आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आईस्क्रीम आवडत नाही हे वाक्य तुम्ही उच्चारलंत आणि आसपासच्या सगळ्यांनी तुमच्याकडे चमकून पाहिलं नाही असं होणारच नाही.
आइस्क्रीम न आवडणा-या व्यक्तीकडे जणुकाही परग्रहातील व्यक्तीप्रमाणे पाहिलं जातं.
आईस्क्रीमचे दिवाने जगभरात आढळतात, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आईस्क्रीम आवडतं.
एखादा आनंदाचा प्रसंग असो वा कोणत्याही गोष्टीचं सेलिब्रेशन, सोबतीला आईस्क्रीम हवंच.
उन्हाळा हा तर आईस्क्रीमचा अगदी हक्काचा सिझन.
रणरणत्या उन्हात गारेगार आईस्क्रीम चाखण्याचा आनंद तुम्हीही अनुभवला असेल.
त्यामुळे आज बाजारात आईस्क्रीमचे अनेक प्रकार बघायला मिळतात.
पण आज आपण अश्या काही आयस्क्रीम बाबत जाणून घेणार आहोत ज्यांना जगातील सर्वात महाग आयस्क्रीम असण्याचा मान मिळाला आहे. ह्यांची किंमत ऐकून नक्कीच तुमचे डोळे विस्फारून जातील.
स्ट्रॉबेरी एट अरनोड्स
या आईस्क्रीमला जगातील सर्वात महाग आईस्क्रीम असण्याचा मान प्राप्त आहे. याची किंमत ऐकून नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.
या आईस्क्रीमचा आस्वाद घेण्यासठी आपल्याला तब्बल ३९ लाख डॉलर खर्च करावे लागेल.
खरं वाटत नाहीये? तुम्हाला याबाबत शंका वाटणं स्वाभाविक आहे, या आईस्क्रीममध्ये स्ट्रॉबेरी, मिंट आणि व्हिप्ड क्रीम घातलं जाते.
आता तुम्हाला वाटेल या आईस्क्रीमची इतकी किंमत का, तर याच उत्तर आहे आईस्क्रीममध्ये दडलेली खास गोष्ट.
तसंच विशेष म्हणजे या आईस्क्रीममध्ये तुम्हाला ७.०९ कॅरेटची एक पिंक डायमंड रिंग आणि २५००० डॉलरच्या वाईनसोबत सर्व्ह केल्या जातं.
एबसरडिटी संडे
या आईस्क्रीमसोबत तुम्हाला जे गिफ्ट मिळत ते पाहिल्यावर नक्कीच तुमचे डोळे चमकणार.
हे आईस्क्रीम विकत घेतल्यावर तुम्हाला टांझानिया फिरण्याचा एक चान्स देखील मिळेल. त्यासोबतच तिथे राहण्याचा खाण्या-पिण्याचीही सोय एका पंचतारांकित हॉटेलमध्ये केली जाते.
फक्त हे आईस्क्रीम विकत घेण्यासाठी तुम्हाला ६०००० डॉलर खर्च करावे लागतील.
फ्रोजन हॉट चॉकलेट
या आईस्क्रीमचे नाव एकेकाळी गिनीजबुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
या आईस्क्रीमची किंमत २५००० डॉलर एवढी आहे. हे तयार करण्यासाठी जगातील सर्वात विशिष्ठ अश्या कोकोचा वापर केला जातो. आईस्क्रीमच्या चवीपेक्षा ते सर्व्ह करण्याची पद्धत खास असते.
पुर्वीच्या राजेमहाराजांप्रमाणे आपलंही जेवण सोन्याचांदीच्या ताटात वाढलं जावं अशी तुमची इच्छा असेल, तर ती या ठिकाणी नक्कीच पूर्ण होणार.
कारण या आईस्क्रीमला सोन्याच्या वाटीत सर्व्ह केलं जातं. तसेच ह्याच्या बेस वर पांढरे डायमंड्स लागलेले असतात.
म्हणूनच हे आईस्क्रीम खाणं प्रतिष्ठेचं मानलं जातं. एकेकाळी हे जगातील सर्वात महाग आईस्क्रीम होतं.
गोल्डन ओपुलेंस संडे :
काहीसं गमतीशीर असलेलं हे आईस्क्रीमचं नाव, मात्र एकदा हे आईस्क्रीम खाल्लं की त्याची चव पुढील काही दिवसांसाठी तुमच्या जीभेवर रेंगाळणार हे नक्की.
या आईस्क्रीमला चॉकलेट आणि वॅनिलाच्या कॉम्बिनेशनने बनविलं जातं.
आईस्क्रीमला एक वेगळं, हटके रूप देण्यासाठी ह्यावर सोन्याच्या पाण्याचा लेयर चढविला जातो.
हा लेयर साखरेचं पाणी मिसळून तयार केलेली असते.
गोल्डन ओपुलेंस संडे ही आयस्क्रीम बनविण्यासाठी ४८ तास आधी ऑर्डर द्यावी लागते.
या आईस्क्रीमची किंमत १००० डॉलर एवढी आहे.
द विक्टोरिया
चॉकलेट आणि वॅनिलाच्या कॉम्बिनेशनने बनविण्यात येणाऱ्या या आईस्क्रीमचा लुक खूप रॉयल असतो.
या आईस्क्रीमची किंमत देखील १००० डॉलर एवढी आहे. अर्थात या आईस्क्रीमवर असलेला सोन्याचा लेअर हे त्याचं खास वैशिष्ट्य आहे.
हे आईस्क्रीम गोल्डन कॅरेमलाइज्ड पीनट्स आणि सोन्याच्या लेयरने सजवून सर्व्ह केली जाते.
तसंच ह्या आयस्क्रीममध्ये २४ कॅरेट सोनं देखील लावलं जातं.
या आईस्क्रीमच्या किंमती म्हणजे अनेकांची जन्मभराची पुंजी आहे, त्यामुळे या किंमती ऐकल्यानंतर नेमकं कोण हे आईस्क्रींम खात असेल हा प्रश्नही तुम्हाला पडला असेल,
मात्र परदेशातील अनेक आईस्क्रीमप्रेमी, रॉयल फॅमिलीतील सदस्य, उद्योगपती हे या आईस्क्रीमचा आनंद लुटतात.
केवळ चवीसाठी नव्हे तर स्टेटस सिम्बॉल म्हणूनही या आईस्क्रीमकडे पाहिलं जातं.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.