Site icon InMarathi

इंजिनिअर व्हायचंय? कशाला?! : इंजिनिअरिंग आणि बेरोजगारी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – रमणराज गड्डम

===

अलीकडच्या काळात इंजिनिअरिंगची व्याख्या असे सांगते की नुसतं शिका, रट्टा मारा, assignment लिहा, submission करा,

विद्यापीठाच्या पेपर असल्यावर एका दिवसात अभ्यास करून विषय काढा हाच हेतू विद्यार्थ्यांमध्ये बिनसलेले असते.

पण मूळ विषय तो राहिला placement ची म्हणजेच नोकरीची.

आताच्या युगातील विद्यार्थी उच्च शिक्षणसाठी नुसतं डॉक्टर, इंजिनीअरिंगच करण्याच्या भानगडीत असतात.

 

deccanchronicle.com

 

बाकीच्या डिग्रीकडे त्यांचा कल नसतो. कारण हे युग विद्यार्थ्यांना नुसतं तंत्रज्ञानाचा वाटू लागलं. मुळात इंजिनीअर बेरोजगार का आहेत याचा आपण सखोल अभ्यास करायला हवाय. त्याचं उत्तरही वरतीच सापडेल तुम्हाला.

सगळे विद्यार्थी नुसतंच इंजिनीअरिंगचं शिक्षण घ्यायला लागल्यावर नोकरीची अडचण भासेलच ना.

 

dazeinfo.com

 

२०१७ चा टाईम्स ऑफ इंडियाचं अहवाल असे सांगतो की, भारतात दर वर्षाकाठी सरासरी ६०% इंजिनिअर्स बेरोजगार असतात.

ही अडचण निर्माण झाली याचं कारण म्हणजे, बाकीचे डिग्री सोडून फक्त इंजिनीअरिंग हेच आपलं क्षेत्र, हीच आपली आवड, हेच आपलं करीअर म्हणून विद्यार्थी पसंत करतात.

जर ही बेरोजगारी संपवायची असेल तर सरकारने विद्यार्थ्यांचे प्रबोधन करून दुसऱ्या डिग्रीकडे वळवणे किंवा विद्यार्थ्याने स्वतः दुसरे क्षेत्र निवडणे गरजेचे आहे.

भारतात एकूण इंजिनीअरिंगचे जवळपास ३,३४५ खाजगी महाविद्यालये असून १४,७३,८७१ सीट्स आहेत.

यातील सगळेच सीट भरल्यास वर्षाकाठी संपूर्ण भारतात जवळजवळ १४ लाख इंजिनिअर्स बाहेर पडतात आणि सरकारची म्हणजेच IIT ची १६ महाविद्यालये असून ९,७८४ सीट्स आहेत.

यात असे एकूण ९ हजार तरी विद्यार्थी हुशार इंजिनिअर्स असतील असे गृहीत धरायला काही हरकत नाही.

 

youtube.com

 

जर फक्त आपल्या महाराष्ट्रातील आकडेवारी बघितली, तर एकूण ३५० खाजगी इंजिनीअरिंग महाविद्यालये आहेत. आपल्या एकट्या महाराष्ट्रातच वर्षाकाठी १,४६,११६ विद्यार्थी इंजिनीअर बनून बाहेर पडतात.

भारतात जर एवढे लाखो इंजिनिअर्स वर्षा-वर्षाला बाहेर पडतात तर त्या सर्वांना नोकरी मिळेल का?

 

thestorypedia.com

 

जर नोकऱ्या मिळत असतील तर किती? नोकरी न मिळणाऱ्यांची संख्या किती? या सर्वांचा अभ्यास करून सरकारने योग्य तो निर्बंध आणणे आवश्यक आहे.

म्हणजे काही अशी महाविद्यालये आहेत की जिथे नीट शिक्षणच दिले जात नाही. तिथे विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून देतात आणि तिथे असलेले ट्रस्टी मंडळी सरकारचे पैसे लुटून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळतात अशी महाविद्यालये सरकारने बंद करणं गरजेचं आहे.

विद्यार्थी डिग्री झाल्यावर बाहेर जेव्हा नोकरीसाठी फिरतात, नेमकं त्यांना इंजिनीअरिंगची व्याख्या आठवते. कारण बाहेर मार्केटमध्ये इंजिनिअरिंगला शून्य किंमत आहे.

नोकरीसाठी विद्यार्थी नाही एजंट तयार होऊ लागलेत. जर येणाऱ्या काळात अशीच इंजिनीअरिंगची बेरोजगारी वाढली तर सरकारला आर्थिक दृष्ट्या घातक परिस्थितीला सामोरे जावं लागेल हे नक्की.

एकदा पूर्ण इंजिनीअरिंगचा ४ वर्षाच काळ बघितल्यास कळेल की, तिथे कशा प्रकारे शिक्षण दिले जाते. नुसतं विद्यार्थ्यांकडून गधा मजुरी करवून घेतात. लिहा, नुसतं पानं भरा, वह्या भरा, प्रवचन ऐका एवढेच विद्यार्थ्यांचं लक्ष असतं. 

व्यावहारिक ज्ञान तर पाहिजे तसे दिले जात नाही.

महत्वाचं म्हणजे सगळीच महाविद्यालये आपलंच महाविद्यालय कसं १ नंबर आहे हे दाखवण्यासाठी ऍडमिशन घेताना १००% Placement आहे, म्हणजे नोकरी फिक्स आहे, असे सांगून विद्यार्थ्यांची दिशाभूल करतात नेमकं तिथेच विध्यार्थी बळी पडतात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version