Site icon InMarathi

कोरिओग्राफर आणि डान्स डिरेक्टर मध्ये काय फरक असतो? कोरिओग्राफी म्हणजे काय? समजून घ्या

abcd-any-body-can-dance_inmarathi

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

नृत्य ही प्रत्येकाच्या आवडीची कला आहे. सर्वसाधारणपणे टीव्हीवर नृत्याचे शो असतील तर त्यांचा TRP कधीही जास्त असतो. याचं कारण ज्यांना नृत्य येत नाही अशाही व्यक्ती नृत्यांचे कार्यक्रम बघण्यात आघाडीवर असतात.

कुठल्याही लहान मुलांना शाळेतला अभ्यास सोडून इतर कुठल्या कला किंवा छंद शिकवण्याची वेळ येते तेव्हा आपसूकच डान्स किंवा नृत्यकलेचं नाव पुढे येतं.

कोरिओग्राफर डांस डिरेक्टर हा बॉलीवूड मुळे आणि विविध वाहिन्यांवरच्या डान्स शो मुळे घराघरात जावून पोहोचलेला शब्द आहे.

सरोज खान, फराह खान, गणेश आचार्य, रेमो डिसुझा या प्रसिद्ध कोरिओग्राफरनी या क्षेत्राला वलय मिळवून दिले आहे. डान्स शिकताना आणि डान्सचे मोठमोठे कार्यक्रम सादर करताना डान्स डिरेक्टर, डान्स मास्टर, डान्स कोरिओग्राफर असे विविध शब्द आपल्या कानावर पडत राहतात.

 

tehalka.com

तुम्ही कधी विचार केला आहे का की कोरिओग्राफर आणि डान्स डिरेक्टर मध्ये काय फरक असतो? कोरिओग्राफी म्हणजे नेमकं काय? डान्स डिरेक्शन कोरिओग्राफी पेक्षा कसे वेगळे असते?

कारण हे शब्द वरवर जरी दिसायला सारखे असले तरी त्याच्यामध्ये फरक आहे.

कोरिओग्राफी हा शब्द मुळचा ग्रीक भाषेतील आहे. त्याचा अर्थ होतो नृत्यकविता!

ज्याप्रमाणे एखाद्या कवितेत निरनिराळ्या अर्थाचे शब्द गुंफून त्याच्यापासून सलग आणि सुंदर अर्थ सांगणारी रचना तयार होते त्याप्रमाणे नृत्या मध्ये विविध प्रकारच्या चाली, संगीत,त्यावर बसवल्या गेलेल्या नृत्याच्या हालचालींचे तुकडे एकसंध बांधून त्यापासून एक सुंदर नृत्यरचना तयार करणे म्हणजेच कोरिओग्राफी होय.

याच्या उलट डान्स डिरेक्टरचं काम असतं एका विशिष्ट प्रकारच्या नृत्याच्या ज्या हालचाली किंवा movement असतील त्या घोटून घेणे.

यांच्यातला फरक अजून विस्ताराने सांगायचा झाला तर कोरीओग्राफर हा बेली डान्स, पॉप, क्लासिकल, कंटेंपररी, अशा विविध प्रकाराच्या नृत्याच्या movements चा उपयोग करून आपल्यासमोर एक मास्टरपीस सादर करतो.

या उलट डान्स डिरेक्टर जो असेल तो त्याला जो डान्स प्रकार दिला असेल त्या डान्स च्या हालचाली किंवा movement डान्सर कडून घोटवून तयार करून घेईल.

म्हणजेच डान्स डिरेक्टर पेक्षा कोरिओग्राफरचे काम विविध पातळ्यांवर चालते. डान्स मास्टर ही संज्ञा अशा व्यक्ती साठी वापरतात ज्याने एकाच प्रकारच्या नृत्यामध्ये शिक्षण घेतलेले आहे आणि त्याला तो नृत्य प्रकार शिकवण्याचा अनुभव आहे.

कोरिओग्राफरला एकाच वेळी विविध प्रकाराच्या डान्स बद्दल माहिती असू शकते किंबहुना असते.

 

bright.com

जेव्हा आपण कजरारे, धूम, इश्क वगैरे सारखी हिट गाणी पाहतो त्यावेळी त्या एका गाण्याच्या पाठीमागे अनेक डान्स डिरेक्टर, कॉस्चुम डिझायनर, संगीतकार, म्युझिक डिरेक्टर, कोरिओग्राफर यांची मेहनत असते.

असे गाणे पूर्णपणे कोरिओग्राफर ने दिग्दर्शित केलेले असते. गाण्याच्या प्रत्येक बीट ला अनुसरून त्याची मुव्हमेंट ठरवली जाते.

ही मुव्हमेंट फक्त एकाच प्रकारच्या डान्स प्रकारातून येत नाही. कारण आजकाल ची गाणी आणि नृत्य हे फ्युजन प्रकारातील असतात म्हणजेच त्यामध्ये पाश्चात्य आणि पारंपारिक भारतीय शैलींचा मेळ घातलेला असतो.

गाण्याचे शब्द आणि संगीत ज्या पद्धतीचे असेल त्या पद्धतीचे तसे नृत्य बसवले जाते. त्यामध्ये ज्या प्रकारचे नृत्य असेल त्याप्रमाणे डान्स डिरेक्टर तुकड्या तुकड्यात ते नृत्य कोरिओग्राफर च्या देखरेखीखाली बसवतात.

शेवटी संपूर्ण movements एकत्र करून आणि त्यात आवश्यक बदल करून एक संपूर्ण गाणे कोरिओग्राफर कोरिओग्राफ करतो म्हणजेच बसवतो.

यामध्ये नृत्य, नृत्यांगना, त्यांच्या पाठीमागे नाचणारे डान्सर यांचे कपडे, केशभूषा, वेशभूषा, लायटिंग, डान्स चे लोकेशन, डान्स च्या संपूर्ण movements या सगळ्या गोष्टी कोरिओग्राफर ठरवतो आणि त्या प्रमाणे तो ते गाणे दिग्दर्शित करतो.

 

westrfilm.blogspot.com

कोरिओग्राफर ला फक्त एकाच प्रकारची नृत्यकला शिकून चालत नाही. जितके जास्त नृत्य प्रकार त्याला माहित असतील इतके जास्त व्हेरिएशन्स तो आपल्या नृत्यदिग्दर्शनात आणू शकतो.

त्यामुळे कोरिओग्राफर हा सध्या मनोरंजनाच्या क्षेत्रात परवलीचा शब्द झालेला आहे. कुठल्याही कार्यक्रमात नृत्याची आवश्यकता लागतेच त्यामुळे या क्षेत्रात येणाऱ्या तरुण मुला मुलींचे प्रमाण वाढत चालले आहे.

कोरिओग्राफी शिकवणारे क्लास आणि शाळा आजकाल निघालेल्या आहेत. त्यामध्ये बॉलीवूड, जॅझ, पॉप, रशियन बॅले अशा विविध प्रकारचे आणि कमी कालावधी मध्ये शिकता येतील अशा डान्स प्रकारचा समावेश असतो. कोरिओग्राफरना विविध क्षेत्रात काम करण्याची संधी देखील मिळते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version