शंभराच्या नव्या नोटेवर झळकणारी भारतातील ‘ही’ ऐतिहासिक वास्तू कोणती? जाणून घ्या…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १०० रुपयांची नोट जारी केली आहे. या नव्या नोटेचा रंग हा लॅवेंडर आहे. तर या नोटेच्या मागे ‘Rani Ki Vav’ ‘रानी की वाव’ ला दर्शविण्यात आले आहे.
पण कदाचितच काही लोकांना माहित असेल की, ‘रानी की वाव’ म्हणजेच राणीची बावडी ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. आणि याची निर्मिती ११ व्या शतकात करण्यात आली होती.
हे ही वाचा –
- भारतात नोटा कशा तयार होतात? खराब-फाटलेल्या नोटांचं काय केलं जातं? जाणून घ्या..!
- या ‘गंभीर कारणा’साठी चक्क शून्य रुपयांची नोट बनवली गेली आहे, माहित्ये का?
‘रानी की वाव’ हे काय आहे आणि त्याचे काय महत्व आहे हे आपण जाणून घेऊया…
‘रानी की वाव’ याबाबत अनेक लोकांना कदाचित माहित असेल की, हा भारतीय ऐतिहासिक वास्तुशिल्पाचा एक नमुना आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
‘रानी की वाव’ ही धरोहर गुजरात येथील पाटण जिल्ह्यातील सरस्वती नादीच्या तिरावर आहे. या ऐतिहासिक वास्तूला २०१४ साली युनेस्को ने विश्व वास्तू स्थळांत सामील केले होते. युनेक्सोने ह्या बावडीला भारतात असलेल्या सर्व बावडीमध्ये राणी हा खिताब दिला आहे.तसेच या ठिकाणाला २०१६ मध्ये सर्वात स्वच्छ धरोहर असण्याचा मान देखील मिळाला आहे.
वास्तुकलेच्या ह्या सुंदर बावडीला सोलंकी साम्राज्या काळी बनविण्यात आलं होतं. ही बावडी सरस्वती नदी जवळ आहे. १०व्या शतकात बनविण्यात आलेली ही बावडी सोलंकी वंशाची भव्यता दर्शविते.
या बावडीचा निर्माण राणी उदयामती ह्यांनी सर्व लोकांच्या विरोधात जात आपल्या पतीच्या स्मरणार्थ करवला होता. गुजराती भाषेत बावडीला ‘बाव’ असे म्हटल्या जाते म्हणून ह्याचे नाव ‘रानी की वाव’ म्हणजेच ‘राणी ची बावडी’ असं पडलं.
या बावडीची उंची ६४ मीटर, रुंदी २० मीटर आणि खोली २७ मीटर आहे. बावडीच्या खाली एक लहान दरवाजा आहे, ज्याच्या आतून ३० किलोमीटर एवढी लांब एक सुरंग आहे. पण सध्या या सुरंगला माती आणि दगडांनी बंद करण्यात आले आहे.
–
हे ही वाचा –
- प्रभू श्रीरामांच्या नावे असलेल्या नोटा या देशात चलनात आहेत
- विविध देशांच्या चलनी नोटांनी केलेले हे अनोखे विक्रम वाचून थक्क व्हाल!
सनातन धर्मात तहानलेल्याला पाणी पाजणे आणि उपाशी माणसाला जेवण देणे हे सर्वात पवित्र कार्य मानल्या जातं. त्यामुळे आधीपासूनच आपले राजे- महाराजे जागो जागी आश्या बावडींचा निर्माण करत गेले जेणेकरून कुणीही तहानलेलं राहू नये.
या बावडीमध्ये अनेक कलाकृती तसेच भगवान विष्णू ह्यांच्या अनेक मुर्त्या स्थापित आहेत. या मुर्त्यांचा निर्माण हा भगवान विष्णूंच्या दशावतारच्या रुपात करण्यात आला आहे.
या बावडीच्या भिंतींवर भगवान राम, वामनावतार, महिषासुरमर्दिनी, कल्की अवतार आणि विष्णू भगवान ह्यांच्या विविध अवतारांचे चित्रण आहे.
वास्तुकलेच्या हिशोबाने या बावडीची निरीती ही “मारू-गुर्जरा” आर्किटेक्चर स्टाईलने करण्यात आली आहे. राणीच्या बावडीच्या आत एक मंदिर आणि पायऱ्यांच्या सात लाईन्स बनलेल्या आहेत. ज्यामध्ये १५०० पेक्षा जास्त नक्षीदार मुर्त्या कोरलेल्या आहेत.
२००१ साली ह्या बावडीतून ११व्या आणि १२ व्या शतकात बनविलेल्या दोन मुर्त्या चोरी झाल्या होत्या. यापैकी एक मूर्ती ही गणपतीची तर दुसरी ही ब्रह्मा-ब्रह्माणिची होती. भूज भुकंपा नंतर ह्याच्या सुरक्षेच्या कारणावरून या बावडीतील अनेक भागांना बंद करण्यात आले आहे.
९०० वर्ष जुन्या ह्या बावडीची सुंदरता आणि भव्यता बघून कुणीही आश्चर्यचकित होऊन जाईल. अशी ही राणी ची बावडी आपल्याला १०० च्या नव्या नोटेवर दिसणार आहे.
हे ही वाचा –
- ज्यावर देशातले सगळे व्यवहार चालतात अशा नोटा नेमक्या येतात कुठून हे प्रत्येकाला ठाऊक असायलाच हवं!
- भारतीय चलनी नोटांच्या मागे असलेली विशिष्ट “चित्रं” म्हणजे भारताच्या विविधतेचं ‘प्रतिकच’!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.