शास्त्रज्ञांनी अशी चूक केली की त्या चुकीतून गुरु ग्रहाच्या तब्बल १२ चंद्राचा शोध लागलाय
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह हा ज्युपिटर आहे. ह्याच्या एका चंद्रावर (Ganymede) बर्फाची जमीन आणि पाणी असल्याचे संकेत देखील आधी आढळले होते. तेव्हापासून संपूर्ण जगातील खगोलशास्त्रज्ञ येथे पाण्याच्या शोधात लागले आहे. अश्याच एका खगोलशास्त्रज्ञांच्या चमूने चुकीने म्हणा किंवा नकळत ज्युपिटरह्या ग्रहाचे आणखी १२ चंद्र शोधून काढले.
Carnegie Institution for Science च्या खगोलशास्त्रज्ञ Scott Sheppard ह्यांच्या चमूने सूर्यमालेच्या आसपासच्या काही वस्तूंवर रिसर्च करत होते. तेव्हाच त्यांना ज्युपिटरच्या ह्या नव्या १२ चंद्राचा शोध लागला. आता ज्युपिटरच्या एकूण चंद्रांची संख्या ७९ एवढी झाली आहे.
ह्यासोबतच आता ज्युपिटर सर्वात जास्त चंद्र असलेला ग्रह बनलेला आहे. ह्यापैकी एकाचे नाव Valetudo- The Oddball हे ठेवण्यात आले आहे, हे नाव रोमन देवता ज्युपिटर ह्यांची महान नातं हिच्या नावावर ठेवण्यात आले आहे. आणि हा चंद्र ज्युपिटरच्या कक्षेच्या दिशेनेच त्याचे चक्कर लावते हे विशेष.
खगोलशास्त्रज्ञ ह्यांच्या मते जेव्हा आपल्या सौर्ययंत्रणेची निर्मिती होत होती, तेव्हापासूनच हे चंद्र ज्युपिटरच्या कक्षेत फिरायला लागले असावेत. ह्याचं कारण म्हणजे ज्युपिटरची मजबूत गुरुत्वाकर्षण शक्ती, जी कुठल्याही वस्तूला स्वतःकडे आकर्षित करून घेते.
शोध लागलेल्या चंद्रांचा व्यास हा खूप कमी आहे, जेव्हा ज्युपिटरचा व्यास ८८.८४६ मैल एवढा आहे. खगोलशास्त्रज्ञांच्या मते इतर ग्रहांवर देखील असे इतर काही लहान आकाराचे चंद्र असल्याची शक्यता आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.