देखील या सैनिकांचे बलिदान आपल्या देशासाठी अविस्मरणीय आहे.

खरंतर खूप कमी लोक आपल्या हवाई दलाच्या परमवीर चक्र पुरस्कार विजेता निर्मलजीत सिंह सेखो यांच्याबद्दल जाणून आहेत.

निर्मलजीत सिंह हवाई दलातील एकमेव असे अधिकारी आहेत ज्यांना परमवीर चक्राचा बहुमान देऊन सन्मानित केले गेले आहे.

पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातील इस्वाल दाखा या गावातील रहिवासी असलेल्या निर्मलजीत सिंह सेखोंचा जन्म १७ जुलै, १९४३ ला झाला. त्यांचे वडील तरलोचन सिहं हे भारतीय हवाई सेनेत एक फ्लाईट लेफ्टनंट होते.

 

bharat-rakshak.com

देशसेवेचा वारसा असलेल्या घरात जन्म घेतलेल्या सेखोंनी आपल्या वडिलांपासून प्रेरणा घेऊन लहानपणीच भारतीय हवाई दलात (IAF) सामील होण्याचे ठरवले होते.

ठरवल्यानुसार त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतीय हवाई दलात (IAF) सामील होण्याचे स्वप्न मोठ्या जिद्दीने पूर्ण केले.

४ जुन १९६७ मध्ये त्यांना औपचारिकरीत्या एका पायलट ऑफिसरच्या पदावर कमिशन केले गेले होते.

१९७१ मध्ये भारत पाकिस्तान युद्ध सुरु झाले होते. पाकिस्तानी हवाई दल (PAF) अमृतसर, पठाणकोट आणि श्रीनगरच्या अत्यंत महत्वाच्या आपल्या हवाई अड्ड्यांना उध्वस्त करण्यासाठी सतत हल्ले करत होते.

भारतीय हवाई दलातील १८ जवानांची एक तुकडी श्रीनगर वरील हवाई हल्ल्यांपासून बचावासाठी नियुक्त केली गेली होती.

सेखों या प्रसिद्ध तुकडीचा एक हिस्सा होते. हवेमध्ये जास्त काळ काम करण्याच्या त्यांच्या अविश्वसनीय क्षमतेमुळे त्यांना “फ्लायिंग बुलेट” देखील म्हटले जात होते.

१४ डिसेंबर १९७१ च्या सकाळी निर्मलजीत सिहं, फ्लाईट लेफ्टनंट बालदीर सिहं घुम्मन यांच्या समवेत श्रीनगर एअरफिल्डवरती स्टॅन्ड-बाय-२ ड्युटीसाठी होते.

ही एक विमानाच्या उड्डाणासाठी किंवा उतरण्यासाठी असलेली मोकळी जागा असते, जिथे लढाईचे आदेश मिळताच २ मिनिटांमध्ये विमानावर जावे लागते.

 

indianexpress.com

मित्र आणि सहकाऱ्यांमध्ये “जी-मॅन” म्हणून प्रसिद्ध असलेले बलदिर सिहं घुम्मन हे निर्मलजीत सिहं सेखो यांचे वरिष्ठ अधिकारी आणि त्यांचे प्रशिक्षक देखील होते.

सेखोना सर्व लोक प्रेमाने “भाई” म्हणून बोलावत असत.

त्या दिवशी सकाळी, पाकिस्तानच्या “६ एफ-८६ साबर जेट” (PAF चे प्रमुख लढाऊ विमान) विमानांना श्रीनगर एअरहरतहरतबेसवरती बॉम्बहल्ला करण्यासाठी पेशावरमधून हलविण्यात आले होते.

या संघाचे नेतृत्व १९६५ मधील युद्धातील अनुभवी विंग कमांडर चँगाजी यांनी केले होते.

या संघात फ्लाईट लेफ्टनंट डॉटानी, एंड्राबी, मीर, बेग आणि यूसुफजई हे सामील होते. अतिशय कडक थंडी आणि धुक्यामुळे पाकिस्तानी फौजेने केव्हा भारतीय सीमेत प्रवेश केला हे कळलेच नाही.

त्यावेळी काश्मीरच्या घाटांमध्ये कोणतेच रडार नव्हते आणि भारतीय वायूसेना ही येणाऱ्या हल्ल्यांच्या माहितीसाठी उंचावर असलेल्या चौक्यांवरून येणाऱ्या इशाऱ्यावर आधारित होती.

पाकिस्तानी हवाई दलाच्या सैनिकांना शेवटी श्रीनगरपासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भारतीय हवाई सेनेच्या निरीक्षण चौकीतून पाहिले गेले. तिथल्या अधिकाऱ्यांनी लगेच त्याबाबत आपल्या एअरबेसला तसा इशारा दिला.

“जी-मॅन” घुम्मन आणि “भाई” सेखों यांनी लगेच आपल्या सेनानी विमानांनी उड्डाण घेण्याची आज्ञा घेण्यासाठी वायू रहदारी नियंत्रणाशी (ATC) संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

पण रेडियो नेटवर्क मध्ये काही समस्या असल्याकारणाने तरहऱ्हेने प्रयत्न करून देखील संपर्क करण्यास ते असमर्थ ठरत होते.

