“हिंदुत्ववादी” मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या मंत्रिमंडळातील एकमेव मुस्लीम मंत्री म्हणतात..
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडून पक्षाला मोठ्या अपेक्षा आहेत. योगी बऱ्याचदा आपल्या विधानामुळे चर्चेत असतात. हिंदुत्वाचा प्रखर पुरस्कार करणारा नेता म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. त्यामुळे अल्पसंख्यांक गट त्यांच्यावर कायम टीका करत असतात.
उत्तरप्रदेशात जेव्हा ते मुख्यमंत्री म्हणून निवडले गेले तेव्हा आता राज्यात फक्त “कम्युनल गव्हर्नमेंट” म्हणजे विशिष्ट जातीचे, धर्माचे सरकार राहील अशी टीका विरोधी पक्षाने केलेली होती.
तरीही योगींबद्दल, त्यांच्या हर एक निर्णया बद्दल त्यांच्याच मंत्रिमंडळामधील एक मंत्री ठाम आहेत. त्या मंत्र्याचे नाव आहे मोहसीन रझा.
मोहसीन रझा हे योगीच्या मंत्रिमंडळातील एकमेव मंत्री आहेत. त्यांना मायनॉरीटी अफेअर आणि वेल्फेअरचे खाते देण्यात आले आहेत. उत्तरप्रदेश मध्ये असलेल्या अल्पसंख्याक जमातींचा विकास कसा होईल हे सांभाळण्याची आणि शासन ज्या योजना राबवते त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांच्या कडे आहे.
मोहसीन रझा योगींच्या निर्णयांचे स्वागत करतात. नुकताच योगी यांनी उत्तर प्रदेश मध्ये मुस्लीम मुलांसाठी चालू असलेल्या मदरश्यामध्ये जुना सलवार कुर्ता असा पोशाख बंद करून तिथे नवीन गणवेश आणण्याचा निर्णय घेतला.
तसेच या मदरश्यामध्ये पूर्वी फक्त कुराणाचे जे धार्मिक शिक्षण देण्यात येत होते त्याच्याबरोबर NCRT (National Council of Educational Research and Training) ची पुस्तके अभ्यासक्रमात समावेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
या निर्णयांचे जोरदार समर्थन मोहसीन करतात. कॉंग्रेस ने स्वत:ची मुस्लीम व्होट बँक टिकून राहावी म्हणून उत्तर प्रदेश मध्ये अनेक मदरसे सुरु करायला परवानगी दिली पण या मदराश्या मधून बाहेर निघणाऱ्या मुलांचे भवितव्य काय? या मुलांना सरकारी नोकऱ्या मिळत नाहीत. त्यांना मुख्य प्रवाहात आणले जात नाही. त्यांची मते जुनाट आणि धार्मिक राहतात.
जर त्यांना जुन्या पारंपारिक कपड्यांच्या जागी गणवेश दिला तर त्यांच्या मध्ये अनुशासनाची आस्था निर्माण होवू शकते.
आज ही मुले ही आपण IAS , IPS बनू, डॉक्टर, इंजिनीअर बनू असा विचार करू शकतात. धार्मिक शिक्षणापेक्षा मुख्य प्रवाहात दिले जाणारे शिक्षण त्यांना वर आणू शकते असा विश्वास मोहसीन यांना आहे.
मोहसीन रझा अनेक मुद्द्यांवर योगीच्या सरकार चे समर्थन करतात. लखनौ मधील एका हज हाउस ला भगवा रंग दिला गेला याबाबत मोहसीन याचं मत जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की हज हाउस ही सरकारी बिल्डींग आहे ती मशीद नाही. मशिदीला कुणीही भगवा रंग देवू शकत नाही मात्र ज्या सरकारी इमारती आहेत त्यांना रंगस्वातंत्र्य देण्याचे कारण नाही.
उत्तर प्रदेश मध्ये भाजपने निवडणुकीच्या वेळी तिकिटे देताना कुठल्याही मुस्लीम उमेदवाराला तिकीट दिले नव्हते. हा मुद्दा संवेदनशील आहे परंतु मोहसीन रझा यांना ज्यावेळी हा प्रश्न विचारला गेला त्यावेळी ते बोलले..
“पहा, जेव्हा उत्तरप्रदेश मधले दोन मोठे राजकीय पक्ष आणि कॉंग्रेस भाजप च्या विरुद्ध एकत्र आली होती आणि भाजपचा हिंदुत्वाचा मुद्दा खोडून काढण्यासाठी सगळ्या पक्षांनी आपापले मुस्लीम उमेदवार उभे केले होते. जवळजवळ ७० ते ८०% उमेदवार हे मुस्लीम होते अशा वेळी भाजप पुन्हा मुस्लीम उमेदवार उभा करून काय साधणार होता?”
–
“कारण मताची विभागणी तर अगोदरच झालेली होती. जर भाजप ने ही आपले बहुसंख्य उमेदवार उभे केले असते तर मतांच्या ध्रुवीकरणाचा सर्वात जास्त फटका पक्षाला बसला असता. त्यामुळे भाजप चा एकाही मुस्लीम उमेदवार नव्हता ही राजकीय खेळी झाली जातीय खेळी नाही याला रंग मात्र जातीयवादी राजकारणाचा दिला गेला आणि हा रंग देण्यात कॉंग्रेस अग्रेसर होती.”
योगी आदित्यनाथ यांनी ईद साजरी करण्यास नकार दिला यावर देखील मोहसीन रझा यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
योगी स्वत: एक गुरु आहेत, महाराज आहेत. त्यांनी आपल्या राज्यात कुठेही ईद पाळू नका असा हुकुम जारी केला नाही. व्यक्तिगतरीत्या त्यांना ईद साजरी करायची नाही करायची हा त्यांचा प्रश्न आहे.
“भाजप सरकार उत्तरप्रदेश मध्ये आल्या पासून लोकांमध्ये असहिष्णुता वाढली आहे का?”
यावर देखील मोहसीन रझा नकारात्मक उत्तर देतात. त्यांच्या मते उत्तर प्रदेश मधल्या असहिष्णुतेवर बोलण्यापेक्षा “भारत तेरे टुकडे होंगे” हे शब्द देशाच्या कुठल्या भागातून ऐकू येतात आणि का ऐकू येतात यावर विरोधी पक्षाने लक्ष देण्याची गरज आहे.
योगीच्या सरकार ने आपल्या बजेटमध्ये अल्पसंख्यांकासाठी ४००० कोटीचे बजेट मंजूर केले आहे जे आधीच्या सरकार च्या काळात कधी घडले नव्हते याकडे देखील ते मीडियाचे लक्ष वेधतात. योगीच्या पक्षातील मुस्लीम नेता सरकर बद्दल सकारात्मक मत व्यक्त करतो ही बाब भाजप च्या पथ्यावर पडणारी आहे हे निश्चित.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.