Site icon InMarathi

या गूढ वास्तू माहित तर आहेत, पण त्यामागचा अगम्य इतिहास कुणालाच ठाऊक नाही!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जगभरातील पुरातत्व विभाग आणि अधिकारी नेहमी आपल्यासमोर आपल्या इतिहासाचे पुरावे सादर करत असतात. ज्यामुळे अनेक अश्या गोष्टी आपल्याला इतिहासाबाबत माहिती झाल्या ज्याबाबत कदाचित आपण कधी कल्पनाही करू शकत नाही.

अशाच काही ऐतिहासिक वास्तू त्या त्या ठिकाणच्या पुरातत्व विभागातर्फे शोधण्यात आल्या पण त्याच्या मागील खरी कहाणी नेहमी लोकांपासून दूर ठेवण्यात आली आहे.

१. Teotihuacan, the Real Temple of Doom

 

 

मेक्सिको शहराजवळ असलेले हे मंदिर बघण्यासाठी जगभरातून अनेक पर्यटक येतात. पण Teotihuacan हे या मंदिराचे खरे नाव नाही.

याचा इतिहास आजही पूर्णपणे स्पष्ट नाही. हे मंदिर कधी बांधले गेले, कोणी बांधले याबाबत स्वतः पुरातत्व विभागाला देखील माहित नाही.

जवळपास ५०० वर्षांआधी ही इमारत लोकांच्या समोर आली. याबाबत कुठेही लिखित माहिती नाही, तसेच कुठल्याही दंतकथेत देखील याचा उल्लेख नाही.

हे मंदिर आजही पुरातत्व विभागासाठी एक कोडं बनलेलं आहे. ह्या मंदिराला एखाद्या शहराप्रमाणे बनविण्यात आले आहे. ह्याची वास्तुकला एवढी अप्रतिम आहे की पुरातत्व विभागाकडून ह्या ठिकाणाची तुलना न्यूयॉर्क शहराशी केली जाते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

२. The Works of the Old Men 

 

 

हे ठिकाण आकाशातूनच बघता येऊ शकते. जमिनीवर बनलेल्या या आकृत्या अनेक प्रश्न उपस्थित करतात. ज्यांनी उत्तरे अजूनही पुरातत्व विभागाला सापडलेली नाहीत.

सौदीच्या वाळवंटात रेतीच्या कणांमध्ये तुम्हाला या आकृत्या बघायला मिळतात. या आकृत्यांबाबत कुणालाही कुठलीही माहिती नाही.

काही दंतकथांच्या मते एका वृद्ध व्यक्तीने या आकृत्या बनविल्या आहेत. पुरातत्व विभागाने या आकृत्या २००० वर्ष जुन्या असल्याचं सांगितलं आहे. पण याबाबत पूर्णतः माहिती कुठेही उपलब्ध नाही.

३. The Giant Rock Monument Under the Sea of Galilee 

 

 

२००३ साली गॅलीली जवळच्या समुद्रात इस्राएलच्या पुरातत्व विभागाचे लोक काहीतरी शोधत असताना त्यांची शोध मोहीम अचानक समुद्रातील एका पहाडावर जाऊन थांबली.

आधी एखाद्या बेटासारख्या दिसणाऱ्या ह्या पहादाचे जेव्हा जवळून निरीक्षण करण्यात आले तेव्हा सर्वांचे डोळे विस्फारून गेले, कारण हा कुठला नैसर्गिक पहाड नसून लहान लहान दगडांना जोडून तयार करण्यात आलेला पहाड होता. ह्या पहाडाला कोणी आणि का बनवले असावे ह्याचे उत्तर अजूनही सापडलेलं नाही.

४. Nan Madol 

 

 

Temwen बेटाजवळ Nan Madol नावाचे एक पुरातन शहर आहे. ज्याप्रकारे हे शहर बनविण्यात आले आहे ते बघून हे एखाद्या भुताच्या चित्रपटातील सेट वाटतो.

नक्कीच कुठल्यातरी महान वास्तुविशारदाने या शहराची निर्मिती केली असावी.

Nan Madol याबाबत देखील इतिहासात कुठलाही माहिती अथवा उल्लेख आढळत नाही. हे शहर कुठल्या काळी, कुणी बनविले याची देखील कुठेही माहिती नाही. पुरातत्व विभागाने याचा शोध घेण्याचे अनेक प्रयत्न केले पण सर्व अयशस्वी ठरले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

 

५. Goseck Circle: The Murder Observatory 

 

 

१९९१ साली या गोलाकार आकृतीला आकाशातून बघण्यात आलं होत. ११ वर्षांची मेहनत आणि शोधानंतर देखील जर्मनी पुरातत्व विभाग ह्या ठिकाणाच रहस्य जाणण्यास अयशस्वी ठरला.

आधी तर हे एखाद्या सामान्य आकृती प्रमाणे दिसलं, पण जेव्हा ह्याचा तपास करण्यात आला तेव्हा हे किती जुनं असू शकते ह्याचा अंदाज लावण्यात आला.

पुरातत्व विभागाच्या मते ही वास्तू ७ हजार वर्ष जुनी आहे. पण ह्याहून अधिक काहीही पुरातत्व विभागाच्या हाती लागलेलं नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version