पावसाळ्यातही निरोगी राहणं आवश्यक आहे. त्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ हवेत!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखिका – डॉ प्राजक्ता जोशी
===
पावसाळा आला की, जशी कांदाभजी आठवतात तसेच आठवते आजारपणं! या काळात अतिसार,अपचन अशा पोटाच्या तक्रारी हमखास आढळतात.सर्दी,खोकला असे किरकोळ आजार ही बळावतात.
या मागची कारणे व त्यासाठी आयुर्वेदानुसार काय बदल सांगितले आहेत हे आपण पाहुया.
वर्षा ऋतु हा श्रावण व भाद्रपद असे २ महिन्याचा कालावधी आहे. पावसाळ्यातील वातावरणामुळे शरीरस्थित वात, पित्त, कफ या तिनही दोषांचा प्रकोप झालेला असतो. तसेच रोग प्रतिकारक्षमता कमी होते.
तसेच ऊन्हाळा हा आदान काळ (बल हिन करणारा) असल्याने शरीर व जाठराग्नी (पचनशक्ती) क्षीण झालेले असते. त्यामुळे पचनाचेविकार बळावतात. कुठलेही infection लगेच होते. पचनाचे विकार टाळण्यासाठी आयुर्वेदाने काही आहारात बदल सांगितले आहेत. ते खालीलप्रमाणे…
- अंबट,खारट व स्निग्ध पदारथांचे सेवन करावे.
- आठवड्यातुन एकदा लंघन करावे.
- तेलापेक्षा साजुख तुपाचा अधिक वापर करावा.
- ताजे व गरम अन्न सेवन करावे.
- पचनास हलका,शक्तिदायक,शुष्क आहार घ्यावा.
- थोडीजुनी झालेली धान्ये वापरावीत.तांदुळ गहु जव वरई नाचणी राजगिरा ईत्यादि..
- कडधान्यापैकी मुग व मसुर पचनास हलकी असल्याने अवश्य खावीत.
- कुळीथ व ऊडीद हे पचनास जड असल्याने कमी प्रमाणात खावे.
चवळी,पावटा,वाटाणा,मटकी हे वातवर्धक असल्याने टाळावेत.
- भाज्यांचा विचार करता दुधी,भेंडी,पडवळ,श्रावणघेवडा, वाल,गवार या भाज्या खाव्यात तर पालेभाज्या टाळाव्यात.
- लसुण,जीरे,हिंग, मिरे, आले ही फोडणीत वापरली जाणारी जिन्नस अग्नीदिपक असतात.त्यामुळे त्यांचा नक्की वापर करावा.
- सर्व भारतिय मसाले हे अग्निदिपक असतात. त्यामुळे भरपुर वापरावेत.
- दुध पितांना सुंठ,हळद, घालुनच प्यावे. मलईचे दुध,खवा, पेढा,दुध आटवुन केलेले पदार्थ टाळावे.
- दह्या ऐवजी ताक घ्यावे. तेदेखील ताजे, पातळ व जीरे, हिंग, काळे मिठ घालुन प्यावे.
- फार गोड व स्निग्ध पदार्थ,ऊसळी यादिवसात खाऊ नयेत.
हे झाले आहाराबद्दल ,पण त्यासोबतच दिवसा झोपणे, जास्त परीश्रम, रूक्ष पदार्थ सेवन हेही आयुर्वेदाने निषिद्ध मानले आहे. तसेच या काळात वमन, विरेचन व बस्ती ही पंचकर्मे आपण घेऊ शकतो.आयुर्वेदाची ही साधी सोपी ऋतुचर्या जर आपण स्विकारली तर पावसाळ्यात नक्कीच निरोगी राहता येईल.
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.