Site icon InMarathi

गुजरातच्या या आयपीएस अधिकाऱ्याचं “आउट ऑफ द फ्रेम” काम भारावून टाकणारं आहे

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आपली संकटे सर्वांनाच जास्त वाटत असतात, ती सोडविण्यासाठी आपण अनेक प्रयत्न देखील करतो. पण आपल्यापैकी खूप कमी लोक असे असतात जे दुसर्यांच्या संकटांना आपल समजून त्यासाठी प्रयत्न करतात. आज आपण एका अश्याच व्यक्तीबाबत जाणून घेणार आहोत, ज्याने आपल्या कर्तुत्वाने ३२६ मुलांचे जणू जीवनच पालटले.

 

thebetterindia.com

बडोदरा येथील आयपीएस ऑफिसर जी. एस. मलिक ह्यांनी एका खोलीच्या शाळेचे रुपांतर ३ मजली इमारतीत केले. आणि ह्यासाठी त्यांनी राज्य सरकारच नाही माजी प्रधान सचिवांपर्यंत ह्यासाठी प्रयत्न केले. खरच आपल्या देशातील प्रत्येक माणूस आयपीएस मलिक ह्यांच्यासारखा विचार करायला लागला तर आपल्या देशातील अनेक समस्यावर मात करणे शक्य होईल.

 

hindustantimes.com

गुजरातच्या बडोदरा ह्या शहरात कवि दयाराम प्राथमिक शाळा नावाची एक शाळा आहे. एकेकाळी ही शाळा फक्त एका खोलीची असायची. आणि ह्या एकाच खोलीत पहिली ते सातवी पर्यंतच्या मुलांना शिकविल्या जायचे.

 

prabhatkhabar.com

ह्या शाळेत एकूण ३२६ मुलं शिकायचे. एकाच खोलीत असल्याचे त्यांना दोन वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये शिकविल्या जायचे. एवढचं नाही तर इथे मुला-मुलींसाठी एकच बाथरूम उपलब्ध होत. ६५० स्क्वेअरफुटाच्या खोलीत चार कोपऱ्यात वेगवेगळ्या वर्गातील मुलांना बसवून त्यांना शिकविल्या जायचे. ह्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागायचे.

 

livemint.com

२०१० साली मलिक ह्यांना कन्या केलावाणी आणि शाळा प्रवेशोत्सव दरम्यान पाहुणे म्हणून शाळेत आले होते. तेव्हा मलिक हे वडोदरा येथील जॉईन्ट पोलीस कमिशनर होते. मलिक जेव्हा ह्या शाळेत पोहोचले तेव्हा ह्या शाळेची दशा बघून आश्चर्यचकित झाले. आणि तेव्हाच त्यांनी ह्याला बदलण्याचा विचार केला.

मलिक ह्यांनी विद्यार्थ्यांच्या ह्या समस्येला राज्य सरकार ते प्रधान सचिव हसमुख अधिया पर्यंत पोहोचवले. त्यांच्यामुळे सर्वांचे लक्ष ह्या समस्येकडे वळले आणि ह्या शाळेला एक नव रूप देण्यासाठी बजट पास करण्यात आलं. तसेच ही तीन मळ्याची शाळा बनविण्यासाठी भारतीय सेवा समाजने थोडी जमीनही दान केली.

 

pixabay.com

एका खोलीची ती शाळा आज तीन मळ्याची इमारत बनली आहे. आता ह्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी १३ क्लास रूम्स आहेत. तसेच मुला-मुलींसाठी वेगवेगळे टॉयलेट देखील बनविण्यात आले आहेत. आता येथील विद्यार्थ्यांना पावसाळ्यात छतातून पाणी गळती सहन करावी लागणार नाही नाही सोबत शिकण्याची गरज असेल. आता ते आपल्या वेगवेगळ्या वर्गात आपला अभ्यास करू शकतात.

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना मलिकने सांगितले की, जेव्हा ते पहिल्यांदा ह्या शाळेत आले होते तेव्हा हे सर्व विद्यार्थी एका ५० वर्ष जुन्या इमारतीत बसायचे. आणि ती इमारत भाड्याने घेतलेली होती. पण आज ही शाळाच नाही तर ह्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे जीवन देखील बदलले आहे. आणि ह्यासार्वासाठी मलिक ह्यांचे योगदान बहुमुल्य आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version