पण त्यांनी बिलकुल उशीर न करता आज्ञा न घेताच विमानांचे उड्डाण केले. त्यांनी उड्डाण केले आणि त्या क्षणी विमानाच्या धावपट्टीवर २ बॉम्बचा स्फोट झाला.

जेंव्हा सेखोंनि उड्डाण केले त्यावेळी त्यांनी पाहिले की २ सेबर जेट हे दुसऱ्या धावपट्टीवर हल्ला करण्यासाठी सरसावले आहेत. त्यांनी लगेच आपले विमान वळवले व त्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली.

यानंतर जे काही झाले ती हवाई युद्धाच्या इतिहासातील आजपर्यंतची सगळ्यात मोठी लढाई म्हणून ओळखली गेली.

जेव्हा चँगाज़ी (PAF चे प्रमुख सेनानी) यांनी पाहिले की एक भारतीय जेट त्यांच्या सेबर जेटचा पाठलाग करत आहेत, तेव्हा त्यांनी लगेचच आपल्या टीममधील सैनिकांना खाली उतरण्याचे आणि घुसखोरी करण्याचे आदेश दिले.

पण तोपर्यंत सेखोंनी त्यांच्यावर गोळ्यांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली होती.

 

spunkybong.com

सेखों त्या दोन सेबरजेट सोबत लढतच होते आणि त्यांच्या मागे आणखी २ सेबर जेट आले.

आता फक्त हे एकच भारतीय वायू दलाचे विमान होते जे पाकिस्तानी वायू दलाच्या ४ विमानांशी सामना करत होते. “जी-मॅन” घुम्मन यांचा सेखोंसोबत असलेला संपर्क देखील तुटला.

सेखोंचे साहस आणि त्यांचा त्यांच्या विमानावर असलेल्या विश्वासमुळे त्यांनी एकट्याने ४ सेबर जेटसोबत लढाई केली.

घुम्मनचा संपर्क देखील तुटला असल्यामुळे घुम्मन सेखोंच्या मदतीला जाऊ नाही शकले. सेखोंनी आपल्या विमानाने फायरिंग करत असताना चक्कर मारण्यास सुरुवात केली. तेव्हाच रेडियो संचार व्यवस्थेवरून निर्मलजीत सिहं यांचा आवाज ऐकू आला…

“मी दोन सेबर जेट विमानांच्या मागे आहे, मी त्यांना जाऊ देणार नाही”

त्यानंतर काही क्षणातच नेटवरून आक्रमणाचा एक आवाज आसमंतात गुंजला आणि एक सेबर जेट विमान आगीत जळत असताना खाली पडत असलेले दिसून आले. तेव्हाच निर्मलजीत सिहंने आपला संदेश प्रसारित केला…

 

mensxp.com

“मी लढाईवर आहे. माझ्या आजूबाजूला शत्रूंची २ सेबर जेट विमाने आहेत. एक माझ्या सोबत असून दुसऱ्याचा मी पाठलाग करत आहे.”

यानंतर नेटमध्ये अजून एक धमाका झाला त्यासोबतच शत्रूचे सेबरजेट विमान उध्वस्त होण्याचा आवाज आला. त्यांचा निशाणा परत लागला आणि एका मोठ्या धमाक्या सोबत दुसरे सेबर जेट विमान देखील उध्वस्त झाले.

काही वेळच्या शांततेनंतर निर्मलजीत सिहं सेखोंचा अजून एक संदेश ऐकू आला. ते बोलले…

“कदाचित आता माझे सेबर जेट हे निशाण्यावर आले आहे.. घुम्मन आता तुम्ही मोर्चा सांभाळा..”

आणि हा निर्मलजीत सिहं यांचा शेवटचा संदेश होता.

यानंतर त्यांचे सेबर जेट बडगाव मध्ये क्रॅश झाले आणि त्यांना बलिदान प्राप्त झाले. ते शहीद झाले तेव्हा त्यांचे वय फक्त २६ वर्षे होते.

देशासाठी आपली निस्वार्थ सेवा आणि शत्रूंच्या विरुद्ध लढण्याच्या या दृढ संकल्पासाठी त्यांना मरणोत्तर परमवीरचक्र या पुरस्काराने सन्मानित केले गेले.

त्यांच्या पत्नी आणि वडिलांनी हा सन्मान स्वीकारला. लढाईमध्ये सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित होणारे ते एकमेव वायुसेनेतील (हवाई दलातील) सैनिक आहेत.

 

Rediff.com

सेखों सारखे सैनिक प्रत्येक दिवशी जन्माला येत नाहीत.

या महान योध्याच्या बलिदानासाठी त्यांना कृतज्ञता पूर्वक सलाम आणि त्यांच्या स्मृतींची रक्षा करतच त्यांना वीरगती प्राप्त होवो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version