Site icon InMarathi

सनस्क्रीन लावणं चांगलं की वाईट? जाणून घ्या समज आणि गैरसमज…

sunscreen im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

इतरांकडून कानावर पडणाऱ्या गोष्टींवर आपण खूप लवकर विश्वास ठेवतो. स्वतःच्या कानांसह डोळ्यांवरही विश्वास ठेवण्यापेक्षा इतरांनी सांगितलेली माहिती खरी मानली जाते.

 

istock

 

त्यामुळे कुठल्याही गोष्टीबाबत समाजात खऱ्या गोष्टी कमी आणि गैरसमज जास्त प्रचलित असतात. पण खरंच ह्या गोष्टी विश्वास ठेवण्यासारख्या असतात का?

असचं काहीसं सनस्क्रीनबाबतही आहे. सनस्क्रीनबाबतही अनेक असे गैरसमज प्रचलित आहेत ज्यांना लोक खरं मानतात.

 

foreveryoung.perriconemd.com

 

१. प्रत्येकवेळी सनस्क्रीन लावणे गरजेचे नसते :

 

aarp.org

अनेक लोक असं मानतात की, जेव्हा आपण उन्हात जातो तेव्हाच सनस्क्रीन लावायची गरज असते. पण हे सत्य नसून पावसाळ्यात देखील यूव्ही किरणांमुळे आपल्या शरीराला नुकसान पोहोचू शकते. त्यामुळे प्रत्येक मोसमात सनस्क्रीन लावावे, त्वचेच्या सुरक्षेसाठी हा एक योग्य पर्याय आहे.

२. सनस्क्रीन शरीराला विटामिन-डीने वाचवते :

 

sherwoodwellness.tv

विटामिन-डी हे शरीराला लागणाऱ्या सर्वात महत्वाच्या गोष्टींपैकी एक आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी सनस्क्रीन लावल्याने आपल्या शरीराला विटामिन-डी हवा तेवढ्या प्रमाणात मिळत नाही.

वैज्ञानिकांच्या मते माणसाला दिवसातील २५ ते ३० मिनिटांपर्यंत सूर्याच्या संपर्कात राहायलाच हवे.

३. सनस्क्रीन लावल्याने शारीरिक समस्या उद्भवतात :

 

skincancer.org

 

Oxybenzone वर करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये असं सांगण्यात आलं होत की, सनस्क्रीन लावल्याने अनेक शारीरिक समस्या उद्भवतात.

पण त्यानंतर झालेल्या रिसर्चनुसार ह्याला चुकीचे ठरविण्यात आले आहे. सनस्क्रीन लावल्याने कुठल्याही प्रकारच्या शारीरिक समस्या उद्भवत नाहीत.

४. सावळी त्वचा असलेल्या लोकांना सनस्क्रीनची गरज नसते :

 

 

काही लोकांच्या मते डार्क स्कीनमध्ये मेलेनिन असतं, जो त्यांना युव्ही किरणांपासून बचावतो, जे काही अंशी खरं देखील आहे.

पण जर डार्क स्कीन असलेले लोक भर उन्हात सनस्क्रीन शिवाय असले तर त्यांना स्कीन कॅन्सर होण्याचा धोका संभवतो.

५. मेकअपने देखील चेहऱ्याची निगा राखल्या जाऊ शकते :

 

intothegloss.com

 

सूर्याच्या किरणांपासून वाचण्यासाठी तुम्ही मेकअपचा आधार घेऊ शकता. पण मेकअप तुम्हाला सनस्क्रीन एवढी सुरक्षा नाही देऊ शकत.

६. सनस्क्रीन लावल्याने शरीर टॅन होत नाही :

 

indiatimes.com

 

सनस्क्रीन आपल्याला UVA आणि UVB किरणांपासून वाचवते. पण हे आपल्या शरीराला पूर्णपणे टॅन फ्री ठेवू शकत नाही. मग तुम्ही कितीही वेळा सनस्क्रीन लावा.

आपले शरीर टॅन फ्री ठेवण्यासाठी सनस्क्रीन लावल्यावर लांब कपडे घालून बाहेर जावे.

७. सर्व सनस्क्रीन एकसारखे असतात :

 

goodhousekeeping.co.uk

 

जर तुम्हाला असं वाटत असेल की, सर्व सनस्क्रीन एकसारखे असतात तर असं नाहीये.

Titanium Dioxide, Zinc Oxide आणि Ecamsule असणारे सनस्क्रीन UVA आणि UVB किरणांना फिल्टर करण्याचं काम करतात.

तर Avobenzone युक्त सनस्क्रीन अनेक प्रकारच्या सूर्य किरणांना शरीरापर्यंत पोहोचण्यापासून रोखतात. तसेच स्पेक्ट्रम पूर्ण सनस्क्रीन मोठ्या प्रमाणात सूर्यापासून आपल्या शरीराची रक्षा करतात.

८. दिवसातून एकदा सनस्क्रीन लावणे पूरेसं आहे :

 

fashionisers.com

 

अनेकांचा असा गैरसमज आहे की, दिवसातून एकदा सनस्क्रीन लावणे पुरेसे आहे, ह्यामुळे सूर्याच्या घातक किरणांपासून शरीराची निगा राखली जाऊ शकते.

===

पण उन्हात गेल्यानंतर काहीच वेळात सनस्क्रीनचा असर संपून जातो, त्यामुळे दर २-४ तासांत नेहमी सनस्क्रीन लावत राहावे.

९. सनस्क्रीन कधीही खराब होत नाही :

 

intuitivetouchtherapies.com

 

हा समजही पूर्णपणे चुकीचा आहे. सनस्क्रीन मध्ये असणारे तत्व देखील खराब होतात.

त्यामुळे सनस्क्रीन बाबत कुठल्याही समजावर विश्वास ठेवू नका. उन्हाळ्यात त्वचेची निगा राखण्यासाठी सनस्क्रीम जरुर लावा, मात्र त्याबाबतची पुर्ण माहिती घेतल्यानंतरच त्याचा वापर करा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version