Site icon InMarathi

ज्याच्या मृत्यूमुळे रेसलिंग विश्वच ढवळून निघालं; ख्रिस बेनवॉची शोकांतिका – भाग १

Chris Benoit im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : स्वप्नील खेरडेकर

===

जिवंत असताना सुद्धा त्याने लाखो फॅन्स कमावले आणि त्याच्या मृत्यूने अख्खं प्रोरेसलिंग विश्व ढवळून निघालं तो म्हणजे ख्रिस बेनवॉ. WWE आणि इतर मोठ्या प्रमोशन्सना आपल्या पॉलिसीजमध्ये मोठे बदल करावे लागले.

अगदी आजदेखील त्याच्या मृत्यूबद्दलच्या चर्चा, Conspiracy theories थांबलेल्या नाहीत. फॅन्स आजदेखील त्याला मिस करतात.

 

 

WWE ने शक्य त्या प्रत्येक ठिकाणी आपल्या कंपनीशी संबंधित असलेले त्याचे उल्लेख, त्याचे विक्रम पुसण्याचा प्रयत्न केला असला तरी एक टेक्निकल प्रोरेसलर म्हणूनही अजूनही त्याचं स्थान फॅन्सच्या मनात अढळ आहे.

कोण होता हा ख्रिस बेनवॉ? काय केलं होतं त्याने?

जिथे फक्त एन्ट्री मिळण्याची स्वप्न जगभरातले कित्येक लोक बघतात, तिथे ख्रिस बेनवॉने केवळ परफॉर्मच नाही केलं तर अगदी शिखर गाठलं. लाखो फॅन्सचं कौतुक मिळवलं.

कॅनडा, जपान, अमेरिका आणि इतर देशांत आपलं टॅलेंट दाखवलं आणि कित्येक टायटल्स जिंकलीत. NJPW, Stampede Wrestling, WCW, ECW, WWF/WWE ह्यांच्यासारख्या प्रोरेसलिंग प्रमोशन्सनी त्याला घडवलं. ह्या सगळ्या ठिकाणी मिळून त्याने एक दोन नव्हे तर तब्बल २२ वर्ल्ड टायटल्स जिंकली. (प्रोरेसलिंग हा प्रकार जरी scripted असला तरी टायटल्स ही मेहनत आणि टॅलेंट असेल तरच मिळवता येतात, त्याबद्दल नंतर कधी)

त्याची स्वतंत्र अशी रेसलिंग स्टाईल, कोणालाही हार मानायला लावू शकणारी ती Crippler Crossface सबमिशन मुव्ह, एखाद्या पक्ष्याप्रमाणे दोन्ही हात पसरून कॉर्नर वरून घेतली जाणारी त्याची ती डाइव्ह आणि चेहऱ्यावरचे ते एक्सप्रेशन्स – ह्या सगळ्यांमुळे बेनवॉची स्वत:ची एक स्वतंत्र शैली तयार झाली होती.

 

१४ मार्च २००४ :

बेनवॉच्या जीवनातली ही एक अत्यंत आनंदाची तारीख होती.

इतकी वर्षं मेहनत केल्यावर प्रोरेसलिंग जगतातली सगळ्यात मोठी इव्हेंट म्हणजेच WWE Wrestlemania (XX)त बेनवॉने मेन इव्हेंटला परफॉर्म केलं आणि Shawn Michaels आणि Triple H ह्यांना Triple Threat match मध्ये हरवून पहिल्यांदाच WWE वर्ल्ड हेविवेट टायटल जिंकलं…!

हा आनंद खास होता, कारण त्याच रात्री बेनवॉचा जिवलग मित्र एडी गरेरो हासुद्धा WWE Undisputed Champion बनला होता. दोघंही अत्यंत जिवलग मित्र होते आणि दोघांनाही एकत्र आणि तेसुद्धा सगळ्यात मोठ्या स्टेजवर मिळालेलं हे यश खरोखर अभूतपूर्व असंच होतं.

 

१३ नोव्हेंबर २००५ : एडी गरेरोचा हॉर्ट attack ने मृत्यू.

ख्रिस बेनवॉच्या जीवनात पुढे जे काही घडत गेलं त्यात ही एक महत्त्वाची घटना होती. एडी गरेरोचा अकाली मृत्यू बऱ्याच फॅन्सना चटका लावून गेला. एडीच्या मृत्युनंतर WWE ने घेतलेल्या Off the character इंटरव्ह्यूमध्ये आपल्या जिवलग मित्राबद्दल बोलताना आपल्याला रिंगमध्ये एरवी राकट, कठोर वाटणारा बेनवॉ हमसून रडताना दिसतो.

ह्यानंतर तो बराच एकाकी पडल्याचं सांगण्यात येतं. बेनवॉने नंतर स्वत:ला सावरलं. (किंवा निदान तसं तो दाखवत तरी होता.)

पुढे दोन वर्षांच्या आतच त्याचा नवा tag team पार्टनर ‘एज’ सोबत त्याने दोनवेळा WWE Tag Team Championship टायटल आणि तीनवेळा US Champion टायटल जिंकलं.

त्यावेळच्या सर्वोत्तम टेक्निकल रेसलर्सपैकी एक असणारा ख्रिस एव्हाना फॅन्सचा आणि WWE management चा चांगलाच लाडका झाला होता. त्याच्या matches ना मिळणारा चांगला प्रतिसाद हे त्याचंच चिन्ह होतं.

मात्र बेनवॉच्या डोक्यात वेगळंच काहीतरी शिजत होतं. त्याला तो जिथे शिकला तशीच एक Wrestling School सुरु करायची होती आणि नवीन पिढीतले रेसलर्स घडवायचे होते. WWE management अर्थातच त्याला जाऊ द्यायला उत्सुक नव्हतं.

 

 

त्याला पुन्हा एकदा मेन टायटलच्या परीघात आणण्याची तयारी WWE ने सुरू केली होती. आतापर्यंत केलेली मेहनत, अंगावर बसलेला मार, प्रसंगी डोक्यावर घेतलेले चेयरशॉट्स ह्यांचं पुन्हा एकदा चीज होणार होतं.

२४ जून २००७ : ह्या रात्री WWE Vengeance

Night of Champions हा इव्हेंट होणार होता आणि या इव्हेंटचं वैशिष्ट्य म्हणजे WWE चं प्रत्येक टायटल ह्यात डिफेंड होणार होतं. Vacant असलेल्या ECW Championship टायटलसाठी ख्रिस बेनवॉ आणि सी एम पंक ह्यांची लढत होणार होती.

बऱ्याच रिपोर्ट्सनुसार बेनवॉला ECW Championship टायटल मिळणार हे जवळपास निश्चित होतं. कुठल्याही प्रोरेसलरसाठी हा अत्यंत महत्त्वाचा, अभिमानाचा आणि अर्थातच आनंदाचा दिवस असतो.

मात्र बेनवॉ इव्हेंटला पोहोचलाच नाही. काय झालं त्या तारखेला? ऐन वेळेवर WWE ने कुठली पावलं उचलली ? टायटलचं पुढे काय झालं? आणि मुख्य म्हणजे बेनवॉचं काय झालं?

वाचा पुढील भागात –  पत्नी आणि मुलाला संपवून स्वतः आत्महत्या करणारा WWE स्टार ख्रिस बेनवॉ: भाग २

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version