' अमेरिकन सरकारशी लढणारा अज्ञात भगत सिंग! – InMarathi

अमेरिकन सरकारशी लढणारा अज्ञात भगत सिंग!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

स्वातंत्र्यलढ्यातील वीर क्रांतिकारकाची नावे सांगा असा प्रश्न विचारल्यावर आपसूकच आपल्या तोंडातून पहिलं नाव बाहेर पडत ते ‘शहीद भगत सिंह’ यांच ! या थोर क्रांतीकारकाने आणि त्याच्या साथीदारांनी भारतमातेसाठी दिलेल्या बलिदानाचं मोल हा देश कधीच विसरणार नाही.

या वीराने कशाचाही स्वार्थ  बाळगला नाही. त्याच्या मनात केवळ भारत मातेच्या स्वातंत्र्याची आस होती आणि शेवटपर्यंत ती आस पूर्ण करण्याच्या जिद्दीनेच तो लढत राहिला. भगतसिंहांची ही लढवय्यी कहाणी आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. पण जर तुम्हाला आम्ही सांगितलं की स्वातंत्र्यलढ्याच्या या काळातच पंजाबच्या मातीत आणखी एक भगतसिंह जन्माला आला होता, तर तुमचा विश्वास बसेल का?

त्यांचे पूर्ण नाव होते भगत सिंह थिंड !

bhagatsinghthind-marathipizza01

स्रोत

३ ऑक्टोंबर १८९२ रोजी पंजाबच्या अमृतसर मध्ये या भगत सिंहाचा जन्म झाला. १९१३ मध्ये त्यांनी उच्च शिक्षणासाठी अमेरिका गाठली. २२ जुलै १९१८ रोजी पहिले महायुद्ध लढण्यासाठी US Army मध्ये त्यांची निवड झाली. भगत सिंह थिंड हे US Army मधील पहिले शीख सैनिक ठरले. काही महिन्यांनंतर त्यांना Acting Sergeant पदावर बढती मिळाली. १६ डिसेंबर १९१८ रोजी “excellent” या शिक्क्यासह त्यांना US Army मधून निवृत्ती देण्यात आली. निवृत्ती मिळाल्यानंतर अमेरीकेमध्येच अजून काही काळ जीवन व्यतीत करण्याच्या उद्देशाने त्यांनी वॉशिंग्टन राज्यामधून अमेरिकन सरकारकडे नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला.

अमेरिकन नागरिकत्व मिळवण्यासाठी अनेक कायदे आणि नियम होते आणि त्याकाळी अमेरिकेमध्ये केवळ गोऱ्या लोकांनाच नागरिकत्व दिले जायचे. जे सावळे होते ते देखील स्किन ट्रीटमेंट करून अमेरीकेच नागरिकत्व मिळवत होते. भगत सिंह थिंड गोरे नव्हते. ते देखील स्किन ट्रीटमेंटचा पर्याय वापरून अनधिकृतपणे अमेरीकेचं नागरिकत्व मिळवू शकले असते. पण त्यांनी तसे करण्यास साफ नकार दर्शवला. अमेरीकेचं नागरीकत्व मिळवीन, ते देखील सरकारी पद्धतीने – असा ठाम निर्धार करून त्यांनी दोन वेळा नागरिकत्वासाठी सरकारकडे अर्ज दाखल केला.

bhagatsinghthind-marathipizza02

स्रोत

पण दोन्ही वेळेला त्यांच्या पदरी निराशाच आली. पहिल्यांदा अमेरिकन सरकारने असे कारण दिले की भगत सिंहांचे नागरिकत्व सरकारी नियमांत बसत नाही आणि दुसऱ्यांदा कारण दिले की ते गोरे नाहीत म्हणून त्यांना अमेरिकन नागरिकत्व देता येत नाही.

हताश झालेल्या भगत सिंह थिंड यांनी अखेर नाईलाजाने अमेरिकन सरकारविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. परंतु सरकारी दाव्यांसमोर भगत सिहांचे दावे फोल ठरले आणि सुप्रीम कोर्टाने देखील त्यांना नागरिकत्व देण्यास नकार दिला. भगत सिंह थिंड यांनी अजूनही हार मानली नव्हती.

===

६ मे १९१९ रोजी त्यांनी शेजारच्या ऑरीगोन राज्यामधून तिसऱ्यांदा नागरिकत्वासाठी अर्ज केला. पूर्वी दोन वेळेस ज्या अधिकाऱ्याने भगत सिंह थिंड यांना अर्ज नाकारला होता, त्याने यावेळेस देखील न्यायाधीशांसमोर सरकारी नियमांचा पाढा वाचत आणि भगत सिंह थिंड यांचा गदर पार्टीमधील सक्रीय सहभाग सिद्ध करत त्यांना नागरिकत्व न देण्याची विनंती केली. दरम्यानच्या काळात भगत सिंह थिंड हे गदर पार्टीमध्ये सहभागी झाले होते. या पार्टीकडून भारतीय स्वातंत्र्यलढ्याला सहकार्य केले जात असे. १९१६-१७ या काळामध्ये त्यांनी गदर पार्टीचे जनरल सेक्रेटरी म्हणून देखील काम पहिले होते. ज्या मायभूमीत आपण जन्माला आलो ती मायभूमी परकियांच्या तावडीतून मुक्त व्हावी अशी त्यांची देखील तीव्र इच्छा होती.

bhagatsinghthind-marathipizza03

स्रोत

वर्ण गोरा नसल्याच्या कारणावरून नागरिकत्व नाकारत असलेल्या अमेरिकन सरकारविरोधात भगत सिंह थिंड न्याय मिळेपर्यंत लढा देत राहिले. भगत सिंह थिंड यांची सैन्यातील उत्तम कारकीर्द आणि नागरिकत्व मिळवण्यासाठी ते करत असलेले प्रामाणिक प्रयत्न पाहून अखेर न्यायालयाने १८ नोव्हेंबर १९२० रोजी त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व बहाल केले. तसेच तेथील इतर भारतीयांना देखील कोणत्याही त्रासाविना अमेरिकन नागरिकत्व मिळण्यास सुरुवात झाली.

bhagatsinghthind-marathipizza04

स्रोत

अश्याप्रकारे भारताला दोन भगत सिंह लाभले. एकाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले तर दुसऱ्याने स्वत:च्या हक्कासाठी उभारलेल्या लढ्यामधून आपल्या भारतीय बांधवाना देखील न्याय मिळवून दिला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?