Site icon InMarathi

जेव्हा एक मुस्लिम लैंगिक विकृत माणूस “हिंदू ऋषी” म्हणून दाखवला जातो…!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

टाईम्स ऑफ इंडिया डिड इट अगेन.

बातमी : एका “गॉडमन” ने अनेक पुरुषांचं लैंगिक शोषण केलं.

हा “बाबा” पुरुषांना काहीतरी “विधी” करतोय म्हणून खोलीत घेऊन जायचा, गुंगीचं औषध देऊन अनैसर्गिक लैंगिक कृत्य करायचा.

अर्थात, अश्या बातमीला फिचर्ड इमेज स्वाभाविकच ही अशी हिंदू ऋषीची लावली जाणार.

 

 

फक्त गडबड ही – की सदर प्रकरणातील विकृत इसम हिंदू नाहीये. आसिफ नूरी नावाचा एक मुस्लिम आहे.

टाइम्सवर, आज ह्या प्रकारामुळे, ट्विटरवर टीकेची झोड उठली आहे. टाइम्स ने ते ट्विट डिलीट केलं, लिंकवरील इमेज बदलली.

इच्छुकांनी बातमी इथे क्लिक करून वाचावी.

पण – थँक्स टू सोशलमिडीया, टाइम्सचा हा खोडसाळपणा व्यवस्थित नोंदवला गेला आहे.

 

 

 

टाइम्सने सदर प्रकारावर कोणतीही माफी मागितली नाहीये. फक्त ट्विट डिलीट करून, फिचर्ड इमेज बदलून वेळ मारून नेताहेत.

वेळोवेळी, कुठे होतो हिंदूंवर “अन्याय” ? देशात हिंदू “बहुसंख्य” आहेत म्हटल्यावर अल्पसंख्य लोकांवर चिडायचं कारण काय? हे आणि असे अनेक प्रश्न विचारले जातात. हिंदू कट्टर होताहेत म्हणजे ते मूर्ख आहेत किंवा भुलवले/फितवले जाताहेत किंवा दोन्हीही – बस्स हाच तो प्रचार असतो.

पण ह्या भावनेमागे असणारा राग कुठून जन्मतो, का फोफावतो – हे समजून घेण्याची “सेक्युलर” “पुरोगामी” माध्यम-लाडक्यांची इच्छा नाही. म्हणूनच नेहेमी वाटतं की हे लोक हिंदूंना कधी शांत होऊच देणार नाहीत…!

नक्षलवादावर आधारित एक अप्रतिम चित्रपट येऊन गेला. चक्रव्यूह नावाचा. अभय देओल-अर्जुन रामपाल-मनोज वाजपेयींच्या प्रमुख भूमिका आहेत.

 

 

त्यात एक प्रसंग आहे.

एका कॉर्पोरेट जायन्ट कंपनीला मोठी फॅक्टरी टाकण्यासाठी जमीन मोकळी करून हवी असते. त्यासाठी एका राजकीय पक्षाला हाताशी धरून गुंड पाठवतो. हे गुंड, २००-३०० ची झुंड, गाड्या, लाठ्याकाठ्या घेऊ येतात.

आणि हे सगळे भगवे झेंडे घेऊनच येतात.

का? काय संबंध?

हा असा अपप्रचार, सॉफ्ट-प्रॉपगॅन्डा प्राचीन आहे.

चित्रपटांमध्ये फसवणारा, गुंड हा नेहेमी भगवा असतो. निराधारांना मदत करणारे नेहेमी क्रॉस घातलेले असतात. असहाय, गरीब नेहेमी टोपी घातलेले असतात.

हे असं सिम्बॉलिझम जाणीवपूर्वक का केलं जातं? त्याचा प्रस्थापित विचारवंतांकडून विरोध का होत नाही?

ह्यातून बहुसंख्य हिंदूंच्या मनात राग फोफावणार नाही का? की ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपण “फ्रिडम ऑफ स्पीच” किंवा “वे ऑफ एक्स्प्रेशन” म्हणून गिळून टाकायच्या आहेत?

हिंदू “हिंदू” आहेत म्हणून एकजात सगळेच्या सगळे पेटून उठत नाहीत. जो पर्यंत हे हिंदूंमधील हिंदूपण टिकून आहे तो पर्यंत लिबरल इंटेलेक्च्युअल्सने स्वतःत सुधारणा घडवून आणायला हवी. प्रामाणिकपणे.

आज टाइम्स वर टीकेची झोड उठवणारे जर खरे सेक्युलर पुरोगामी लोक असते तर ह्यांच्या लाडक्या “मनुवादी” “प्रतिगामी” लोकांना टीका करण्याची संधी ही मिळाली नसती आणि “हिंदूंच्या मनात” त्यांचं स्थान काकणभर पक्कं देखील झालं नसतं.

उद्या तरी हे लोक सुधारावेत…!

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version