Site icon InMarathi

पावसाळ्यातही निरोगी राहणं आवश्यक आहे. त्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ हवेत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखिका – डॉ प्राजक्ता जोशी
===

पावसाळा आला की, जशी कांदाभजी आठवतात तसेच आठवते आजारपणं! या काळात अतिसार,अपचन अशा पोटाच्या तक्रारी हमखास आढळतात.सर्दी,खोकला असे किरकोळ आजार ही बळावतात.

या मागची कारणे व त्यासाठी आयुर्वेदानुसार काय बदल सांगितले आहेत हे आपण पाहुया.

 

weviral.in

 

वर्षा ऋतु हा श्रावण व भाद्रपद असे २ महिन्याचा कालावधी आहे. पावसाळ्यातील वातावरणामुळे शरीरस्थित वात, पित्त, कफ या तिनही दोषांचा प्रकोप झालेला असतो. तसेच रोग प्रतिकारक्षमता कमी होते.

तसेच ऊन्हाळा हा आदान काळ (बल हिन करणारा) असल्याने शरीर व जाठराग्नी (पचनशक्ती) क्षीण झालेले असते. त्यामुळे पचनाचेविकार बळावतात. कुठलेही infection लगेच होते. पचनाचे विकार टाळण्यासाठी आयुर्वेदाने  काही आहारात बदल सांगितले आहेत. ते खालीलप्रमाणे…

चवळी,पावटा,वाटाणा,मटकी हे वातवर्धक असल्याने टाळावेत.

हे झाले आहाराबद्दल ,पण त्यासोबतच दिवसा झोपणे, जास्त परीश्रम, रूक्ष पदार्थ सेवन हेही आयुर्वेदाने निषिद्ध मानले आहे. तसेच या काळात वमन, विरेचन व बस्ती ही पंचकर्मे आपण घेऊ शकतो.आयुर्वेदाची ही साधी सोपी ऋतुचर्या जर आपण स्विकारली तर पावसाळ्यात नक्कीच निरोगी राहता येईल.

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version