आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
पाकिस्तानी कोर्टाने, भारतीय कुलभूषण जाधव यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेवरून झालेल्या वादांनी गुप्तहेर आणि त्यांचे जाळे यावर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे.
काहीच दिवसांपूर्वी मेघना गुलजार दिग्दर्शित आणि आलीया भटची मुख्य भूमिका असलेला याच विषयावरचा “राझी” हा चित्रपट चांगलाच गाजला.
भारताच्या गुप्तहेर संघटनात असे कितीतरी लोक आहेत जे जीवाची बाजी लावत शत्रूच्या राज्यात घुसून भारतासाठी हेरगिरी करतात. गोपनीयतेची गरज असल्याने मोठी युद्धे जिंकण्यात त्यांचा मोलाचा वाटा असूनही त्यांची नावे कधी समोर येत नाहीत.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
पडद्यामागे राहून, कुठल्याच कौतुकाची अपेक्षा न करता निरपेक्षपणे देशसेवा करण्याची.. देशासाठी जीव धोक्यात घालण्याची त्याची ही जिगरबाज प्रवृत्ती त्यांना महान बनवते.
अशीच अतिशय उल्लेखनीय कथा आहे आपल्या भारतीय नायक रवींद्र कौशिक यांची. तुमचा विश्वास बसणार नाही पण RAW मध्ये गुप्तपणे सामील झाले तेव्हा त्यांचे वय फक्त २३ वर्षे होते.
उत्कृष्ट भारतीय गुप्तहेर
या भारतीय गुप्तहेराला म्हणजेच कौशिक यांना पाकिस्तानच्या लष्करात घुसखोरी करण्याच्या त्यांच्या धाडसामुळे एक सर्वोत्तम भारतीय गुप्तहेर अशी ओळख प्राप्त झाली आहे.
किशोरवयात कौशिक यांना नाटकात काम करण्याची खूप आवड होती. वेगवेगळ्या भूमिका साकारायला त्यांना आवडत होते आणि तिथेच ते RAW च्या नजरेत भरले.
त्यांच्या RAW अंतर्गत असणाऱ्या प्रशिक्षणामध्ये कौशिक उर्दू भाषा शिकले होते. तसेच त्यांनी मुस्लिम धर्मातील ग्रंथांबद्दल ज्ञान मिळवले होते. ते पाकिस्तानी भूभाग आणि इतर जगाशी परिचित होते.
भारतीय असून धर्माने मुस्लिम नसताना हे ज्ञान आत्मसात करताना त्यांना बरेच कष्ट घ्यावे लागले असणार आणि तो आत्मविश्वास प्राप्त करण्यासाठी मनाची तयारी करणे वेगळेच.
पाकिस्तानातील नवी ओळख
जेव्हा त्यांना पाकिस्तानात पाठविले गेले, त्यांची भारतातील पूर्वओळख, पूर्वेतिहास पुसून टाकून पाठविले गेले. त्यांची मायभूमीशी असलेली नाळ कायमची तोडली गेली. आता त्यांना यापुढे भारतीय अशी ओळख मिरवता येणार नव्हती. त्यांचे नवीन नाव आणि ओळख “नबी अहमद शकिर” असे होते.
पुढे त्यांनी कराची युनिव्हर्सिटी मधून LLB करून पाकिस्तानी सैन्यात कमिशन ऑफिसरची जागा प्राप्त केली. कालांतराने ते मेजर पद पर्यंत पोहोचले.
हा प्रवास भावनिकरीत्या अतिशय कठीण असणार आहे. कारण जन्माने ते भारतीय होते. वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचे तर, त्यांनी पाकिस्तानातच अमानत नावाच्या एका युवतीसोबत लग्न केले आणि त्यांना एक मुलगी आहे.
१९७९ ते १९८३ च्या दरम्यान त्यांनी सुरक्षेबद्दल गरजेची असणारी अतिशय गंभीर माहिती भारतीय संरक्षण दलाला पोहोचवली. ज्यामुळे भारतीय संरक्षण दलास खूप मदत झाली होती. त्यांच्या या धाडसी कामगिरीमुळे ते संरक्षण विभागात “द ब्लॅक टायगर” म्हणून प्रसिद्ध झाले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वतः त्यांना या नावाने नावाजले होते.
प्रचंड धाडसी, निडर, देखण्या आणि जिगरबाज अश्या या व्यक्तिमत्वाला “द ब्लॅक टायगर” हे नाव अगदी साजेसे आहे.
दुःखद शेवट
तार (टेलिग्राफ) वरून आलेल्या अहवालानुसार, त्यांच्या संपर्कात येण्यासाठी RAW कडून दुसरा एजंट पाठविला गेला तेव्हा त्यांना पकडले गेले. नंतर सप्टेंबर १९८३ मध्ये केल्या गेलेल्या चौकशी मध्ये त्यांनी अनपेक्षितपणे स्वतःचे खरे रूप प्रकट केले.
हेरगिरी करून गुप्त माहिती पळवून ती शत्रू देशाला पाठविल्या बद्दल त्यांना १९८५ मध्ये फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. नंतर ती शिक्षा कमी करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली.
सियालकोट मध्ये चौकशी अंतर्गत असताना २ वर्षे त्यांचा अतोनात छळ केला गेला. नंतर त्यांना १६ वर्षे मियाँवाली मध्ये तुरुंगवास भोगायला लावून मरण्यासाठी सोडून दिले गेले.
त्या दिवसात त्यांना फुफ्फुसातील क्षयरोग आणि हृदयविकारांनी जखडले. पुढे त्यातच न्यूसेंट्रल जेल मध्ये त्यांचा दुर्दैवी अंत झाला. त्यांना त्याच कारागृहामागे दफन करण्यात आले.
एका अतिशय जिगरबाज अश्या वास्तविक जीवनातील नायकाच्या कहाणीचा अंत झाला. शेवटपर्यंत काहीही झाले तरी मायभूमीसाठी एकनिष्ठ राहणाऱ्या या हिरोला सलाम!
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.